Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 18.11.2026
Maharashtra to World Breaking News :
दिल्ली पोलिसांनी CJP चे सहसंयोजक सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना जंतर-मंतर परिसराचे कुंपण ओलांडून आत घुसल्यामुळे आणि घोषणाबाजी केल्यामुळे अटक केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात प्रवेशावर बंदी असतानाही बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी पक्षाच्या तीन प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आणि महिला फलंदाज शिफाली वर्मा यांना सप्टेंबर २०२६ महिन्यासाठीचा ‘ICC प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर झाला. ‘SIR’ प्रक्रियेतील त्रुटी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून ‘इंडिया’ आघाडीचे दिल्लीतील आंदोलन तीव्र झाले आहे.
यूपीआय (UPI) वर ₹२००० पेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर लागू होणारा मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) नियम दिवाळीनंतर लागू करण्याचा एनपीसीआयचा (NPCI) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
14 Oct 2026 05:59 PM (IST)
त्तर प्रदेशातील बहुचर्चित ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय झाला आहे. मर्चंट नेव्हीतील माजी कर्मचारी सौरभ राजपूत यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला या दोन्ही दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तब्बल १३ महिने चाललेल्या सुनावणीनंतर आज, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने शिक्षेचा निर्णय जाहीर केला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान १२७ हून अधिक तारखा झाल्या, तर २२ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. ३० सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने मुस्कान आणि साहिल यांना सौरभ राजपूत यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर आज दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
14 Oct 2026 05:45 PM (IST)
जगातील अत्यंत आर्थिक संकटात सापडलेल्या आणि प्रचंड कर्जबाजारी असलेल्या ३४ देशांनी एकत्र येऊन एक नवीन औपचारिक मंचाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, २९१ अब्ज डॉलर्सच्या प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानची (Pakistan) या नवीन संघटनेच्या अध्यक्षपदी एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. थायलंडमध्ये पार पडलेल्या कर्जदार देशांच्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
14 Oct 2026 05:30 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर एक नवीन सुरुवात केली आहे. या प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करताच कोहलीने अवघ्या १० तासांत १,००,००० फॉलोअर्स मिळवले.कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) व्यावसायिक खेळाडू म्हणून स्वतःची ओळख देण्याव्यतिरिक्त, त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये त्याने स्वतःला एक बिझनेसमॅन म्हणूनही संबोधले आहे. कोहलीने स्वतःला अॅगिलाटासमधील गुंतवणूकदार आणि वन८वर्ल्डचा सह-संस्थापक असल्याचेही सांगितले.
14 Oct 2026 05:15 PM (IST)
शेतीसाठी केलेली पाणी उपसाबंदी तात्काळ उठवणे, उसाला प्रतिटन ७,५०० रुपये दर देणे, साखरेची विक्री ७० ते ८० रुपये प्रति किलोने करणे आणि दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची जाचक अट रद्द करणे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेने पुकारलेल्या साखर वाहतूक बंद आंदोलनाला वाहतूकदार आणि वाहनचालकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविल्याने भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरील साखर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
14 Oct 2026 04:57 PM (IST)
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय आणि सामरिक संबंधांना अधिक गती देण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो (Marco Rubio India Visit) पुढील आठवड्यात भारताच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत करणे, प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक गुंतवणुकीच्या नव्या संधींवर सविस्तर चर्चा केली जाईल. या विशेष दौऱ्यामध्ये रुबियो हे भारतातील आर्थिक राजधानी मुंबई आणि औद्योगिक केंद्र असलेल्या जामनगरला भेट देणार आहेत. वाचा सविस्तर...
14 Oct 2026 04:47 PM (IST)
आठव्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नुकत्याच बंगळुरूमध्ये झालेल्या वेतन आयोगाच्या बैठकीत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांनी वेतनवाढ, पेन्शन, फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यांबाबत विविध मागण्या मांडल्या. यामध्ये कर्नाटक पोस्ट्स अँड टेलिकम्युनिकेशन्स पेन्शनर्स असोसिएशनने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन ६९ हजार रुपये आणि किमान पेन्शन ३४,४७० रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच वार्षिक वेतनवाढ ३ टक्क्यांवरून ६ टक्के करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, हे सर्व प्रस्ताव असून केंद्र सरकारने अद्याप अंतिम मंजुरी दिलेली नाही. वाचा सविस्तर...
