Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 10.10.2026
Maharashtra to World Breaking News :
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष आणि कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीला छावणीचे रूप आले आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाने मेट्रो आणि रेल्वे प्रवासावर निर्बंध लादले असतानाही हळूहळू विद्यार्थी जंतरमंतर परिसरात दाखल होऊ लागले आहेत.
दिल्लीतील वाहतूक आणि सार्वजनिक निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत नागरिकांना दिलासा देण्यासाठी मेट्रो पूर्णपणे बंद न करण्याचे आणि नियम सौम्य करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातील MPSC आणि मानवाधिकार आयोगासह १४ महत्त्वाच्या शासकीय संस्थांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील शास्त्री रस्ता (नवी पेठ) येथे परवानगीशिवाय रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी १५ MPSC विद्यार्थी प्रतिनिधींवर एफआयआर (FIR) नोंदवला. मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय शांततेतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार नवी पिल्ले (Navi Pillay) यांना जाहीर झाला.
10 Oct 2026 09:15 AM (IST)
CJP Protest Live Updates: सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांनी दिल्लीत दाखल होण्यापूर्वी एक सूचक विधान केलं आहे. "हा आपला देश परत मिळवण्याचा लढा आहे! हा आपली लोकशाही वाचवण्याचा लढा आहे! हा 'जनरेशन-झेड'च्या भविष्यासाठीचा लढा आहे! मला माझ्या पिढीचा खूप अभिमान आहे. जोपर्यंत आपल्याला भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लढू. काही तासांत जंतर मंतरच्या परिसरात तुम्हा सर्वांना भेटू! हा एक दीर्घकाळ चालणारा लढा आहे." असा संदेश दास यांनी दिला आहे.
It’s a fight to reclaim our country!
It’s a fight to save our democracy!
It’s a fight for the future of us Gen-Zs!Incredibly proud of my generation. We will fight till we ensure a corruption-free system. See you all in and around Jantar Mantar in a few hours! It’s a long fight. 🇮🇳❤️✊🏻🪳
#CockroachesAssemble
— Saurav Das (@SauravDassss) October 10, 2026
10 Oct 2026 09:05 AM (IST)
CJP Protest Live Updates: दिल्लीतील काही भाग छावणी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आयएएनएसच्या वृत्तानुसार, राजधानीतील अंदाजे 56 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. दिल्लीत येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, जंतर मंतरच्या 5 किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे.
10 Oct 2026 09:00 AM (IST)
CJP Protest Today Live :आज दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर आणि पार्लमेंट स्ट्रीट परिसरात मोठा सुरक्षा दल तैनात करण्यात आला असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
#WATCH | Delhi: Heavy security has been deployed, and barricades have been put up at the Jantar Mantar and Parliament Street areas ahead of the protest today. https://t.co/6yzKOiOw6b
— ANI (@ANI) October 10, 2026
10 Oct 2026 08:50 AM (IST)
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाहून दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीला छावणीचे रुप आले आहे. दिल्ली पोलीस बॉडी कॅमेरे वापरणार आहेत. या कॅमेऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अंधारातही काम करतात आणि घटनांचे रेकॉर्डिंग करू शकतात. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "हे बॉडी कॅमेरे आमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आहेत."
#WATCH | Mumbai, Maharashtra: Cockroach Janta Party (CJP) Founder Abhijeet Dipke leaves for Delhi ahead of the protest today at Jantar Mantar. https://t.co/EZVIGtq9Tx
— ANI (@ANI) October 10, 2026






