Ladki Bahin Yojana September installment by aditi tatkare
Ladki Bahin Yojana : मुंबई : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही नेहमी चर्चेत राहिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमुळे विरोधकांनी अनेकदा टीकास्त्र डागले आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिलेले दीड हजार रुपये दिले जातात. यामधील अनेक घोटाळे देखील उघड झाले आहेत. त्याचबरोबर पात्र महिलांसाठी नियमावली देखील कडक करण्यात आली आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे (aditi tatkare) यांनी दिली.
लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिना उजाडल्यानंतर देखील सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याच्या पैशांची प्रतिक्षा लागली आहे. मात्र आता ही प्रतिक्षा संपत आली आहे. कारण महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन मंत्री आदिती तटकरे यांनी सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहे आदिती तटकरेंची सोशल मीडिया पोस्ट?
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी योजनेतील सर्व पात्र महिलांना ई-केवायसी करण्याचे देखील आवाहन केले आहे. आदिती तटकरे यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती ! असे आवाहन देखील मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित… pic.twitter.com/6e3CgboGVL — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 9, 2025