
लातूरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 35 प्रवासी बचावले
लातूर : लातूर शहरातील छत्रपती चौकाच्या पुढे सोमवारी पहाटे धावत्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३५ प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. अग्निशमन विभागाला पहाटे ३.०२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. मनोज रंदाले यांनी याबाबत माहिती दिली.
नागपूर ते कोल्हापूर मार्गावर धावणारी खुराणा ट्रॅव्हल्सची एमएच ३८ एक्स ८०५३ क्रमांकाची बस लातूर शहराबाहेर छत्रपती चौकाच्या पुढे आली असता अचानक बसच्या टायरचा स्फोट झाला. त्यानंतर इंजिनमधून धुराचे मोठे लोट येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक नूरूला खान यांनी तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. वाहन चालकाच्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला. सुरुवातीला लागलेली आग नंतर इतर चाकांपर्यंत पसरली आणि संपूर्ण ट्रॅव्हल्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात बसमधील टपाल, चालकाची कागदपत्रे तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एमएच २४ बीडब्ल्यू १९२४, एमएच २४ बीडब्ल्यू २७९० आणि एमएच २४ बीडब्ल्यू १९२३ ही वाहने घटनास्थळी दाखल झाली. प्र. अग्निशमन अधिकारी बापूसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदा देशमुख, निलेश बुरपल्ले, धनराज कांदे, वैभव अवरगंड, हसन शेख, गिरीश वानखेडे, शरद माने आणि सतीश खताळ यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे ८५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांतील ही तिसरी आग लागण्याची घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.
चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप बचावले
सच्या टायरचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर इंजिनमधून धुराचे मोठे लोट येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. सुरुवातीला लागलेली आग नंतर इतर चाकांपर्यंत पसरली आणि संपूर्ण ट्रॅव्हल्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडली