Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना धरणाच्या शिल्लक जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत करा; अखिल कोयना पुनर्वसन संघाची मागणी

कोयना प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यातील जमीन संपादित झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे ठाणे, रायगड, पालघर यांसह विविध जिल्ह्यांत पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पर्यायी जमीन, नागरी सुविधा तसेच पुनर्वसनासाठी शिल्लक असलेली जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचे प्रश्न अद्याप कायम आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 17, 2026 | 03:16 PM
Satara News, Koyna Dam Affected

Satara News, Koyna Dam Affected

Follow Us
Follow Us:
  • प्रकल्पग्रस्तांच्या तीन पिढ्या उलटूनही पुनर्वसनाचे मूळ प्रश्न प्रलंबित.
  • तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील दोन बैठकांतील निर्णयांची अंमलबजावणी प्रलंबित.
  • धरणासाठी संपादित जमिनींपैकी वापर न झालेली शिल्लक जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याची मागणी.
Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न साठ वर्षांहून अधिक काळ लोटूनही प्रलंबित आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर दोन बैठका घेऊन निर्णय झाले होते. मात्र, या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने शासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष पवन कदम यांनी निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

कोयना प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यातील जमीन संपादित झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे ठाणे, रायगड, पालघर यांसह विविध जिल्ह्यांत पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पर्यायी जमीन, नागरी सुविधा तसेच पुनर्वसनासाठी शिल्लक असलेली जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचे प्रश्न अद्याप कायम आहेत. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धरणासाठी संपादित जमिनीतील शिल्लक जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याबरोबरच पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.

रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची ‘सस्पेन्स’ अखेर संपली; ‘या’ दोन मातब्बर नेत्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे व कोकण भवन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समित्याही स्थापन करण्यात आल्या. मात्र, दोन्ही समित्यांच्या अध्यक्षांनी अद्याप प्रकल्पग्रस्तांची एकही बैठक घेतलेली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे.शासनाने प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नये. प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आगामी काळात प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन करतील, असा इशारा पवन कदम यांनी दिला. दरम्यान, कोयनावासीयांच्या प्रलंबित प्रश्नांवर एकजुटीने लढा उभारण्यासाठी सर्व संघटनांना एकत्र करून लवकरच एक जाहीर बैठक घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरसेवकाच्या अंगावर टँकर घालण्याचा प्रयत्न, संभाजीनगरमधील प्रकार; नेमकं काय घडलं?
एकजुटीशिवाय प्रश्न सुटणार नाहीत..

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यभर अनेक संघटना काम करीत आहेत. मात्र, साठ वर्षांनंतरही प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे कोयनावासीयांनी एकाच झेंड्याखाली एकवटण्याची गरज आहे. एकजुटीने लढा उभारल्याशिवाय शासनाकडून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, असे मत अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष पवन कदम यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Koyna dam affected people rehabilitation issues pending for 60 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Koyna Dam
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News:  वडिलांचा गणवेश अन् मुलांच्या चेहऱ्यावर अभिमान!; सातारा पोलिस मुख्यालयातील ‘तो’ क्षण ठरला प्रेरणादायी
1

Satara News: वडिलांचा गणवेश अन् मुलांच्या चेहऱ्यावर अभिमान!; सातारा पोलिस मुख्यालयातील ‘तो’ क्षण ठरला प्रेरणादायी

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात
2

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
3

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
4

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.