Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!
Anjali Damania on Ashok Kharat: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे राजकीय ‘सिंडिकेट’ किती खोलवर रुजलेले आहे, याचा धक्कादायक पुरावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणला आहे. चंदीगड येथील एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या दमानिया यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खरात आणि बड्या नेत्यांमधील संभाषणाचे कच्चे चिट्ठे (CDR) जाहीर केले आहेत.
अंजली दमानिया यांनी सर्वात मोठा निशाणा रुपाली चाकणकर यांच्यावर साधला आहे. दमानिया यांच्या दाव्यानुसार, रुपाली चाकणकर यांनी खरातला एकूण १७७ कॉल केल्याचे उघड झाले आहे. यात दोघांमध्ये तब्बल साडेनऊ तासांचे संभाषण झाले आहे. कुटुंबातील सदस्यांनंतर खरातचा सर्वाधिक संपर्क चाकणकरांशीच होता, असा दावा दमानिया यांनी केला. याशिवाय चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनीही खरातला २३६ कॉल केल्याचे सीडीआरमधून समोर आले आहे.
Ashok Kharat Part 2! नाशिकच्या व्यावसायिकाच्या टॅबलेटमधून २०० अश्लील व्हिडिओ जप्त
या प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचल्याचे दमानिया यांनी काही गंभीर दावेदेखील केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरात यांच्यात १७ कॉल झाले असून (१० इनकमिंग, ७ आउटगोइंग), सर्वाधिक प्रदीर्घ संभाषण २१ मिनिटांचे आहे. एका भोंदूबाबासोबत एकनाथ शिंदेंचे इतक्या वेळा काय बोलणे झाले, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले पाहिजे,’ अशी मागणी दमानिया यांनी केली. एकनाथ शिंदेंशिवाय, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचेही प्रत्येकी ८ कॉल खरातसोबत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
ही सर्व माहिती केवळ ‘नॉर्मल कॉल्स’ची आहे. आजकाल अनेकजण व्हॉट्सॲप कॉलचा वापर करतात, ज्याची माहिती सहजासहजी मिळत नाही. जर व्हॉट्सॲप कॉल्सचा डेटा समोर आला, तर ही संख्या आणि गांभीर्य अजून जास्त असू शकते,” असंही अंजली दमानिया यांनी नमुद केलं.
Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने
अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेत्यांनी आमचा त्याच्याशी संबंध नाही असे दावे केले होते. मात्र, आता दमानिया यांनी थेट वेळ आणि कॉलची संख्या जाहीर केल्यामुळे या नेत्यांची अडचण वाढली आहे. ‘एसआयटी’ (SIT) या सीडीआर रिपोर्टची दखल घेऊन संबंधित नेत्यांची चौकशी करणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






