
Maharashtra Breaking News Updates Today:
26 Mar 2026 01:03 PM (IST)
आयपीएल २०२६ लवकरच येत आहे. मागील हंगामाप्रमाणेच, यातही १० संघ सहभागी होत आहेत. ही स्पर्धा २८ मार्च रोजी सुरू होईल. पहिला सामना आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. आयपीएलच्या १९ व्या हंगामात नऊ भारतीय कर्णधार सहभागी होत आहेत. पॅट कमिन्स हा या लीगमध्ये एकमेव परदेशी कर्णधार आहे. तर, पाहूया यापैकी कोणता कर्णधार विजेतेपद पटकावेल आणि कोणामध्ये सर्वाधिक क्षमता आहे.
26 Mar 2026 01:00 PM (IST)
नाशिकच्या वादग्रस्त ‘कॅप्टन’ अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन बाबा’ याच्या पापाचा घडा आता आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांनी भरू लागला आहे. 31 डिसेंबरला परदेशात विशेष पूजा केल्यास ‘विशेष लाभ’ मिळतो. तसेच वर्षातून तीनवेळा अशी पूजा केल्यास भरभराट होईल, अशी अपेक्षा दाखवत एका सधन भक्ताला लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
26 Mar 2026 12:55 PM (IST)
आग्र्यात भाडेकरूने घरमालकाच्या 8 वर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या केली. मृतदेह पिठाच्या डब्यात लपवण्यात आला. घटनेनंतर संताप उसळला असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी शोधासाठी पथके तैनात के
26 Mar 2026 12:45 PM (IST)
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक ह्युमनॉइड रोबोटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या रोबोटने अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या एन्ट्रीन संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाइट हाउसमध्ये नुकतेच फॉस्टरिंग फ्युचर टुगेदर या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ह्युमनॉइड रोबोटने मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
26 Mar 2026 12:40 PM (IST)
आयपीएल झाल्यानंतर भारताचा संघ आणि बीसीसीआयचे लक्ष आगामी एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष असणार आहे. मागील काही वर्षामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. 2023 च्या विश्वचषकामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत झाल्यानंतर भारताच्या संघाची नजर आता 2027 च्या विश्वचषकावर असणार आहे. आयपीएल २०२६ दरम्यानही, बीसीसीआय एकदिवसीय विश्वचषक २०२७ साठी २० स्टार खेळाडूंवर लक्ष ठेवून असेल. या खेळाडूंपैकी १५ जणांना पुढील वर्षभरात विस्तारित संधी दिली जाईल.
26 Mar 2026 12:35 PM (IST)
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून, जागतिक चर्चेत ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ हा विषय चर्चेत राहील. कारण हा एक अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असून ज्यातून जगातील २० टक्के कच्च्या तेलाची आणि लाखो टन नैसर्गिक वायूची वाहतूक होते. भारताचाही ऊर्जेच्या गरजांचा मोठा भाग याच मार्गाद्वारे पूर्ण केला जातो; मात्र, इराणने सध्या या मार्गावर कडक नाकेबंदी लागू केली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिणामांशी आशियाई आणि आखाती देश आधीच झगडत असताना, इराण आता आणखी एका मार्गावर अडथळे निर्माण करण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे अनेक देशांसमोर तेलाचे तीव्र संकट उभे राहू शकते.
26 Mar 2026 12:30 PM (IST)
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडचा जनरेशन-झेडवर लक्ष केंद्रित करणारा फॅशन ब्रँड OWND! भारतात ७५ स्टोअर्ससह मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे. ब्रँडने दोन नवीन स्टोअर्स लाँच करत मुंबईमध्ये प्रवेश केला आहे, जो ब्रँडच्या विकास प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. यासह ब्रँडने प्रमुख फॅशन-केंद्रित बाजारपेठांमध्ये उपस्थिती दृढ करणे सुरू ठेवले आहे.
26 Mar 2026 12:25 PM (IST)
जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या अत्यंत वेगवान हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी आता इराण युद्धाबाबत आपला सर्वात मोठा आणि अंतिम निर्णय घेतला आहे. “मला अजून बरेच काम करायचे आहे,” असे म्हणत ट्रम्प यांनी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना आणि सल्लागारांना हे युद्ध येत्या ४ ते ६ आठवड्यांत संपवण्याचा कडक आदेश दिला आहे. ट्रम्प यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे केवळ इराणच नाही, तर संपूर्ण जगाचे लक्ष आता व्हाईट हाऊसकडे लागले आहे.
