
Pune Politics: आगामी जिल्हा परिषद (झेड पी), पंचायत समिती आणि नगर परिषदांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामध्ये बारामतीचाही समावेश असून त्या ठिकाणी शरद पवार व अजित पवार हे दोन्ही नेते व त्यांचे पक्ष आमच्यासाठी सारखेच प्रतिस्पर्धी आहेत. जुन्नरची निवडणूक मात्र, आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण व इतर पदाधिकाऱ्यांनी दिल्ली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार भवन येथील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
चव्हाण म्हणाले, पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निष्ठावंत वर अन्याय केला. पक्षाच्या नावावर पदे भोगूना भाजपमध्ये गेले. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही, पक्षाचे कार्यकर्ते पक्षासोबत आहेत. या कार्यकत्यांना सोबत येऊन आपण जिल्ह्यात पुन्हा पक्षाची उभारणी करणार आहे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सर्व गट, गण आणि वॉर्डात आपले उमेदवार उभे करणार आहे. लोणावळा, खखेड, हवेली, आंबेगाव, इंदापूरसह बारामतीमध्ये सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत.
दविदास भन्साळी म्हणाले, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ साली काँग्रेस लक्ष असाच अडचणीत आला होता. यावेळी अडचणींवर मात करून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले. आताही आम्ही ताकदीने लढून यश मिळवू. बारामतीमध्ये स्वबळावर निवडणूक लढत असताना शरद पवार व अजित पवार हे आमच्यासाठी एकसारखेच प्रतिस्पर्धी असतील, आम्ही कोणाच्याही पुढे झुकणार नाही. जिथे शक्य नाही, तिथे मात्र, आमचा आघाडी करण्याचा प्रयत्न असेल. पण आघाडी केल्यानंतर पक्षाचे व चिन्हाचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.