काय घडलं नेमकं?
१५ वर्षांचा मुलगा तहजीम मंगळवारी संध्याकाळी ट्यूशनवरून घरी परतत होता. त्यावेळी वाटेत त्याला काही मुले त्याच्या मित्रांना मारहाण करत असल्याचे दिसले. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या मुलांनी तहजीमलाही पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या तहजीमने तातडीने वडिलांना फोन करून ‘बाबा मला वाचवा’ अशी विनवणी केली. मुलाचा आक्रोश ऐकून उमरदीन आपल्या पत्नीसह तातडीने घटनास्थळी पोहोचले.
मात्र उमरदीन तिथे पोहोचल्यावर हल्लेखोर अधिक संतप्त झाले.
हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तूल काढली आणि त्याने आधी हवेत गोळीबार केला. मात्र त्यांनतर थेट उमरदिन यांच्या छातीवर गोळी झाडली. मुलाच्या आणि पत्नीच्या डोळ्यादेखत उमरदिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने गुरु तेग बहादूर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही संशयितांची ओळख पटली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तैनात केली आहेत. या घटनेने उमरदीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार मुली आणि मुलगा तहजीम असा परिवार आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे.
Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”
Ans: दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
Ans: मुलाला वादातून सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी संतप्त झाले आणि गोळीबार केला.
Ans: सीसीटीव्ही तपासणीसह आरोपींचा शोध सुरू आहे.