26 Mar 2026 12:20 PM (IST)
इंटरनेटपासून डिस्कनेक्ट असण्याचा अर्थ तुमचा संगणक सुरक्षित आहे असा होत नाही. २०२५ पर्यंत, भारतातील तीनपैकी एक वैयक्तिक संगणक (पीसी) वापरकर्ता स्थानिक, ऑफलाइन सायबर हल्ल्यांचे लक्ष्य बनेल. सायबर सुरक्षा क्षेत्रातील दिग्गज कंपनी कॅस्परस्कीने एका अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान त्यांनी भारतात ६४.६ दशलक्षाहून अधिक स्थानिक सायबर हल्ले शोधून रोखले.
26 Mar 2026 12:15 PM (IST)
राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला हादरा देणारी अवैध वाहतूक अजूनही बेधडक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून एसटी आणि आर.टी.ओ. विभागाने संयुक्त मोहीम राबवली नाही, तर सुरू असलेल्या कारवाया केवळ दिखाऊ ठरतील, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
26 Mar 2026 12:10 PM (IST)
भारतातील अग्रगण्य शेअर ब्रोकर असलेल्या ‘Zerodha’ ने इंट्राडे डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंगमध्ये सहभागी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी नवे नियम लागू करणार आहे. कंपनीने १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या निर्णयानुसार, विशिष्ट इंट्राडे ‘फ्युचर्स आणि ऑप्शन्स’ (F&O) व्यवहारांसाठीचे ब्रोकरेज शुल्क प्रति ऑर्डर २० वरून वाढवून ४० करणार असल्याचे सांगितले आहे. जेव्हा डेरिव्हेटिव्ह्ज बाजार आधीच दबावाखाली असून त्यातील व्यवहारांच्या प्रमाणात घट होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
26 Mar 2026 12:06 PM (IST)
नवी दिल्ली/मॉस्को : पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक राजाकारणात वेगाने बदल होत आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध(US Israel Iran War) मुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ सामुद्रधुनी बंद आहे. यामुळे जागतिक उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच वेळी भारताचा सर्वात जुना मित्र रशियाने एकामागूएक धक्कादायक निर्णय खेले आहेत. रशियाने मात्र भारताला स्वस्त दरात तेल विकण्यास नकार दिला. याशिवाय खतांची निर्यातही थांबवली. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
26 Mar 2026 11:57 AM (IST)
आज देशभरात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी, गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी, देशभरात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. रामनवमीच्या निमित्ताने दागिन्यांची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. रामनवमीमुळे आज एमसीएक्स (MCX) सकाळच्या सत्रासाठी बंद राहील, परंतु सायंकाळच्या सत्रात व्यापार पुन्हा सुरू होईल, जे सायंकाळी ५ ते रात्री ११:३० पर्यंत चालेल.
26 Mar 2026 11:47 AM (IST)
‘धुरंधर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमावत आहे. पण त्याभोवतीचा वाद शमण्याची काही चिन्हे दिसत नाही आहेत. इंटरनेटवर चित्रपटाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या दाव्यांमुळे दिग्दर्शक आदित्य धर नाराज आहेत. बनावट एआय व्हिडिओ तयार करून चित्रपटाच्या आशयात फेरफार करणाऱ्यांवर त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
26 Mar 2026 11:37 AM (IST)
राज्यातील शिक्षकांवर वाढत चाललेल्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘स्कॉफ’ अॅपद्वारे माहिती अपलोड करण्याची सक्ती करण्यात आल्याने शिक्षक संतप्त झाले आहेत. “आम्ही शिकवू की अशैक्षणिक कामे करू?” असा थेट सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. या नव्या प्रणालीमुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडत असून, अध्यापनाच्या कामावर त्याचा परिणाम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
26 Mar 2026 11:27 AM (IST)
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि इथल्या आध्यात्मिक परंपरेची खोली मोजणे विज्ञानालाही अनेकदा कठीण जाते. असाच एक प्रसंग केरळमधील ( Kerala) प्रसिद्ध कोडुंगल्लूर भगवती मंदिरात घडला आहे. सध्या सोशल मीडियावर एका परदेशी व्लॉगरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही व्लॉगर भारताच्या सांस्कृतिक वारशाचे चित्रीकरण करण्यासाठी केरळमध्ये आली होती, मात्र उत्सवाच्या परमोच्च क्षणी तिच्यासोबत जे घडलं, ते पाहून ती स्वतः आणि तिचे लाखो फॉलोअर्स थक्क झाले आहेत.
