• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Lok Sabha Suffered Due To Non Holding Of Local Body Elections Ajit Pawar

PCMC News: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने लोकसभेला फटका बसला: अजित पवार

महाराष्ट्रात कोण म्हणतं आमच्या जातीचे 1 कोटी लोकं आहेत, कोण म्हणतं 2 कोटी, अगदी कोण-कोण तर म्हणतात 4 कोटी आमची लोकसंख्या आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2025 | 09:24 AM
PCMC News: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने लोकसभेला फटका बसला: अजित पवार

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी  : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या, त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला. कारण गल्ली बोळातील, गाव-खेड्यातील लोकं थेट खासदारांकडे कसे काय येणार? ते स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जातात. मात्र, निवडणुका लागतील, लागतील या आशेपोटी ते वारेमाप खर्च करुन करुन थकले. मग याचा लोकसभेवेळी त्यांचा फटका बसला. आता निष्ठावान म्हणतात आमचं काय? पण आमची निष्ठा तुमच्यावर आहे अन् तुमची निष्ठा आमच्यावर आहे. आगामी पालिका निवडणुकांमध्ये 4 चे प्रभाग होण्याची शक्यता दाट आहे, त्या अनुषंगाने कामाला लागा. मुंबईचा मात्र एकच प्रभाग असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरी येथे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील अजित गव्हाणे यांच्यासह भोसरी विधानसभेतील विविध पक्षातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, भोसरी विधानसभेचे आमदार विलासशेठ लांडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? ‘हे’ शेअर्स पालटणार गुंतवणूकदारांचं नशिब

महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार रुजलेले आहेत,आपण तेच विचार घेऊन पुढं जातोय. मधल्या काळात आपलेच पदाधिकारी घेऊन त्यांना पदं देऊन इथं बदल घडवला. भाजपचे दिवंगत लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना उद्देशून अजित पवारांनी भाजपला टोला लगावला. तसेच, काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, ते शरीराने तिकडं होते, मनाने मात्र आपल्यासोबत होते हे मला ही जाणवत होतं. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजित गव्हाणे माझ्या संपर्कात होते. आता आम्हाला मान-सन्मान द्या, अशी चर्चा माझ्याशी होत होती, अशी आतली बातमी अजित पवारांनी सांगितली.

भोसरी संदर्भात बोलताना मिश्कील टिपण्णीही अजित पवारांनी केली. एक गाव भोसरी अन् दहा गावं दुसरी असं विलास लांडे म्हणाले. पण, दहा नव्हे तर बारा गावं दुसरी. उरलेली दोन गावं काय मोहिनीला (विलास लांडे यांच्या पत्नी) दिली का? असा मिश्कील सवाल अजित पवारांनी विचारला. त्यावर, उपस्थितांनी हसून दाद दिली. तसेच, गाव फिरून फिरून आलं की, दावणीला येतात. पण हे मी नाही म्हणालो, विलास लांडे म्हणतायेत. न्हायतर अजित म्हणेल मी ह्यांना दावणीला बांधले का? पण हे विलास म्हणाला. म्हणून मी अजित गव्हाणेला किती वेळा सांगत आलोय, अरे बाबा तू विलासचे ऐकत नको जाऊ, असा मिश्कील टोलाही अजित पवारांनी पक्षप्रवेश सोहळ्यातून लावली.

वयाच्या साठीत येईल चेहऱ्यावर चमकदार ग्लो! सकाळी नियमित खा ‘ही’ फळे, त्वचा राहील कायम तरुण आणि तेजस्वी

महाराष्ट्रात कोण म्हणतं आमच्या जातीचे 1 कोटी लोकं आहेत, कोण म्हणतं 2 कोटी, अगदी कोण-कोण तर म्हणतात 4 कोटी आमची लोकसंख्या आहे. म्हणजे या सर्व जाती धर्माची बेरीज केल्यावर महाराष्ट्राची लोकसंख्या 40 ते 50 कोटींवर जाऊन पोहचते. त्यामुळे एकदा प्रत्येकाला कळू द्या, कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे. त्यासाठी जनगणना होऊन जाऊ द्या. त्यानंतर 2029 ला लोकसभा मतदारसंघाची फेररचना होणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

धडधाकट असल्यावर काय होतं, हे आपण अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव व्यक्तिवरून अनुभवत आहोत. आपल्यातल्या अनेकांना ढेर फुटलेत, फुटलेत नाही सुटलेत. नाहीतर हे परत म्हणायचे, आता मध्ये जसं म्हणाले पेट्रोल चोरलं. पण, प्रत्यक्षात मी पेट्रोल सोडलं असं म्हणालो होतो. आता एकदा मला झटका बसलाय, मी सारखा सारखा कसा झटका बसवून घेईन, असे मिश्किलपणे अजित पवारांनी म्हटले.

Web Title: Lok sabha suffered due to non holding of local body elections ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Local Body Elections
  • Pimpri-Chinchwad News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
1

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट
2

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
3

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल
4

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Feb 17, 2026 | 05:14 PM
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Feb 17, 2026 | 05:04 PM
Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Feb 17, 2026 | 04:58 PM
कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

Feb 17, 2026 | 04:56 PM
Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Feb 17, 2026 | 04:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.