14 Oct 2026 04:37 PM (IST)
जंतर मंतरवर तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. यासाठी तरुणांना तुरुंगात टाकणे हा भ्याडपणा आहे.” अशी टिका करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जंतरमंतर मैदानात तिरंगा फडकावून घोषणाबाजी केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र डागले आहे. वाचा सविस्तर...
14 Oct 2026 04:27 PM (IST)
बुधवारी आयसीसीच्या नव्या टी-20 क्रमवारीची घोषणा करण्यात आली. या ताज्या क्रमवारीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमध्ये वादळी शतक झळकावणारा व क्रिकेट विश्वात ‘सरपंच’ म्हणून नावाजलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने मोठी झेप आहे. अय्यर 3 क्रमांक पुढे सरकत आता फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग ठरले आहे. अय्यरने लखनऊच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वोत्तम फलंदाजी करताना शतकी खेळी केली होती. हे त्याच्या टी-20 इंटरनॅशनलमधील पहिले शतकही ठरले. या शतकीय खेळीचा फायदा अय्यरला नव्या रँकिंगच्या रुपात मिळाला.
14 Oct 2026 04:17 PM (IST)
राज्याच्या राजकारणात सध्या बरीच धामधूम सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. आधीच विरोधकांकडून तसेच विद्यार्थी आणि जेन झी कडून विविध विषयांवरून आंदोलने, निदर्शने होत आहेत. तसेच आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत कलहदेखील पाहायला मिळत आहे. अश्यातच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत असून पुण्यातील भाजपच्या 100 नगरसेवकांना पक्षाकडूनच नोटीशी धाडण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर...
14 Oct 2026 04:05 PM (IST)
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (बुधवार, 14 ऑकटोबर) महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आजची कॅबिनेट बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले? वाचा सविस्तर...
14 Oct 2026 04:00 PM (IST)
इलेक्ट्रिक कारमध्ये स्टायलिश लूकसोबत कम्फर्ट प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांसाठी MG मोटर इंडियाने खास नवीन एडिशन सादर केले आहे. कंपनीने MG विंडसर इंडल्ज एडिशन भारतीय मार्केटमध्ये लाँच केल असून, त्याची एक्स-शोरूम किंमत 17,99,800 रुपये आहे. या स्पेशल एडिशनमध्ये बाहेरील डिझाइन, केबिनमधील कलर आणि मागच्या सीटवरील प्रवाशांच्या कम्फर्टवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. पण कारच्या बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
14 Oct 2026 03:55 PM (IST)
Maharashtra Drought 2026: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (१४ ऑक्टोबर २०२६) दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची आगाऊ आर्थिक मदत जमा करण्याची घोषणा केली. यासोबतच राज्यातील आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला असून, आता एकूण ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra Drought 2026)
14 Oct 2026 03:50 PM (IST)
NEET Paper Leak Protests: पेपर लीक प्रकरणाविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठी बातमी समोर आली आहे. मेडिकल प्रवेश परीक्षेतील गोंधळाविरोधात झालेल्या निदर्शनांच्या काळात पोलिसांकडून झालेल्या कथित अत्याचाराच्या आणि चुकीच्या कारवाईच्या तक्रारींबाबत न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. बाधित लोकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी एक विशेष ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले असून ते लवकरच सुरू केले जाईल. याच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि आंदोलक पोलिसांचा कथित बलप्रयोग, चुकीची कारवाई आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांसंबंधीची माहिती समोर मांडू शकतील. मात्र, हे पोर्टल कधी सुरू होईल आणि तक्रारी कोणत्या प्रक्रियेद्वारे नोंदवल्या जातील, याची अधिकृत माहिती अद्याप समोर यायची आहे.
14 Oct 2026 03:45 PM (IST)
Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले. महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशात पुण्यात झालेल्या या आंदोलनाची चर्चा सुरू होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील मागण्यांनुसार, राज्य सरकारने एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (एमपीएससी) मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही अन्य सदस्याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
14 Oct 2026 03:40 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर : शहरातील हडको परिसरातील एन-१३ वानखेडेनगर येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजना नीलेश शेजवळ (२३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर पतीने आपली फसवणूक केल्याचे समोर आले आणि सासरीही मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. संजना ही जालना येथील रावसाहेब मगरे यांची धाकटी मुलगी होती. तिने कॉम्प्युटर डिप्लोमा पूर्ण केला होता. ४ जून २०२६ रोजी तिचे नीलेश शेजवळ याच्यासोबत लग्न झाले होते. लग्न जुळवताना नीलेशने आपण शासकीय अधिकारी असल्याचे सांगितल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीचे भविष्य सुरक्षित राहील, या विश्वासाने कुटुंबीयांनी थाटामाटात तिचे लग्न लावून दिले.
