Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर विमानतळ विकासासाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्याला अखेर यश

लातूर जिल्ह्याच्या हवाई संपर्क व्यवस्थेलानवी दिशा देणारा आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, लातूर विमानतळाच्या सर्वांगीन विकासासाठी ५६.७४ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2026 | 12:10 PM
लातूर विमानतळ विकासासाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्याला अखेर यश

लातूर विमानतळ विकासासाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्याला अखेर यश

Follow Us
Follow Us:

लातूर : लातूर जिल्ह्याच्या हवाई संपर्क व्यवस्थेलानवी दिशा देणारा आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, लातूर विमानतळाच्या सर्वांगीन विकासासाठी ५६.७४ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच विमानतळाच्या नियमित परिचालनासाठी प्रतिवर्ष ३७.७८ लाख रुपयांच्या खर्चालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना दिलेला शब्द पूर्ण करत हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

 

या निर्णयामुळे आमदार अभिमन्यु पवार यांच्या गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. लातूर विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. यामध्ये सुरक्षा, तांत्रिक सुधारणा आणि प्रवासी सुविधा वाढविणाऱ्या विविध कामांचा समावेश आहे.

लातूर विमानतळाला नाईट लँडिंगची झेप; विकासाचा मार्ग मोकळा

नाईट लँडिंग सुविधा विकसित झाल्यानंतर भविष्यात लातूर विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांची शक्यता निर्माण होणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर विमानसेवा उपलब्ध होईल तसेच लातूरचा देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक मजबूत होणार आहे. याशिवाय विमानतळाची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार असून प्रवासी सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. या सुविधांमुळे भविष्यात लातूर विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लातूर विमानतळ विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी विधिमंडळात सातत्याने प्रश्न उपस्थित केले होते. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागांशी वारंवार संपर्क साधून निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल आमदार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले आहेत. लातूर विमानतळाचा विकास पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसेच गुंतवणूकदारांसाठी लातूर अधिक आकर्षक ठरणार असून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वाढीस गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा निर्णय केवळ विमानतळापुरता मर्यादित नसून, संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न

उच्चस्तरीय बैठकीतून सुरू झालेला विकासाचा प्रवास

लातूर विमानतळाच्या विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल २०२५ मध्ये उच्चस्तरीय बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला होता. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा : जायकवाडी धरणात दोन मित्रांनी गमावला जीव; सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले अन्…

मंजूर निधीतून पुढील प्रमुख कामे केली जाणार.

  • रनवे एंड सेफ्टी एरिया विकसित करणे
  • विमानतळ परिसराभोवती ३.३८ किमी लांबीची सुरक्षा भिंत उभारणे
  • ८ किमी लांबीचा व ४.५ मीटर रुंदीचा परिघीय रस्ता बांधणे
  • रनवेचे मजबुतीकरण व सुधारणारात्रीच्या उड्डाणांसाठी आवश्यक सुविधा विकसित करणे
  • अग्निशमन व आपत्कालीन सेवा केंद्रांचे आधुनिकीकरण
  • अँटी-हायजॅकिंग रूमचे नूतनीकरण अत्याधुनिक
  • सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा उभारणे

Web Title: The state government has approved funds for the development of latur airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Latur
  • Latur news

संबंधित बातम्या

Mahayuti candidate : ‘या’ मतदारसंघात राजकीय रंगत; महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात, 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल
1

Mahayuti candidate : ‘या’ मतदारसंघात राजकीय रंगत; महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात, 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; महायुतीकडून बसवराज पाटील, महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात
2

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; महायुतीकडून बसवराज पाटील, महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात

अवैध दारूविक्री विरोधात कठोर कारवाई करा; राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
3

अवैध दारूविक्री विरोधात कठोर कारवाई करा; राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा, मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार; अमित शहांची ग्वाही
4

साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा, मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार; अमित शहांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.