
Top Marathi News Today Live:
18 Nov 2025 10:52 AM (IST)
गौरव खन्नाची पत्नी आणि फरहाना भट्टची आई घरात प्रवेश करतील. दोघांमध्ये एक टास्क देखील दाखवला जाईल. या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये गौरवची पत्नी आकांक्षा घरात प्रवेश करते. आकांक्षा घरातल्या गोठलेल्या लोकांमध्ये गौरवला शोधताना दिसते. दोघे भेटतात आणि गौरव त्याच्या पत्नीला पाहून भावुक होतो. अमल त्यांचे प्रेम पाहून डोळे बंद करतो. गौरवच्या चाहत्यांसाठी ही केमिस्ट्री खास असेल. आकांक्षा म्हणते की तो कर्णधार नसतानाही एक नेता वाटतो आणि तो शो जिंकू शकतो.
18 Nov 2025 10:44 AM (IST)
गेल्या काही काळापासून आयुष्याशी झुंज देत असलेले ओडिया गायक ह्युमन सागर आता या जगात नाहीत. सोमवारी संध्याकाळी वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, ज्यामुळे ओडिया चित्रपट आणि संगीत उद्योगात धक्का बसला आहे. लाखो हृदयांना स्पर्श करणारे सुर कायमचे शांत झाले हे पाहून चाहते निराश झाले आहेत. तसेच त्यांच्या या अचानक जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
18 Nov 2025 10:35 AM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये, असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्याच्या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याने राज्यातील पालिका निवडणुकांवर टांगती तलवार लटकली आहे.
18 Nov 2025 10:27 AM (IST)
रशियन तेल खरेदीवरुन पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) बरसले आहे. पुन्हा एकदा त्यांनी जगभरातील रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांनी उघड धमकी दिली आहे. रशियाशी व्यापार करणाऱ्यांवर अनेक कठोर निर्बंध लादले जातील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांचे हे बदलते सूर पाहून आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ उडाला आहे.
18 Nov 2025 10:19 AM (IST)
माजी भारतीय क्रिकेटपटू, अभिनेता आणि प्रशिक्षक योगराज सिंग, जे दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगचे वडील आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या खोल एकाकीपणाबद्दल उघडपणे सांगितले आहे. ६२ वर्षीय योगराज सिंग म्हणाले की ते त्यांच्या गावी एकटे वेळ घालवत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात पाहण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी काहीही शिल्लक नाही.
18 Nov 2025 10:11 AM (IST)
तुम्ही देखील तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात का? थांबा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा गॅझेटबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कमी किंमतीत टिव्हीवरील शो देखील पाहता येणार आहेत आणि यासोबतच तुम्हाला घरातच थिएटरसारखा अनुभव देखील मिळणार आहे.
18 Nov 2025 10:03 AM (IST)
राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच गुलाबी थंडीचा जोर वाढला असून, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटे धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात शिरल्याने किमान तापमानात अचानक घसरण झाली आहे. पुणे, नाशिक, मुंबईपासून ते कोल्हापूर-साताऱ्यापर्यंत गारठा जाणवू लागला आहे.
18 Nov 2025 09:59 AM (IST)
‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व गाजवणारा आणि सोशल मीडियावर आपल्या रिल्सने धमाका करणारा सुरज चव्हाण आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची नुकतीच तयारी सुरु झाली असून, सुरजने नवीन घरात गृहप्रवेश देखील केला आहे. सुरज लवकरच लग्न करणार असून, त्यापूर्वी त्याने त्याच्या नवीन घरात प्रवेश केला आहे. सुरज चव्हाणने गृहप्रवेशाचा एक सुंदर व्हिडीओ आणि नवीन घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच सुरजचे चाहते त्यांचे नवीन घरासाठी अभिनंदन करत आहेत.
18 Nov 2025 09:55 AM (IST)
टेक कंपनी FIZIX ने भारतात नवीन प्रोजेक्टर लाँच केला आहे. कंपनीने हा प्रोजेक्टर FIZIX FX-PRO या नावाने लाँच केला असून यामध्ये अनेक दमदार AI फीचर्स देण्यात आले आहेत. हा कंपनीचा पहिला असा प्रोजेक्टर आहे, ज्यामध्ये AI मेमोरीसिंक आणि AI ब्राइटबूस्ट सारखे स्मार्ट फीचर्स दिले आहेत. या फीचर्सच्या मदतीने प्रोजेक्टरचा वापर अधिक सोपा आणि मजेदार होणार आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या प्रोजेक्टरवर उत्तम पिक्चर क्वालिटी देखील मिळणार आहे.