14 Oct 2026 03:35 PM (IST)
Aus vs Sa Test: ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इतिहास रचला आहे. डर्बन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी, जोश हेझलवूडने आपल्या गोलंदाजीने कहर केला. त्याने दक्षिण आफ्रिकेत्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४२१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात केवळ २०६ धावांवर गारद झाला. जोश हेझलवूडने ६ फलंदाजांच्या पव्हेलियनचा रस्ता दाखवत आफ्रिकन संघाला एकहाती गुंडाळलं. या जबरदस्त स्पेलसह हेझलवूडने संघाला विजय मिळवून दिला. यासह, त्याने ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला मागे टाकले आहे. (Josh Hazlewood surpassed Brett Lee in Test wicket)
14 Oct 2026 03:30 PM (IST)
Buldhana Water Shortage: आमदार संजय गायकवाड आणि नगरपरिषद प्रशासनाच्या बैठकीत ऑक्टोबर ते ऑगस्ट या कालावधीसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे तर नोव्हेंबर पासून शहरातील खाजगी बांधकामासाठी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या 50 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि घटत्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात या महिन्यातच ऐंशी टक्केच साठा शिल्लक असल्याने पुढे जून पर्यंत पाणीपुरवठ्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनासमोर उभे ठाकले आहे पाण्याचा अपव्याय अवैध उपसा आणि वितरणातील गळती रोखण्यासाठी आता कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
14 Oct 2026 03:25 PM (IST)
Milind Gawali: लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. १२ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तमाशाच्या फडातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मधू कांबीकर यांनी पुढे चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने कलाकारांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत मधू कांबीकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
14 Oct 2026 03:20 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघातील माजी सलामी फलंदाज आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) बुधवारी 45 वर्षांचा झाला. बुधवारी वाढदिवसानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. गंभीरला भारतीय संघातील माजी सहकारी युवराज सिंग आणि सुरैश रैनासह BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA)चे अध्यक्ष रोहन जेटली यांनी ‘GG’ ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. युवराजने गंभीरला Instagram वर शुभेच्छा दिल्या. ज्यात तो म्हणतो की, GG, तुला ठाऊक आहे की, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे व माझी इच्छा आहे की, तू आणखीन बळकट व्हावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाई. खूप पुढे जा आणि आम्हाला तुझ्यावर खूप गर्व आहे. खूप खूप प्रेम.
14 Oct 2026 03:15 PM (IST)
चंद्रपूर: राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या डॉ. जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत (खान अकादमी) विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हिडीओ पाहणे अपेक्षित आहे. यासाठी मुख्याध्यापकांना मोबाइलवर लॉगिन करून द्यायचे आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल, इंटरनेट सुविधा आणि नेटवर्क उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पद्मापूर केंद्रातील काही मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओच दाखविले नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याने शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाला निवेदन पाठविण्यात आले आहे.
14 Oct 2026 03:10 PM (IST)
बांगलादेशच्या राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत सध्या मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स (BRICS Summit Controversy) शिखर परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत शेख हसीना यांनी विद्यमान सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अपरिपक्व, अविवेकी आणि बांगलादेशच्या राष्ट्रीय हिताला थेट बाधा पोहोचवणारा असल्याचे म्हटले आहे.
