Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: 66 लाख महिलांसाठी महत्त्वाची बातमी! ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाटणी! सरकारने जाहीर केले अंतिम आकडे

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत अंतिम आकडेवारी जाहीर केली असून राज्यातील तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाभार्थी पडताळणी, उत्पन्न निकष, सरकारी नोकरी, इतर योजनांचा लाभ आणि कागदपत्रांची तपासणी यानंतर ही अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 12:35 PM
66 लाख महिलांसाठी महत्त्वाची बातमी! 'लाडकी बहीण' योजनेत मोठी छाटणी! सरकारने जाहीर केले अंतिम आकडे

66 लाख महिलांसाठी महत्त्वाची बातमी! 'लाडकी बहीण' योजनेत मोठी छाटणी! सरकारने जाहीर केले अंतिम आकडे

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात 66 लाख महिला ‘लाडकी बहीण’ योजनेतून अपात्र
  • सरकारने जाहीर केले अंतिम आकडे
  • ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाटणी
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारला सत्ता मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील पात्र लाभार्थ्यांची अंतिम स्थिती स्पष्ट केली आहे. योजना सुरू झाल्यानंतर राबविण्यात आलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर राज्य सरकारने अधिकृत लाभार्थ्यांची संख्या जाहीर केली असून, 66 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.

राज्य सरकारच्या माहितीनुसार, सध्या 1.66 कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 66 लाख महिलांना लाभार्थी यादीतून अपात्र ठरविण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून वित्त खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. ही योजना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विभागामार्फत राबविण्यात येते. योजना सुरू झाली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर वित्तमंत्री अजित पवार होते.

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

महिला व बालविकास विभागाने पात्र महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

28 जून 2024: राज्य मंत्रिमंडळाने योजनेला मंजुरी दिली.

17 ऑगस्ट 2024: योजनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

योजनेचा लाभ: पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य.

नोव्हेंबर 2025: फसवणूक रोखण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी मोहीम सुरू करण्यात आली.

30 एप्रिल 2026: सर्व्हरवरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसीची अंतिम मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवली.

ई-केवायसी पूर्ण केलेल्यांनाच लाभ

सरकारने स्पष्ट केले आहे की, लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी मोहीम राबविण्यात आली. ई-केवायसी पूर्ण केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आणि गेमचेंजर ठरल्याचे मानले जाते. त्यामुळे लाभार्थी यादी पारदर्शक ठेवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी सरकारने ही पडताळणी प्रक्रिया राबविल्याचे सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?

Web Title: Ladki bahin yojana maharashtra ladli bahin scheme 66 lakh women declared ineligible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra
  • Women

संबंधित बातम्या

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!
1

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!

Nashik Pothole Deaths: रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाशिक हादरले; चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू, प्रशासनावर कायदेशीर कारवाईची तयारी
2

Nashik Pothole Deaths: रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाशिक हादरले; चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू, प्रशासनावर कायदेशीर कारवाईची तयारी

सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?
3

सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?

Baramati ATM Theft: महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास
4

Baramati ATM Theft: महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.