Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर उभारण्यात येणार पुल; मात्र आदिवासी कोळी समाजाचा तीव्र विरोध

आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी नवीन पुलाच्या बांधकामाची घोषणा करण्यात आली होती. मात्र यासाठी मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाने नाराजी व्यक्त करुन तीव्र विरोध केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 29, 2025 | 06:00 PM
Koli community opposes construction of temporary bridge for Warkaris on Chandrabhaga

Koli community opposes construction of temporary bridge for Warkaris on Chandrabhaga

Follow Us
Close
Follow Us:
पंंढरपूर : लवकरच आषाढी वारी सुरु होणार आहे. यासाठी पालखी व्यवस्थापकांनी पालखी मार्गाची पाहणी देखील केली आहे. वारीमध्ये वैष्णवांचा मोठा मेळा जमतो. यामुळे प्रशासनांकडून पूर्ण तयारी केली जाते. वारीसाठी लाखो भाविक हे आळंदी, देहू आणि पंढरपूरात जमत असतात. चंद्रभागेच्या काठी जमलेला हा मेळा वर्षानुवर्षे आपली परंपरा जपून आहे. दरम्यान, वारीमध्ये चंद्रभागेवरील दगडी पूल च नवीन पूल वाहतुकीसाठी कमी पडत असल्याने नवीन पुलाच्या बांधकामाची घोषणा करण्यात आली होती. मात्र आदिवासी कोळी समाजाकडून या पुलाच्या बांधकामासाठी तीव्र विरोध केला जात आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी येत्या आषाढी यात्रेत प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर  तात्पुरते पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच दिली होती. आता याला आदिवासी महादेव कोळी समाजाकडून तीव्र विरोध होतो आहे. यासंदर्भात आज (दि.29) आदिवासी महादेव कोळी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी होडी चालक मालक कल्याणकारी संघ या संघटनेच्या वतीने पंंढरपूर प्रांत कार्यालय, पंंढरपूर तहसिल कार्यालय, पंंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंंढरपूर शहर पोलिस ठाणे, पंंढरपूर नगरपरिषद व लघु पाटबंधारे कार्यालय आदी सर्व ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जे तीन पुल उभारण्यात येणार आहेत त्यामुळे आमचे जीवन उध्दवस्त होणार आहे, कारण आमचा उदरनिर्वाह ज्या होडी व्यवसायावर चालतो तोच आपण बंद करणार आहात, असे निर्णय घेऊन जर आमच्या समाजावर अन्याय करत असाल तर यास आमचा तीव्र विरोध आहे.
तातडीने हा निर्णय बदलला नाही तर दिनांक ५ में पासुन अर्ध नग्न आंदोलन, धरणे आंदोलन, जलसमाधी आंदोलन असे विविध प्रकारचे उग्र आंदोलने आम्ही करू. असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे आदिवासी महादेव कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी लढणारे समाजसेवक गणेश अंकुशराव,  सोमनाथ अंभगराव   गणेश  तारापुरकर, अमर पंरचंडे, चंद्रकांत  अभंगराव,  अनिल अधटराव सचिन नेहतराव ,सुरज कांबळे पुंडलिक पंरचंडे आप्पा करकमकर समाजसेविका दुर्गाताई माने यांच्यासह अनेक होडीचालक, मालक व आदिवासी महादेव कोळी समाजाचे तरुण मंडळी उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अजित पवारांचे महत्त्वाचा निर्णय

पुण्यातील बी. जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. त्यामुळे येथील ऑडिटोरियमचा पुनर्विकास करताना त्याचा हेरिटेज दर्जा कायम राखून तो महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा व्हावा. त्यासाठी तातडीने एकात्मिक विकास आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या पुनर्विकासाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Koli community opposes construction of temporary bridge for warkaris on chandrabhaga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur News
  • pandharpur wari

संबंधित बातम्या

पंढरपुरात नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत; भालके, शिरसट, साबळेंमध्ये रंगणार सामना
1

पंढरपुरात नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत; भालके, शिरसट, साबळेंमध्ये रंगणार सामना

पंढरपुरात बदलतंय राजकीय समीकरण; तरुण नेतृत्त्वावर महाविकास आघाडीचा विश्वास
2

पंढरपुरात बदलतंय राजकीय समीकरण; तरुण नेतृत्त्वावर महाविकास आघाडीचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.