14 Oct 2026 03:00 PM (IST)
टोयोटा किर्लोस्कर मोटरने 2026 टोयोटा ग्लान्झा फेसलिफ्ट भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. या प्रीमियम हॅचबॅकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे. नव्या मॉडेलमध्ये बदललेला फ्रंट लूक, सुधारित सेफ्टी फीचर्स आणि नवीन ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, टॉप व्हेरिएंटमध्ये लेव्हल 2 ADAS टेक्नोलॉजी आणि पेट्रोलसह सीएनजी मॉडेलमध्ये AMT गिअरबॉक्सचा ऑप्शन मिळतो. सविस्तर वाचा
14 Oct 2026 02:50 PM (IST)
पनवेल महानगरपालिकेतील ठराविक कामकाजाकरिता शासकीय, निमशासकीय कार्यालये, सिडको, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेतील सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी थेट मुलाखतीचे (Walk-in Interview) आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या १० जून २०१५ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवली जात आहे. सविस्तर वाचा
14 Oct 2026 02:40 PM (IST)
लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी असून मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडली बहना योजनेचा ४१वा हप्ता आज, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित केला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव उमरिया जिल्ह्यातील गुरुवाही गावात आयोजित कार्यक्रमातून सिंगल क्लिकद्वारे सुमारे १.२५ कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. मात्र, काही तांत्रिक त्रुटींमुळे लाभार्थी महिलांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
14 Oct 2026 02:30 PM (IST)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या थरारक हत्याकांडाचा कट नेमका कुठे आणि कसा शिजला? याचा छडा लावण्यासाठी ठाणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ ‘टल्ली’ आणि अमितसिंग ऊर्फ ‘पपलू’ या दोघांना न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे; तर मुख्य संशयित सुभाष शिंदे ऊर्फ ‘पप्प्या’ याच्या कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.सविस्तर वाचा
14 Oct 2026 02:22 PM (IST)
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांसमोर आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झालायशेतीसाठी दोन लाख रुपये खर्च करूनही हातात अवघे पाच ते दहा हजार रुपयांचं उत्पन्न येण्याची शक्यता आहे.सविस्तर वाचा
14 Oct 2026 02:00 PM (IST)
टेक कंपनी रिअलमीने पुन्हा एकदा त्यांच्या मिड-रेंज स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी कंपनीने त्यांच्या दोन स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोन्समध्ये Realme 16 आणि Realme 16T या दोन डिव्हाईसचा समावेश आहे. कंपनीने यापूर्वी देखील त्यांच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली होती. दिवाळीपूर्वीच कंपनीने दोन स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीच्या रिअलमी 16 सिरीजचा भाग आहेत, ज्याला गेल्यावर्षी सादर करण्यात आले होते.
14 Oct 2026 01:55 PM (IST)
संपूर्ण जगभरात हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा ( Climate Change) धोका दिवसेंदिवस अत्यंत गंभीर रूप धारण करत चालला आहे. अलीकडेच समोर आलेल्या वैज्ञानिक आकडेवारीनुसार आणि विश्लेषणांनुसार, २०२६ हे वर्ष मानवजातीच्या इतिहासातील आजवरचे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहे. जागतिक ख्यातीचे हवामान शास्त्रज्ञ जेम्स हॅन्सेन यांनी दिलेला इशारा आता खरोखरच वास्तवात उतरताना दिसत आहे. विविध आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि वैज्ञानिक गणितांच्या आधारे असा अंदाज वर्तवला जात आहे की, या वर्षातील वाढती उष्णता मागील सर्व जागतिक रेकॉर्ड मोडून काढेल.
14 Oct 2026 01:50 PM (IST)
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींना त्यांच्या शारीरिक दिसण्यावरून ट्रोल करण्याचे प्रकार वारंवार घडतात. विशेषतः प्रसूतीनंतर महिलांच्या वाढलेल्या वजनावरून त्यांना लक्ष्य केले जाते. अशाच प्रकारच्या बॉडी शेमिंगविरोधात विद्या बालनने आवाज उठवला असून, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. तिच्या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे.
14 Oct 2026 01:45 PM (IST)
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वरील लिफ्ट अचानक बंद पडल्याने लहान मुलांसह अनेक प्रवासी सुमारे १५ मिनिटे आत अडकून पडल्याची घटना घडली. लिफ्ट बंद पडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः लहान मुले घाबरून रडू लागल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली. मात्र, फेरीवाला समितीचे सदस्य भाऊ पाटील आणि स्थानिक फेरीवाल्यांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
14 Oct 2026 01:35 PM (IST)
इमारती, चौक्या आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडे तब्बल ११ कोटी २८ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी असतानाच, दुसरीकडे पोलिसांनीही बंदोबस्त शुल्कापोटी ५ कोटी २० लाखांची मागणी पालिकेकडे केली आहे. महापालिकेने पोलिसांचा हा दावा थेट फेटाळून लावल्याने दोन्ही यंत्रणांमध्ये आर्थिक देण्याघेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि वसुलीसाठी महापालिकेने हा संपूर्ण प्रस्ताव महासभेसमोर ठेवला आहे.
