Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोंग्याबाबत अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय?; उपराकार लक्ष्मण माने यांचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेतल्याव्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिले आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2022 | 04:04 PM
भोंग्याबाबत अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय?; उपराकार लक्ष्मण माने यांचा सवाल
Follow Us
Follow Us:

सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेतल्याव्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिले आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा. राज्य शासनाला भोंग्यासंदर्भात अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे? घटनेने सर्वधर्मांना स्वातंत्र्य दिलेले आहे.

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर आपण स्वतः प्रसंगी गुन्हा दाखल करू, असा थेट इशारा उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांची याबाबत संवाद साधला येत्या २१ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सारे भारतीय अशी राज्यव्यापी यात्रा आरंभ करत असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले. त्याची सुरुवात ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माने पुढे म्हणाले, ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे. त्यांना माझे ओपन चॅलेंज आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांना फसविण्याचा धंदा बंद करावा. हिंदुराष्ट्राचा गळा काढणारे मूठभर लोक आहेत. अस्पृश्य भटके अल्पसंख्यांक ख्रिश्चन यहुदी लिंगायत जैन इत्यादी अल्पसंख्यांक जातींना हिंदू राष्ट्र हवे आहे का ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जातींचा अभ्यास करून त्यांचा समन्वय साधणारे भारतीय संविधान तयार केले असून ते सर्वोच्च आहे. त्या संविधानावर आक्रमण करून भाजपने देशात व राज्यात धुडगूस घातला आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

राज ठाकरे यांची लायकी काय आहे, अशी परखड टीका करून माने पुढे म्हणाले, त्यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेतला आहे. इतकेच मात्र त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीतील एक मोठे नेते होते. त्यांच्या विचारांचा आदर्श आणि वारसा राज ठाकरे यांनी घ्यावा. भोंगे जर उतरवले नाही तर आम्ही तलवारी काढू हे राज ठाकरे यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. भारतीय दंड विधानाप्रमाणे हा फौजदारी गुन्हा असून, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी आवाहन करतो की, त्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी अन्यथा घटनात्मक विधिमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या संदर्भात मी त्यांना पत्र लिहिणार असून, तशी विनंती करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे काम करत आहेत. घटनेच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या यांचा प्रतिकार केलाच पाहिजे. महाराष्ट्र आणि देशामध्ये कायद्याचे राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या राजकीय संवेदनशील परिस्थितीवर तर अवाक्षर काढायला तयार नाही. त्यांना जरा देखील लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशांमध्ये फाळणी सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आहे का? आणि हा अधिकार त्यांना कोणी दिला? असा जळजळीत सवाल लक्ष्मण माने यांनी केला. त्याकरिताच आम्ही भारतीय लोक हे अभियान महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी जाहीर केले. या उपोषणाला आपण सर्व भारतीयांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले या अभियानाची सुरुवात २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून करणार आहे.

या चळवळीमध्ये माझ्यावर हल्ला झाला तरी चालेल. पण कोणीतरी या बेबंदशाहीला विरोध करायला हवा म्हणून मी या संघर्षात उतरत असल्याचे माने यांनी सांगितले.

Web Title: Laxman mane criticized mns chief raj thackeray nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2022 | 04:04 PM

Topics:  

  • Laxman Mane
  • maharashtra

संबंधित बातम्या

TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
1

TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

धाराशिव जिल्हा परिषद राज्यात अव्वल; प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब ते सौरऊर्जा; ‘धाराशिव व्हिजन २०३०’ची राज्यभर चर्चा
2

धाराशिव जिल्हा परिषद राज्यात अव्वल; प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब ते सौरऊर्जा; ‘धाराशिव व्हिजन २०३०’ची राज्यभर चर्चा

Bhandara: बसस्थानकावरील पाणपोई बंदच; परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती
3

Bhandara: बसस्थानकावरील पाणपोई बंदच; परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
4

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.