26 Mar 2026 11:17 AM (IST)
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US Israel Iran War) संपूर्ण जगभरात मोठे इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. या युद्धाचे पडसाद फिलिपिन्समध्येही उमटले आहे. याच पार्श्वभूमीवर फिलिपिन्सने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणी केली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशी आणीबाणी जाहीर करणारा फिलिपिन्स हा जगातील पहिला प्रमुख देश ठरला आहे.
26 Mar 2026 11:07 AM (IST)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे माजी मालक विजय मल्ल्या यांनी संघाची १६,५०० कोटी रुपयांना विक्री झाल्याबद्दल नवीन मालकांचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, २००८ मध्ये जेव्हा त्यांनी ४५० कोटी रुपयांना संघ विकत घेतला होता, तेव्हा लोक त्यांच्यावर हसले होते. आता आपली गुंतवणूक इतकी वाढलेली पाहून मल्ल्या आनंदी आहेत. मल्ल्या म्हणाले की, आरसीबी नेहमीच त्यांच्या रक्तात राहील आणि यावेळी त्यांनी विराट कोहलीचाही उल्लेख केला.
26 Mar 2026 10:51 AM (IST)
वाशिम जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या वाढत्या ओझ्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत शिक्षण विभागाला निवेदन सादर केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांना जड दप्तरांचा भार सहन करावा लागत असून, शिक्षणाचे साधन असलेले दप्तरच आता त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे मनसेने स्पष्ट केले.
26 Mar 2026 10:43 AM (IST)
“ऑपरेशन सिंदूर” ही भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे २०२५ रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांविरुद्ध केलेली एक मोठी लष्करी कारवाई होती. एप्रिल २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये २६ निष्पाप पर्यटक ठार झाले होते. चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट बनवतील अशी काही काळापासून अटकळ होती. आता विवेक अग्निहोत्री यांनी याला दुजोरा दिला आहे. दिग्दर्शक याबाबत नक्की काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
26 Mar 2026 10:35 AM (IST)
इराण-अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जगात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या युद्धाला महिना पूर्ण होत आहे. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक संधीच्या रूपाने समोर आला आहे. त्यांना युद्धस्थितीमुळे आर्थिक लाभ मिळतो आहे. होर्मुझमधील नाकेबंदीमुळे आशियातील देशांना नवीन पुरवठादार शोधता आले आहेत, जिथे रशियन तेल एक सोपा पर्याय बनले आहे आणि त्याची बाजारपेठ विस्तारली आहे.
26 Mar 2026 10:27 AM (IST)
भारत सरकारने देशातील विमान वाहतूक संरचना, इमिग्रेशन प्रणाली आणि जागतिक हवामान वचनबद्धता मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण ३०,६४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आणि धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देणारी नवी उड्डाण योजना आणि ‘आयव्हीएफआरटी ३.०’ चा विस्तार यासह पॅरिस कराराअंतर्गत भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाशी (एनडीसी) संबंधित एका महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयाचा समावेश आहे. या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी मॉडिफाइड उड्डाण योजना आखली आहे.
26 Mar 2026 10:19 AM (IST)
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) द्वारे आयपीएल क्रिकेट फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) च्या विक्रीमध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) साठी दिलेले ५४० कोटी रुपये आणि खरेदीदार गटाकडून क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयला दिले जाणारे पाच टक्के कमिशन यांचा समावेश आहे. या विक्रीने आता जवळपास २ अब्ज डॉलर्स (१८,७७६ कोटी रुपये) या विक्रमी उच्चांकाला मजल मारली आहे.
26 Mar 2026 10:12 AM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खानावळीत फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना आदित्य भावार-खानावळीत मंगळवारी घडली. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय 23, रा. डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे आहे. तो पुण्यातील शिवाजीनगर कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
26 Mar 2026 09:50 AM (IST)
Israel destroys Iran submarine base Isfahan : मध्य-पूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता एका अशा भीषण वळणावर पोहोचले आहे, जिथे इस्रायलने इराणच्या अस्तित्वावरच घाला घालण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारची रात्र इराण आणि लेबनॉनसाठी काळरात्र ठरली. इस्रायली हवाई दलाने (IAF) अत्यंत अचूक गुप्त माहितीच्या आधारे इराणच्या लष्करी शक्तीचा कणा असलेल्या इस्फहान येथील पाणबुडी उत्पादन केंद्रावर भीषण हल्ला केला. या एका हल्ल्याने इराणने गेल्या कित्येक वर्षांपासून नौदलात वर्चस्व मिळवण्यासाठी केलेली मेहनत मातीत मिसळली आहे.