14 Oct 2026 01:30 PM (IST)
जगातील सुमारे १४० कोटी (१.४ अब्ज) कॅथोलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ (Pope Leo) यांना फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आल्याने जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अवघ्या १७ महिन्यांपूर्वी मे २०२५ मध्ये पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर सर्वोच्च धर्मगुरू पदावर विराजमान झालेल्या ७१ वर्षीय पोप लिओ यांच्या उजव्या फुफ्फुसात ही गाठ आढळली आहे. अलिकडेच पार पडलेल्या एका शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना या ट्यूमरची माहिती मिळाली. व्हॅटिकनने जारी केलेल्या अधिकृत वैद्यकीय बुलेटिननुसार, पोप लिओ यांच्या उजव्या फुफ्फुसाचा बाधित भाग यशस्वीरीत्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला आहे.
14 Oct 2026 01:25 PM (IST)
देशभरात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात वातावरण चांगले तापले आहे. निवडणूक आयोगातील मनमानी कारभार आणि एसआयआर प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. असे असतानाच दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. चंद्रू यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
14 Oct 2026 01:16 PM (IST)
महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण विरोधी कारवाई विभागाने बावधन बुद्रुक परिसरात कारवाई मोहीम राबवून पाच अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट जमीनदोस्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि.१३) कारण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडून पाचही प्लांटचा वीजपुरवठा महावितरणच्या मदतीने कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.
14 Oct 2026 12:59 PM (IST)
आदिवासी विद्यार्थ्यांना ‘सेंट्रल किचन’द्वारे पुरविण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता व कामकाजाच्या तपासणीसाठी शासनाने नऊ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला 30 ऑक्टोबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
14 Oct 2026 12:47 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "समान नागरी कायद्याला विरोध केलात तर तुम्हाला खलास करू," असे या पत्रात म्हटले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
14 Oct 2026 12:36 PM (IST)
रवींद्र धंगेकर म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, माजी आमदार सर्वांची बैठक शिंदेंसाहेबांनी नंदनवन येथे घेतली. बैठकीत पक्षाची चर्चा झाली की येणाऱ्या निवडणुकीत कसं काम करायचे. चर्चेमध्ये शिक्षक मतदारसंघाबाबत नाव येत होती. मात्र, शिदेंसाहेबांनी सर्व माहिती घेतली. अंतिम निर्णय तेच घेतील, असे देखील धंगेकर यांनी सांगितले. सानप काल नंदनवनला होते मात्र ते बैठकीत नव्हते, असे देखील त्यांनी सांगितले.
14 Oct 2026 12:29 PM (IST)
लातूर येथील आरोग्य उपसंचालक पदावर असलेल्या डॉक्टर रेखा गायकवाड यांना अखेर निलंबित करण्यात आल आहे, डॉक्टर रेखा गायकवाड कार्यकाळातील कामांची चौकशीचे आदेश राज्याच्या शहरी आरोग्यसेवा चे आयुक्त तथा राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियानाचे संचालक डॉक्टर सुनील भोकरे यांनी दिले होते दोन वेळा ही चौकशी समिती देखील बदलण्यात आली मात्र अखेर डॉक्टर रेखा गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.
14 Oct 2026 12:29 PM (IST)
राज्यात दुष्काळी स्थिती असून शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच आता सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे पिक पाहणीसाठी पैसे मागितल्याने महसूल सहायकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हणमंत सुरेश जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या महसूल सेवकाचे नाव असून या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे तक्रार केली होती. आमदारांनी याची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या.
14 Oct 2026 11:40 AM (IST)
प्रसिद्ध भारतीय युट्यूबर आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट ध्रुव राठी सध्या चर्चेच्या केंद्रात आहेत. १० ऑक्टोबर रोजी आंदोलनात सहभागी होण्याचे आणि गर्दी जमवण्याचे आवाहन केल्याच्या आरोपाखाली दिल्ली आणि गुरुग्राम पोलिसांनी ध्रुव राठी यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते, ज्यानंतर मोठा गदारोळ झाला. या मोठ्या राजकीय ड्रामा आणि वादानंतर ध्रुव राठी यांच्यासोबतच इंटरनेटवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोठ्या प्रमाणावर सर्च केले जात आहे, जिथे लोक त्यांची पत्नी जुली हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत
14 Oct 2026 11:25 AM (IST)
माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यात्वाचा एकाच वेळी राजीनामा दिला आहे. मुरुगन हे गेल्या अनेक काळापासून केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ते माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह संसदीय बाबींच्या मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळत होते.
