Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

Maharashtra Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. २०२९ पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करण्याच्या धोरणासह कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ५७०४.५० कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Sep 01, 2026 | 05:37 PM
राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; 'नशामुक्त महाराष्ट्र'साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुले चर्चाना उधाण

राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; 'नशामुक्त महाराष्ट्र'साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुले चर्चाना उधाण

Follow Us
Follow Us:
  • २०२९ पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य
  • सरकारी बैठका आणि उपहारगृहांत संतुलित मेन्यू बंधनकारक
  • कुकडी प्रकल्पाच्या ५७०४.५० कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी
 

Maharashtra Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची कॅबिनेट बैठक आज (मंगळवार, 1 सप्टेंबर ) पार पडली. यावेळी कॅबिनेट बैठकीत चार धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील या बैठकीत उपस्थित होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणास्तव या बैठकीत उपस्थित राहू शकले नाहीत. शिंदेंच्या कॅबिनेट बैठकीतील गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमध्ये अंमली पदार्थांविरोधातील धोरण, सरकारी कार्यक्रमांमधील आरोग्यदायी अन्नपदार्थ, सोलापूरमधील उन्नत मार्ग आणि कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचा सुधारित खर्च यांचा समावेश आहे.

२०२९ पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करण्याचे लक्ष्य

अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २०२९ पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…

यासाठी ‘A Whole-of-Government Approach’ या शासकीय धोरणाला मान्यता देण्यात आली. या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नशामुक्त महाराष्ट्रासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.

सरकारी कार्यक्रमांमध्ये हेल्दी फूडला प्राधान्य

शासकीय आणि निमशासकीय बैठका, विविध कार्यक्रम तसेच उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

यापुढे अशा ठिकाणी संतुलित मेन्यू ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय विशेष चर्चेत आला आहे.

सोलापूर उन्नत मार्गाला सार्वजनिक प्रकल्पाचा दर्जा

सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यान प्रस्तावित उन्नत मार्ग प्रकल्पाला निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मंजुरी देण्यात आली.

हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ शी संबंधित आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हस्तांतरित करण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा होणार आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी मोठी तरतूद

पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. प्रकल्पासाठी ५७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश

या प्रकल्पामुळे तब्बल १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह संबंधित भागातील सिंचन व्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

मंत्रिमंडळाच्या या चार निर्णयांमुळे आरोग्य, अमली पदार्थ नियंत्रण, पायाभूत सुविधा आणि सिंचन या क्षेत्रांमध्ये राज्य सरकारने महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल उचलल्याचे चित्र आहे.

Web Title: Maharashtra cabinet meeting 4 big decisions fadnavis september 1 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Cabinet Decision
  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा
1

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम
3

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती
4

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.