'लाडकी', 'मैय्या'चा करिष्मा; 4 टक्के वाढलेल्या मतदानाने बिघडवला काँग्रेस-भाजपचा खेळ
झारखंड आणि महाराष्ट्रातील जनादेशात महिलांची भूमिका निर्णायक ठरली आहे. सन्मान रकमेचा महत्त्वाचा वाटा झारखंड आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राहिल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्रात या सन्मान रक्कमेअंतर्गत दरमहा 1500 रुपये, तर झारखंडमध्ये 1000 रुपये दिले जात होते.
निवडणूक निकालांवर पडल्याचं पहायला मिळालं. निवडणुकीत ४ टक्के महिलाचं मतदान वाढलं आहे. त्याचा फायदा भाजपला महाराष्ट्रात तर झारखंडमध्ये जेएमएम आणि कॉंग्रेसला झाला आहे. झारखंडमध्ये भाजपला मैय्या योजनेला सक्षम पर्याय सापडला नाही तर महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला यावर उत्तर देता आलं नाही. सन्मान रक्कम योजना लागू करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेतही लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहं.महाराष्ट्रात “लाडकी-बहिण योजना” अंतर्गत महिलांच्या खात्यावर दरमहा 1500 रुपये जमा करण्यात आले. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात एकूण 7500 रुपये जमा झाले होते. महायुतीने सत्तेत आल्यावर ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं आहे.
महाविकास आघाडीने दरमहा 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, मतदारांनी कॉंग्रेसच्या मतदारांना फेटाळले. यावेळी महाराष्ट्रात महिलांच्या मतदानात 4% वाढ झाली. यामुळे महिलांचे बहुसंख्य मत महायुतीच्या बाजूने पडल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रातील निवडणूक हरियाणासोबत सप्टेंबरमध्ये होणार होती. मात्र, या योजनांमुळे निवडणुकीला उशीर झाल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली होती.झारखंडमधील 81 विधानसभा जागांवर महिलांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी “मैयां सन्मान योजना” सुरू केली. या अंतर्गत महिलांच्या खात्यावर दरमहा 1000 रुपये जमा करण्यात आले. निवडणुकीपर्यंत किमान चार हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले. यंदा पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. याशिवाय, झारखंडमध्ये प्रचारादरम्यान कल्पना नावाच्या नेत्या मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिल्या. त्यांनी 100 हून अधिक सभा घेतल्या.
महाराष्ट्रात एनडीएला २३५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपने 1३७ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन आणि आघाडी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही राज्यांत एकूण मतदान टक्केवारीत वाढ झाली असून, महाराष्ट्रात 4% तर झारखंडमध्ये 3% मतदानात वाढ झाली आहे.
मध्यप्रदेशमध्ये भाजपने लाडली बहना योजना सुरू केली होती. या योजनचा परिणाम असा झाला की भाजपला मध्यप्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला होता. मात्र गेल्या लोेकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात मोठं अपयश आलं. त्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार होत्या. त्याआधी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याचा निवडणुकीच्या काळात प्रचारही जोरात केला. शिवाय सत्तेत आल्यानंतर ही योजनेचा सन्मान निधी २१०० पर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचा परिणाम य सर्व निवडणुकीवर दिसून आल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.