Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra 1st Conclave 2026: मुंबईत होणार २५ लाख कोटींची विकासकामे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra 1st Conclave 2026: नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होते. यावेळी त्यांनी बोलताना आगामी काळात मुंबई आणि MMR क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांचा पाढा वाचला.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 08:18 PM
महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा संकल्प

महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा संकल्प

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील विकास प्रकल्पांसाठी तब्बल २५ लाख कोटी रुपयांची तरतूद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ मध्ये बोलताना फडणवीस यांनी दिली माहिती
  • बहुचर्चित उत्तन – विरार सी लिंक या महत्वकांक्षी प्रोजेक्ट्ला मंजुरी दिली
Maharashtra 1st Conclave 2026: नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हा भव्य कार्यक्रम मुंबईतील कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला असून, राज्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देण्यासाठी धोरणकर्ते आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज एकाच मंचावर एकत्र आले. यंदाच्या कॉन्क्लेवची प्रतिष्ठा अधिक वाढवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होते. यावेळी त्यांनी बोलताना आगामी काळात मुंबई आणि MMR क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांचा पाढा वाचला. मुंबईतील विकास प्रकल्पांसाठी तब्बल २५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत होत असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी बहुचर्चित उत्तन – विरार सी लिंक या महत्वकांक्षी प्रोजेक्ट्ला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाला अंदाजे तब्बल ५८ हजार ७५४ कोटी रुपये इतका खर्च अनुमानित असून या मार्गाची लांबी सुमारे ५५.१२ किलोमीटर इतकि असणार आहे. त्यात सी लिंकची लांबी २४.३५ किमी आणि रस्तेमार्गाची लांबी ३०.७७ किमी इतकी असवणार आहे. हा प्रकल्प सुमारे पाच वर्षात पूर्ण करण्याचा मानस असून या मार्गाचे नाव ‘मुंबई वाढवण एक्सप्रेस वे’ असे असणार आहे.

Maharashtra 1st Conclave 2026: महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा संकल्प

नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ मध्ये मुंबई आणि MMR क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “धारावी पुनर्विकास प्रकल्प सात वर्षात पूर्ण होईल. पुढच्या वर्षांपासून लोकांना घरं मिळणं सुरु होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अक्खी धारावी एक नवीन बीकेसी झालेली असेल. विरार अलिबाग कॉरिडॉरचे लँड अक्विझिशन पुढील ३ ते ४ महिन्यात आम्ही संपवू. त्यानंतर त्याच काम सुरु होईल. पुढच्या साडेतीन ते चार वर्षात आम्ही हे काम संपवू. मुंबई कोस्टल रोड नॉर्थ म्हणजे वर्सोवा ते भाईंदरपर्यंत जो आहे त्याचे वेगवेगळ्या टप्प्यात काम चालू आहे. आणि साधारणपणे त्याचे टप्पे हे २०२८ ते २०२९ मध्ये पूर्ण झालेले असेल. उत्तन विरार सी लिंकसाठी सगळ्या मान्यता झाल्या आहेत. माझ्या जपान दौऱ्यात जायका ने त्याचे अप्रुव्हल दिलं होतं. आता त्यांच्या प्रोसेसमध्ये आहे त्यासाठी अंदाजे एक वर्ष लागू शकतो. पण एक वर्ष ते सवा वर्षात आपण त्याच काम करू शकतो. उत्तन विरार सी लिंक हि देशातील सगळ्यात मोठी सी लिंक असेल त्यासाठी काम सुरु केल्यानंतर चार ते साडेचार वर्ष लागतील. वाढवणचा फेज १ हा आपण २०२८ साली पूर्ण करु शकतो. हे सगळे प्रोजेक्ट मिळून २५ लाख कोटी रुपयांची व्हॅल्यू तयार करेल. ठाणे बोरिवली बोगद्याचे काम चालू आहे. दुर्दैवाने त्याचे काम १५ महिने मागे आहे. मध्यंतरी जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यासाठी लागणारे साहित्य उशिरा आले. साधारणपणे हे काम २०२८ पर्यंत पूर्ण करायचं होतं पण आता हे काम २०२९ च्या मार्चपर्यंत पूर्ण करायचं आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

आरोग्य विभागाच्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

Web Title: Maharashtra 1st conclave 2026 cm devendra fadnavis says 25 lackh crore development work to be done in mumbai and mmr region

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mumbai News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ
1

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात
2

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा
3

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ
4

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.