Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus News: महाबळेश्वर एसटीचा ‘राम भरोसे’ प्रवास अखेर संपला! १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

महाबळेश्वर एसटी आगारातील जुना ताफा बदलण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2026 | 01:38 PM
महाबळेश्वर एसटीचा 'राम भरोसे' प्रवास अखेर संपला! १० नव्या 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल

महाबळेश्वर एसटीचा 'राम भरोसे' प्रवास अखेर संपला! १० नव्या 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल

Follow Us
Follow Us:
  • महाबळेश्वर एसटीचा ‘राम भरोसे’ प्रवास अखेर संपला
  • १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल
  • एसटी प्रशासनाचा ढिसाळ कारभार
महाबळेश्वर : गेल्या अनेक दिवसांपासूनचा महाबळेश्वरकरांचा खिलखीळ्या झालेल्या बसेस मुळे प्रवाशांचा छळ, नवीन बससाठी केलेले उग्र आंदोलन, अनेक नेत्यांच्या उंबरठ्या झिजवून पदरी आलेली निराशा आणि एसटी प्रशासनाचा ढिसाळ कारभार… या सगळ्याला आता काही अंशी विराम मिळाला आहे. महाबळेश्वर एसटी आगाराचा ‘राम भरोसे’ झालेला आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा प्रवास अखेर सुधारणार आहे महाबळेश्वर आगाराला १० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे खिळखिळ्या झालेल्या आगाराला खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ मिळाली आहे.

महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असूनही येथील एसटी प्रशासनाने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना वाऱ्यावर सोडले होते . जुन्या, खिळखिळ्या गाड्या आणि बसेसची तीव्र टंचाई यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते . पर्यटन हंगामात तर बसेस अपुऱ्या पडत असल्याने पर्यटकांचे अतोनात हाल होत होते. यासाठी दोन्ही शिवसेनेच्या गटांनी अनेकवेळा आंदोलने केली, लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या केल्या, पण प्रत्येक वेळी पोकळ आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नव्हते. अखेर जनतेच्या मागणीची शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेतल्याने १० नवीन बसेस मंजूर होऊन ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

Raigad Fort : रायगडावर रंगणार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा, ४० समित्यांमार्फत जय्यत नियोजन, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

राज्य परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर आगारात या १० नवीन आणि सुसज्ज बसेसचे पूजन आज अत्यंत उत्साहात पार पडले यावेळी ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते केक कापून एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या नवीन गाड्या ताफ्यात आल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांमध्ये आणि हताश झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आता कुठे काही अंशी आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे .

महाबळेश्वरचा डोंगराळ भाग आणि वळणावळणाचे धोकादायक घाट रस्ते पाहता, जुन्या गाड्यांमुळे अपघाताची टांगती तलवार असायची. मात्र, आता दाखल झालेल्या या नवीन बसेस अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आणि अत्यंत आरामदायी आहेत त्यामुळे या वळणावळणाच्या घाटांमधून प्रवास करताना प्रवाशांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि सुसह्य होणार आहे यात शंका नाही.

या बस पूजन कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे राजेंद्र राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले, उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार, प्रवीण भिलारे,आगार व्यवस्थापक महेश जाधव, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्राजक्ता मोहिते, आगार लेखाकार महेश शिंदे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक जयवंत केदार, वाहतूक निरीक्षक शाहरुख खान, तसेच किरण धुमाळ,गणेश उतेकर, मेघा चोरगे, सतीश ओंबळे, विजय नायडू यांसह स्थानिक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कित्येक दिवसांची प्रतीक्षा संपवून महाबळेश्वरकरांना हक्काच्या गाड्या मिळवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राची लाडकी ‘दख्खनची राणी’ ९६ वर्षांची! सीएसएमटी स्थानकात वाढदिवस उत्साहात; पंजाब मेलची ११४ वर्षांची वाटचाल

Web Title: Mahabaleshwar st new rajmata jijau buses news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Mahabaleshwar
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
1

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
2

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.