26 Mar 2026 09:40 AM (IST)
ढाका: बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. दौलतदिया फेरी टर्मिनलजवळ प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस थेट पद्मा नदीच्या पात्रात कोसळली. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत २३ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अद्याप अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रात्रभर बचावकार्य सुरू मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. बस नदीत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रात्रभर शोधमोहीम राबवली. अंधार आणि नदीचा प्रवाह यामुळे बचावकार्यात काही प्रमाणात अडथळे आले, तरीही पथकाने २३ मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
26 Mar 2026 09:38 AM (IST)
कोल्हापूर: महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक चालता-बोलता कोश काळाच्या पडद्याआड गेला आहे.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठा कालखंड आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या इतिहासाच्या संशोधनासाठी समर्पित केले होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि केलेले सखोल संशोधन हे नवोदित संशोधकांसाठी दीपस्तंभासारखे राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि इतिहास संशोधन क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.
26 Mar 2026 09:35 AM (IST)
काही गोष्टी या दिसायला सुंदर तर असतात पण त्यांचा इतिहास आणि कथा आपल्याला आणखी थक्क करुन जातात. आज आम्ही युरोपच्या एका ऐतिहासिक आणि सुंदर चर्चची माहिती सांगणार आहोत ज्याचा इतिहास फारच रंजक आहे. या चर्चचे नाव आहे सेंट जॉन को-कॅथेड्रल. माल्टाची राजधानी व्हॅलेटा येथे वसलेले हे कॅथोलिक कॅथेड्रल सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांना समर्पित चर्च आहे. या चर्चचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्य म्हणजे, जरी त्याचा बाह्य भाग साधा दिसत असला तरी, त्याचा अंतर्भाग तितकाच भव्य आणि कलात्मक आहे. चला तर मग या चर्चविषयीची मनोरंजक तथ्ये जाणून घेऊया. वाचा सविस्तर-
26 Mar 2026 09:31 AM (IST)
‘धुरंधर 2: द रिवेंज’ने चित्रपटगृहांमध्ये आपला पहिला आठवडा पूर्ण केला असून बॉक्स ऑफिसवरील त्याची गती अजूनही कायम आहे. तब्बल ३ तास ४९ मिनिटांचा कालावधी असतानाही, आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने वीकेंडनंतरही चांगली स्थिरता राखली आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यातील विक्रमी कमाई हा केवळ योगायोग नव्हता, हे स्पष्ट झाले आहे. पहिल्या ६० तासांत २४० कोटी रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर रणवीर सिंहचा हा चित्रपट सातव्या दिवशी ६०० कोटींच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. उगादी आणि गुढी पाडवा या सणांच्या पार्श्वभूमीचा फायदा घेत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड ठेवली असून चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
26 Mar 2026 09:27 AM (IST)
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) आगामी हंगामासाठी पाच वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ एका मोठ्या परिवर्तनासह मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. एकेकाळी 'डॅड्स आर्मी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाने आता कात टाकली असून, टी-२० क्रिकेटमधील वाढती स्पर्धा पाहता युवा खेळाडूंवर मोठी गुंतवणूक करण्याचा पवित्रा घेतला आहे. २०२६ च्या लिलावात सीएसकेच्या धोरणात झालेला हा बदल प्रकर्षाने दिसून आला.
26 Mar 2026 09:22 AM (IST)
Narhari Zirval Viral Video: राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा कचाट्यात सापडले आहेत. नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये एक मंत्री झिरवाळ मांस आणि दारुचे सेवन करताना दिसत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे झिरवाळ एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. हा व्हिडीओ काल रात्रीपासून व्हायरल होत असल्याने राज्याचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव पवन यादव असे असून तो तृतीयपंथी असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वाचा सविस्तर-
India All Party Meeting : नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण संघर्षाच्या (US Iran War) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मध्यपूर्वेतील संघर्षावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली. तसेच देशातील उर्जा आणि इंधन पुरवठ्यावरही महत्त्वपूर्ण विधान केले. याशिवाय मध्यपूर्वेतील संघर्षात पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेला भारत दलाल देश नाही हे ठणकावून सांगितले.