18 Nov 2025 09:50 AM (IST)
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ गेल्या सोमवारी (दि.10) एक मोठा बॉम्बस्फोट झाला. यामध्ये जीवितहानीसह वित्तहानीही झाली. या बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान पोलिसांनी काही धक्कादायक पुरावे शोधून काढले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनहरी बाग पार्किंग लॉट आणि बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण 68 संशयास्पद मोबाईल नंबर सक्रिय होते. हे 68 मोबाईल नंबर आता तपासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या नंबरवर पाकिस्तान आणि तुर्कीमधून कॉल आले होते.
18 Nov 2025 09:45 AM (IST)
टेंभुर्णी : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यात सोलापूरच्या टेंभुर्णीत एक भीषण अपघात झाला. टॅंकरने दुचाकीला मागून धडक देऊन झालेल्या अपघातात बादलेवाडी (ता.माढा) येथील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१७) दुपारी बाराच्या सुमारास विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या जवळ झाला.
18 Nov 2025 09:40 AM (IST)
कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. परिणामी, भारतीय संघ आता दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकू शकणार नाही. भारतीय संघासाठी आणखी चिंताजनक बाब म्हणजे या सामन्यात कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला होता आणि दोन्ही डावात फलंदाजी करू शकला नाही. आता, धोका असा आहे की शुभमन गिल शनिवारी, २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो. अशा परिस्थितीत त्याची जागा कोण घेईल? हा एक मोठा प्रश्न आहे.
18 Nov 2025 09:35 AM (IST)
पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमने नेपाळमधील त्याच्या संगीत कार्यक्रमात भारतीय ध्वज फडकावून खळबळ उडवून दिली आहे. या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये गायकाने गर्दीतील एका चाहत्याकडून भारतीय ध्वज घेतला आणि तो डोक्यावर फडकावताना दाखवला. नंतर त्याने ध्वज खांद्यावर ठेवला. या घटनेवर लोक मोठ्या उत्साहाने प्रतिक्रिया देत आहेत. दक्षिण आशियाई एकतेचे उदाहरण म्हणून अनेकांनी त्याचे कौतुक केले तर पाकिस्तानातील काहींनी त्यावर जोरदार टीका केली. वाद वाढल्यानंतर तल्हा अंजुमने धाडसी प्रतिक्रिया दिली. रॅपर म्हणाला, “माझ्या कलेला सीमा नाही.” रॅपरने एक्सवरील टीकेला थेट उत्तर दिले आणि म्हटले की त्यांची अभिव्यक्ती राजकारणावर नाही तर मानवतेवर आधारित आहे.
18 Nov 2025 09:30 AM (IST)
व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रसंग असे येतात, ज्यावेळी तातडीने पैशांची गरज भासते. अशा वेळी आपत्कालीन निधी जमा केलेला असेल तर परिस्थिती हाताळता येते. मात्र अनेकांकडे इमरजन्सी फंड नसल्याने त्यांच्यासमोर बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही.
बँका कोणत्याही ग्राहकाला कर्ज मंजूर करण्यापूर्वी त्याची आर्थिक स्थिती, परतफेड करण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिबील स्कोअर तपासतात. सिबील स्कोअर खराब असल्यास बहुतेक बँका कर्ज देण्यास नकार देतात. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो—सिबील स्कोअर खराब असला, तरी कर्ज मिळू शकते का?
तज्ज्ञांच्या मते, यासाठी एक पर्याय उपलब्ध आहे. खराब सिबील स्कोअर असला तरी को-ऍप्लिकंट किंवा गॅरंटर्सह कर्ज घेतले जाऊ शकते. या पर्यायात बँकांचा धोका कमी होतो आणि कर्ज घेणाऱ्याला आवश्यक रक्कम मिळू शकते.
18 Nov 2025 09:30 AM (IST)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहे. असे असताना आता विवाहाचे आमिष दाखवून तीन महिलांवर अत्याचार करण्यात आल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना पुण्यात घडल्या आहेत.
18 Nov 2025 09:25 AM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये मालिका सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 21 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्हि संघ हे क्रिकेट विश्वामधील मजबूत संघ आहेत, यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 चा उपविजेता संघ आहे. आता हि मालिका कोण जिंकणार हे तर मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये समजणार आहे. त्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपेल, एक सामना अनिर्णित राहिला आहे, असे भाकीत केले आहे.
18 Nov 2025 09:18 AM (IST)
आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 मध्ये रविवारी पाकिस्तानने भारताला 8 गडी राखून पराभूत केले. ग्रुप-B मधून पाकिस्तानने सेमीफायनलसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र दुसऱ्या सेमीफायनल स्लॉटसाठी भारत, ओमान आणि यूएई यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.
