Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयना प्रकल्पाच्या दुरुस्तीचा फटका; शिरगाव-मुंढे गावांवर पाणीटंचाईचे संकट, ग्रामपंचायतींना पर्यायी व्यवस्था उभारण्याचे आदेश

कोयना जलविद्युत प्रकल्पातील महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पोफळी, कॉडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे या गावांच्या नळपाणी पुरवठ्यावर पुढील महिनाभर परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश कोयना सिंचन विभागाने दिले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 06, 2026 | 10:08 AM
कोयना प्रकल्पाच्या दुरुस्तीचा फटका; शिरगाव-मुंढे गावांवर पाणीटंचाईचे संकट, ग्रामपंचायतींना पर्यायी व्यवस्था उभारण्याचे आदेश

कोयना प्रकल्पाच्या दुरुस्तीचा फटका; शिरगाव-मुंढे गावांवर पाणीटंचाईचे संकट, ग्रामपंचायतींना पर्यायी व्यवस्था उभारण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या स्तर-१ व स्तर-२ मधील तातडीच्या दुरुस्तीमुळे ८ जून ते ८ जुलै २०२६ दरम्यान संपूर्ण जलवहन प्रणाली बंद राहणार आहे.
  • यामुळे पोफळी, कॉडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार नाही.
  • प्रभावित गावांमध्ये पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतींना पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या स्तर-१ व स्तर-२ मधील महत्त्वाचे उपांग असलेल्या आपत्कालीन झडप भुयार (ई.व्ही.टी.) आणि उल्लोळक विहिरीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पोफळी, कॉडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे गावांच्या नळपाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, असे निर्देश कोयना सिंचन विभागाने दिले आहेत.

मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार; ‘हा तर डॉ. कलाम यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न’, लोढा यांची टीका

कोयना बांधकाम विभाग क्रमांक १, कोयनानगर यांच्या नियोजनानुसार कोयना जलविद्युत प्रकल्प स्तर-१ व स्तर-२ च्या उल्लोळक विहिरीचे टप्पा-२ अंतर्गत तातडीचे दुरुस्ती काम ८ जून २०२६ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत स्तर-१ व स्तर-२ ची संपूर्ण जलवहन प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ई.व्ही.टी. उद्भवावर आधारित पोफळी–कॉडफणसवणे तसेच शिरगाव–मुंढे या गावांच्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. मात्र दुरुस्तीच्या काळात या योजनांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार नसल्याने संबंधित गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

याबाबत कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शिरगाव, पोफळी व कॉडफणसवणे ग्रामपंचायतींच्या सरपंचांना पत्र पाठवून दुरुस्तीच्या कालावधीत पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या पत्राची प्रत सातारा सिंचन मंडळ, कोयना बांधकाम विभाग, पंचायत समिती चिपळूण आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. दरम्यान, महिनाभर चालणाऱ्या या दुरुस्ती कामामुळे प्रभावित गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्रोतांवर अवलंबून राहावे लागणार असून ग्रामपंचायतींसमोर टँकर, विहिरी अथवा अन्य माध्यमांतून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

मुंबईतील २२ बस डेपो जागतिक दर्जाचे होणार; ‘बेस्ट’च्या पुनर्विकासाची तयारी सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्त्वाचे निर्देश

पत्रात म्हटलं आहे की, को. ज. वि. प्र. स्तर- १ व २ चे महत्वाचे उपांग असणाऱ्या आपत्कालीन झडप भुयार (ई. व्ही. टी.) हा उद्भव धरुन १) पोफळी कॉडफणसवणे २) शिरगाव मुंढे नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागामार्फत कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. कार्यकारी अभियंता, कोयना बांधकाम विभाग क्र. १, कोयनानगर यांनी संदर्भिय पत्रान्वये कळविलेनुसार को ज. वि. प्र. स्तर १ व २ चे उल्लोळक विहीरीचे तातडीचे दुरुस्तीचे काम टप्पा-२ दि. ०८/०६/२०२६ ते दि. ०८/०७/२०२६ करण्याचे नियोजन आहे. या कालावधीत स्तर १ व २ ची जलवहन प्रणाली पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या बंद कालावधीत ई. व्ही. टी. उद्भव धरुन राबविण्यात आलेल्या मौजे पोफळी, कॉडफणसवणे व शिरगांव, मुंढे या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध होणार नाही. तरी दुरुस्तीच्या कालावधीत संबंधीत नळ पाणी पुरवठा योजनांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था आपले स्तरावरुन करण्यात यावी.

Web Title: Koyna hydroelectric project repairs to disrupt water supply in four villages for a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • Koyana
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार; ‘हा तर डॉ. कलाम यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न’, लोढा यांची टीका
1

मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार; ‘हा तर डॉ. कलाम यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न’, लोढा यांची टीका

GDP वाढीबाबत मोठी Good News! 7.7% च्या ऐतिहासिक वेगाने धावणार भारताची अर्थव्यवस्था
2

GDP वाढीबाबत मोठी Good News! 7.7% च्या ऐतिहासिक वेगाने धावणार भारताची अर्थव्यवस्था

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त HPCLचा मोठा निर्णय! ‘HP Racer Green’ आता 100% पुनर्वापरित पॅकेजिंगमध्ये उपलब्ध
3

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त HPCLचा मोठा निर्णय! ‘HP Racer Green’ आता 100% पुनर्वापरित पॅकेजिंगमध्ये उपलब्ध

पालघरमध्ये जलक्रांती! 18 गावांतील 1800 शेतकरी कुटुंबांसाठी रुस्तमजी आणि रोटरी क्लबचा मोठा पुढाकार
4

पालघरमध्ये जलक्रांती! 18 गावांतील 1800 शेतकरी कुटुंबांसाठी रुस्तमजी आणि रोटरी क्लबचा मोठा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.