Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा

कोयना प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमीन संपादनाच्या वेळी प्रकल्पग्रस्तांना विविध शासकीय सुविधांची आश्वासने देण्यात आली होती. मात्र अनेक वर्षांनंतर देखील हे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 23, 2026 | 09:54 AM
कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा

कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा

Follow Us
Follow Us:
  • कोयना प्रकल्पासाठी संपादित केलेली वापरात नसलेली शिल्लक जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय अद्याप रखडला आहे.
  • जमीन गमावलेल्या कुटुंबातील तीन पिढ्यांचा रोजगाराचा प्रश्न कायम असून कायमस्वरूपी नोकरीची मागणी होत आहे.
  • शासनाने शिल्लक जमीन परत देऊन पात्र प्रकल्पग्रस्त तरुणांना रोजगारात प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिरगाव: कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी वापरात नसलेली व शिल्लक जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने पोफळी, कोळकेवाडी, नागावे, पेढांबे आणि कोंडफणसवळे परिसरातील प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Raigad News: गोदरेज कंपनीतील स्थानिकांच्या हितासाठी ठाकरे गट मैदानात; कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार

कोयना प्रकल्पासाठी १९५२ मध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. जमीन संपादनाच्या वेळी प्रकल्पग्रस्तांना रोजगार, पुनर्वसन तसेच विविध शासकीय सुविधांची आश्वासने देण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षे उलटूनही जमीन, रोजगार आणि पुनर्वसनाचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत. (फोटो सौजन्य – AI Created) 

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रालयातील बैठकीत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली शिल्लक जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मूळ जमीन परत देणे शक्य नसल्यास प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन देण्याची सूचनाही करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, दोन वर्षांनंतरही निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने या आशा मावळू लागल्या आहेत.

तीन पिढ्यांचा रोजगाराचा प्रश्न कायम

कोयना प्रकल्पग्रस्तांचा रोजगाराचा प्रश्नही अद्याप कायम आहे. जमीन गमावलेल्या कुटुंबातील तीन पिढ्या रोजगाराच्या प्रतीक्षेत असून परिसरातील शेकडो तरुणांना कायमस्वरूपी नोकरीची प्रतीक्षा असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. काही प्रकल्पग्रस्त कुटुंबे महानिर्मितीच्या प्रकल्पांमधील निर्वाह भत्ता अथवा तात्पुरत्या कामावर अवलंबून असल्याचेही सांगण्यात येते. पात्र प्रकल्पग्रस्त तरुणांना महानिर्मिती व संबंधित प्रकल्पांमध्ये कायमस्वरूपी रोजगारासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता पुन्हा जोर धरत आहे.

Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

“जमीन घेतली, पण नोकरीही नाही आणि पर्यायी जमीनही नाही”

“शासनाने अल्पदरात आमच्या जमिनी संपादित केल्या. त्यावेळी रोजगाराची आश्वासने देण्यात आली; मात्र अनेकांना नोकरी मिळाली नाही. पर्यायी जमीनही देण्यात आलेली नाही. आता प्रकल्पासाठी वापरात नसलेली शिल्लक जमीन आम्हाला परत द्यावी. त्या जमिनीवर पुन्हा शेती करून आम्हाला आमचा उदरनिर्वाह करता येईल,” अशी भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे. शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून शिल्लक जमीन पात्र प्रकल्पग्रस्तांना परत द्यावी, तसेच पात्र तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Koyna project affected people await unused land return two year old government decision still pending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Koyana
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
1

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
3

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
4

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.