मुंबई : लोकसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. मागील दीड महिन्यांपासून देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का आणि भाजपला 400 पार करता येणार का असे अनेक प्रश्न समोर होते. दरम्यान, देशातील सर्व विरोधकांनी एकत्रित मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापना केली. इंडिया आघाडी एनडीए आघाडीवर काही प्रमाणामध्ये भारी पडली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी चुरशीची लढत झाली. राज्यातील 48 जागांपैकी 18 जागांवर महायुती तर 29 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. यामुळे भाजपचे अनेक संभाव्य उमेदवारांची दारुण पराभव झाला.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरस ठरली आहे. भाजपकडून अनेक प्रमुख आणि महत्त्वाच्या दावेदारांना उमेदवारीची संधी देण्यात आली होती. मात्र भाजप नेत्यांना मतदारांनी दणका दिला आहे. यामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी प्रचार केल्यानंतर देखील मुनगंटीवार तब्बल 2 लाख 42 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. तर रावसाहेब दानवे हे 3 तीन लाख 88 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. त्यानंतर अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा या तब्बल 4 लाख 59 हजार मतांनी पराभूत झाल्या आहेत. त्याचबरोबर अहमदनगरचे विखे पाटील घराण्याला धक्का बसला आहे. खासदारकीला दुसऱ्यांदा उभे असलेले सुजय विखे पाटील यांना तब्बल 14 हजार मतांनी पराभूत झाले आहे. हे भाजपसाठी हे सर्व उमेदवार स्टार मानले जात होते. त्यांचा पराभव मोठा धक्कादायक ठरला आहे.
त्यानंतर रामटेक येथील राजू पारवे हे देखील पराभूत झाले असून 65 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. त्याचबरोबर वर्धातील रामदास तडस हे 36 हजार मतांनी मागे आहेत. सांगलीमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील पराभूत झाले. भिवंडीतील कपील पाटील 3 लाख 63 हजार मतांनी पराभूत झाले. तसेच दिंडोरीच्या भारती पवार यांनी देखील 1 लाख तेरा हजार मतांनी पराभूत झाल्या आहेत. नंदुरबारच्या हिना गावित या 1 लाख 59 मतांनी पराभूत झाल्या आहेत. 2 लाख 93 हजार मतांनी पराभूत झाल्या आहेत. या सर्व उमेदवारांच्या झालेल्या पराभवामुळे भाजपला राज्यामध्ये जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे याचा परिणाम देशातील सरकार बनवण्यावर झाले आहेत. त्याचबरोबर महायुतीमध्ये असलेल्या मित्रपक्षांना देखील फटका बसला आहे. बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा 1 लाखांच्या मतांनी पराभव झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचे संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपची लाट आणि नरेंद्र मोदी यांची जादू ओसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये सभांचा धडका लावल्यानंतर देखील अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत.