Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता, शाळेची परिस्थिती तळ्यात मळ्यात; शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विविध समस्यांची झगडत आहे. शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्यांना विविध समस्येला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने संबंधित शाळेला वाली कोण? हा मुख्य प्रश्न पालकांना पडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 23, 2023 | 02:12 PM
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता, शाळेची परिस्थिती तळ्यात मळ्यात; शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
Follow Us
Follow Us:

येरवडा : लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विविध समस्यांची झगडत आहे. शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्यांना विविध समस्येला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने संबंधित शाळेला वाली कोण? हा मुख्य प्रश्न पालकांना पडला असून, या परिसराचा पालिकेत सहा वर्षे समावेश करून ही शाळेला पालिका शिक्षण मंडळात अध्यापही समावेश न केल्याने विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना देखील विविध अडचणींचा सामना करण्याची वेळ येत आहे.

लोहगाव भागाचा सहा वर्षापूर्वी ग्रामपंचायत मध्ये समावेश असताना व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदांच्या वतीने लोहगावच्या मुख्य चौकात मुलांची व मुलींची १ व २ अशी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. मुलींच्या शाळेत जवळपास ४०० ते साडेतीनशे विद्यार्थिनी येथील शाळेत शिक्षण घेण्याचा लाभ घेत आहे. मुलींच्या शाळेत सध्या ११ शिक्षक कार्यरत असून येथे ४ शिक्षकांची कमतरता आहे विद्यार्थिनींच्या पटा नुसार तेथे १५ शिक्षकांची आवश्यकता आहे. तर शाळा क्रमांक एक मुलांची याठिकाणी मुलांची संख्या साडेतीनशे च्या आसपास आहे. या संख्येनुसार अकरा शिक्षकांची आवश्यकता आहे परंतु तेथे केवळ पाचच शिक्षक उपलब्ध असल्याने मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्यावर भार पडत असल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने व शिक्षकच हजर नसल्याने यासंदर्भात पालकांमध्ये आश्चर्य व्यक्त करून मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा मुख्य प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.

चार-पाच वर्षापासून मुख्याध्यापकच नाही

गेल्या चार-पाच वर्षांपासून शाळा क्रमांक एक मुलांची येथे कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्यामुळे त्या चार-पाच शिक्षकांपैकी ज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापकाचा कारभार सांभाळावा लागत आहे, त्यामुळे ज्येष्ठ शिक्षकांना मुलांना शिकवायचे की शाळेचा कारभार सांभाळायचा हा मोठा प्रश्न शिक्षकांपुढे पडला आहे.

विशेष म्हणजे ५ ते ६ वर्षापूर्वी लोहगाव परिसराचा महापालिकेत सहा वर्षे उलटून देखील शाळेचा पालिका शिक्षण मंडळात समावेश करण्यात न असल्याने शाळेची अवस्था तळ्यात की विद्यार्थ्यांची झाली आहे. विशेष म्हणजे शाळेला मैदानच नसल्याने असलेले मैदान ही तुटपुंजे असल्याने व त्यामध्ये ऐन पावसाळ्यात पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहण्याची वेळ येत असून जेवणाकरितास बैठक व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात शाळेच्या वरंड्यात नाईलाजास्तव बसण्याची वेळ येत असल्याने पालकांमध्ये याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शाळेच्या आवारात साफसफाई करण्याकरिता सुरक्षा रक्षकाला कर्मचाऱ्यांची नेमणूक जरी करण्यात असली असली तरी पण ते वेळेत शाळेत हजर राहत नसल्याने शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचून व साचलेल्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून विद्यार्थ्यांना डेंग्यू,मलेरिया यासारख्या महसभांयकर आजारांची साथ पसरते की, काय अशी धास्ती पालकांना लागून राहिली आहे. तर विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी बेशिनाची सुविधा करण्यात आली आहे. पण त्यामध्ये नेहमीच सांडपाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात वाहनतळ नसल्याने शिक्षकांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना शाळेच्या आवारातच वाहने लावण्याची वेळ येत आहे. त्यामुळे संबंधित शाळेला वाली कोण ? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत असून विविध समस्यांना विळख्यात अडकलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासह शिक्षकांचा मुख्य असलेल्या ह्या समस्येतून सुटका होणार का? हा मुख्य प्रश्न उपस्थित होऊन संबंधित लोहगाव भागाचा पालिकेत समावेश करून उपयोग काय असा सवाल लोहगावकरकडून करण्यात येत आहे.

Web Title: Lack of teachers in zilla parishad primary school school conditions in ponds and plantations students deprived of education due to shortage of teachers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2023 | 02:12 PM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • Lohgaon
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक
1

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी
2

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!
3

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
4

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.