14 Oct 2026 11:25 AM (IST)
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने उत्तर प्रदेशातील मेरठ रीजनमध्ये ‘बिजनेस करॉस्पॉन्डंट सुपरवायझर’ (Business Correspondent Supervisor) या पदाच्या ३ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात तरुणांसोबतच निवृत्त बँक अधिकाऱ्यांनाही अर्जाची संधी देण्यात आली आहे. उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. ही भरती १२ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
14 Oct 2026 11:16 AM (IST)
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठा भंग झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कालीघाट परिसरात घडली. दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात असताना एका महिलेने ममता बॅनर्जी यांच्याजवळ आक्रमकपणे जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. या महिलेच्या हातात चाकू असल्याचा दावाही पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या घटनेत ममता बॅनर्जी यांना कोणतीही इजा झालेली नाही.
14 Oct 2026 10:20 AM (IST)
Bihar Vaishali Boat Capsize Tragedy: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा परिसरात मंगळवारी रात्री एक अत्यंत दुःखद आणि भीषण अपघात घडला. गंगा नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटल्याने तब्बल १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघाताच्या वेळी या बोटीत सुमारे २० तरुण आणि अल्पवयीन मुले प्रवास करत होती.घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्कालीन मदत पथके आणि स्थानिक पाणबुड्यांच्या (Divers) मदतीने मोठे बचावकार्य राबवण्यात आले. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.प्राथमिक माहितीनुसार, मृत पावलेल्यांमध्ये बहुतांश अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे परिसरात शोककुळ वातावरण आणि मोठी घबराट पसरली आहे.
14 Oct 2026 10:10 AM (IST)
Maval Indrayani Rice Price Hike Drought: पावसाने दीर्घ ओढ दिल्याने आणि एल निनोच्या (El Nino) संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला असून, त्याचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. मावळ तालुक्यातील प्रसिद्ध 'इंद्रायणी' तांदळाच्या दरात किलोमागे तब्बल २० रुपयांनी वाढ होण्याची दाट शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
मावळ तालुक्यातील साडेबारा हजार हेक्टर भातशेती क्षेत्रापैकी तब्बल ६५ ते ७० टक्के क्षेत्राला पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून, काही ठिकाणी उभे पीक करपून गेले आहे. दरवर्षी ५०० ते ५५० टन होणारे इंद्रायणी भाताचे उत्पादन यंदा केवळ १५० ते २०० टनांवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
14 Oct 2026 10:02 AM (IST)
राज्यात सध्या दुष्काळाने भयानक रूप धारण केले असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ऐन हिवाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांच्या डोईवर हंडे आले आहेत, तर पाण्याचा थेंब नसल्याने आणि रोजगाराची साधने संपल्याने अनेक गावे ओस पडू लागली आहेत. पोटापाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे शहरांकडे स्थलांतर सुरू झाले आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे, तर 'ट्रिगर २' (Trigger 2) अंतर्गत ४३ तालुके संकटात आहेत. या ४३ तालुक्यांपैकी आणखी काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत आज अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
14 Oct 2026 09:40 AM (IST)
बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. देवीच्या नऊ रुपांपैकी हे चौथे रुप मानले जाते. कुष्मांडा म्हणजे आपल्या दिव्य हास्याने सृष्टीची निर्मिती करणारी शक्ती. त्यामुळे माता कुष्मांडा यांना सृष्टीची आदीशक्ती, ऊर्जा आणि आरोग्य देणारी देवी म्हणून पूजलं जातं.
14 Oct 2026 09:30 AM (IST)
Mumbai News: फळा स्पष्ट दिसत नसल्याने अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक नेत्रोपचार उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाने यांच्या समन्वयाने ‘बाल दृष्टी’ हा वेगळ्या प्रकारचा पहिला उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. तीन वर्षाच्या कालावधीत महापालिकेच्या १२०० शाळांमधील तीन लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून निश्चित करण्यात आले आहे.
14 Oct 2026 09:16 AM (IST)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा चांगलाच तडाखा बसत आहे. मात्र, आता ‘ऑक्टोबर हिट’मुळे वाढलेला उकाडा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील हवामानाची स्थिती आणि दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सूनच्या पावसासाठी अनुकूल होत असलेल्या वातावरणामुळे राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
14 Oct 2026 09:05 AM (IST)
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप यांना शिवसेनेचा (शिंदे गट) पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' येथे पार पडत असलेल्या बैठकीमध्ये प्रा. सचिन सानप यांच्या नावावर आणि त्यांना पाठिंबा देण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सचिन सानप हे स्वतः एक प्राध्यापक असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शिक्षकांचे विविध प्रश्न आणि त्यांच्या अडीअडचणी लावून धरत आहेत.