ग्रुप-B ची पॉइंट्स टेबलनुसार, पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. भारत 2 सामन्यांत 1 विजयासह 2 गुणांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ओमान आणि यूएई अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. भारत आणि ओमान यांच्याकडे प्रत्येकी समान 2 गुण आहेत.
18 Nov 2025 09:15 AM (IST)
अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची शक्यता वाढल्यानं भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ऑटो क्षेत्राच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील 30 शेअरांचा सेन्सेक्स 388 अंकांनी, म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 84,950.95 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील निफ्टी 50 मध्ये देखील 103 अंकांची वाढ झाली आणि 0.4 टक्क्यांच्या तेजीसह 26,013.45 अंकांवर बंद झाला.
18 Nov 2025 09:10 AM (IST)
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे भरभरुन मतांचे दान मिळाल्यानंतर, महायुती सरकारने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एका योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा मुहूर्त जवळ येत असल्यामुळे, राज्य सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी ‘कर्जव्याज परतावा’ योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत या तिन्ही समाजातील निवडक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी दरवर्षी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
18 Nov 2025 09:07 AM (IST)
बॅटल रॉयल मोबाईल गेम फ्री फायर मॅक्सच्या प्लेअर्सची संख्या प्रचंड आहे. या गेममध्ये रँक वाढवण्यासाठी आणि जास्त काळ टिकून राहण्यासाठी प्लेअर्सना शत्रूंना मारावे लागते. मात्र प्रो प्लेअर्ससमोर टिकून राहणं अत्यंत कठिण आहे. यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मॅचमध्ये अगदी सहज विजय मिळवू शकता. काही सोप्या टिप्स तुम्हाला फ्री फायर मॅक्समध्ये विजय मिळवून देऊ शकतात.
18 Nov 2025 09:06 AM (IST)
काही चित्रपट आणि वेब सीरिज त्यांच्या दमदार कथानकामुळे सतत चर्चेत राहतात, आणि आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच रिलीज झालेल्या ‘महारानी सीझन 4’ ची भरभरून प्रशंसा केली आहे.
रविवारी केजरीवाल यांनी सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ‘महारानी सीझन 4’ “नक्की पाहावी” अशी शिफारस केली आणि संपूर्ण टीमच्या धैर्याचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “सोनी लिव्हवर ‘महारानी 4’ वेब सीरिज जरूर पहा. आजच्या राजकारणाची कुरुप सत्य या सीरिजमध्ये अगदी स्पष्टपणे दाखवली आहे. सत्य दाखवण्याची हिम्मत केल्याबद्दल संपूर्ण टीमला सलाम.”
राजकारणावर आधारित या वेब सीरिजमध्ये दाखवलेल्या सत्तासंघर्ष, भ्रष्टाचार आणि बॅकडोअर स्ट्रॅटेजींच्या कथानकाकडे केजरीवाल यांनी विशेष लक्ष वेधले. बिहार निवडणुकांनंतर केलेले हे ट्विट विशेष लक्षवेधी ठरले आहे.
18 Nov 2025 09:03 AM (IST)
उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आणि अमानुष अत्याचारांचे आरोप केले आहेत. विशेषत: तिच्या पतीने जुगार खेळताना पत्नीला ‘दाव’ म्हणून लावले आणि त्यात हरल्यानंतर ८ पुरुषांकडून तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने पोलिसांकडे केला आहे. आरोपींमध्ये तिच्या सासऱ्यांसह दोन दीर आणि इतर नातेवाईकांचाही समावेश असल्याचे तिने सांगितले
18 Nov 2025 08:57 AM (IST)
भारतात 18 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,541 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,496 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,406 रुपये आहे. भारतात 18 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,960 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,410 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,060 रुपये आहे. भारतात 18 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 166.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,66,900 रुपये आहे. भारतातील सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशातच सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने खरेदी कशी करावी, असा प्रश्न आता सर्वसामान्यांपुढे निर्माण झाला आहे.
Marathi Breaking news live updates- राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ गेल्या सोमवारी (दि.10) एक मोठा बॉम्बस्फोट झाला. यामध्ये जीवितहानीसह वित्तहानीही झाली. या बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान पोलिसांनी काही धक्कादायक पुरावे शोधून काढले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनहरी बाग पार्किंग लॉट आणि बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण 68 संशयास्पद मोबाईल नंबर सक्रिय होते. हे 68 मोबाईल नंबर आता तपासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या नंबरवर पाकिस्तान आणि तुर्कीमधून कॉल आले होते.