Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 27, 2026 | 11:46 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 27 Apr 2026 11:46 AM (IST)

    27 Apr 2026 11:46 AM (IST)

    Mumbai Accident: भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

    मुंबईतील मरीन ड्राईव्हवर पहाटे दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरस्पीडिंगमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • 27 Apr 2026 11:37 AM (IST)

    27 Apr 2026 11:37 AM (IST)

    सुनावणीस हजर राहणार नाही, केजरीवालांचं न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांना पत्र

    दिल्लीचे माजी मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. तपास यंत्रणेने या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मात्र, केजरीवाल यांनी न्यायमूर्ती शर्मा यांच्यासमोर हजर न होण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 27 Apr 2026 11:23 AM (IST)

    27 Apr 2026 11:23 AM (IST)

    पुण्यातील ILS लॉ कॉलेजमधील रॅगिंगचा धक्कादायक प्रकार आला समोर

    पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयातील रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 35 वर्षीय विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • 27 Apr 2026 11:15 AM (IST)

    27 Apr 2026 11:15 AM (IST)

    भाजपचा विधान परिषदेचा 'फायनल' ड्राफ्ट मुंबईत तयार

    भाजपचा विधान परिषदेचा 'फायनल' ड्राफ्ट मुंबईत तयार झाला असून, आता फक्त हायकमांडच्या मोहोर उमटवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीवारी करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ जागांसाठी भाजपने 'सोशल इंजिनिअरिंग' आणि 'संघटन' असा दुहेरी फॉर्म्युला निश्चित केला आहे. दिल्लीत पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • 27 Apr 2026 11:12 AM (IST)

    27 Apr 2026 11:12 AM (IST)

    TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

    TCS प्रकरणातील आरोपी निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. तिने गर्भवती असल्याचे कारण देत निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

  • 27 Apr 2026 11:08 AM (IST)

    27 Apr 2026 11:08 AM (IST)

    फर्टीलायझर असोसिएशन कडून बेमुदत संप

    महाराष्ट्रात आजपासून कृषी केंद्र चालकांनी सरकारच्या विरोधात आपली दुकाने बंद ठेवून आजपासून बेमुदत संप पुकारला. या संघटनेच्या संपाला देशातील फर्टीलायझर असोसिएशनने देखील एक दिवसाचा पाठिंबा दिला आहे.

  • 27 Apr 2026 10:55 AM (IST)

    27 Apr 2026 10:55 AM (IST)

    17व्या शतकातील ‘सुपरकॉम्प्युटर’ लिलावात! दुर्मिळ खजिन्यासाठी लागणार कोट्यवधींची बोली

    जयपूरच्या राजघराण्यातील संग्रहातील सर्वात मौल्यवान वैज्ञानिक ठेवांपैकी एक अशा १७व्या शतकातील खगोलशास्त्रीय गणना करणारे विशाल उपकरण ‘अस्ट्रोलेब’चा २९ एप्रिल रोजी लंडन येथील ‘सोथबीज’ लिलावगृहात लिलाव होणार आहे. पितळेपासून बनवलेल्या या असाधारण उपकरणाला त्याच्या बहुआयामी क्षमतांमुळे तज्ञांकडून त्या काळातील ‘सुपरकॉम्प्युटर’ आणि ‘प्राचीन स्मार्टफोन’ म्हणून गौरवण्यात येत आहे.

  • 27 Apr 2026 10:45 AM (IST)

    27 Apr 2026 10:45 AM (IST)

    आखाती देशांत शांततेचे वारे! इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला ‘गुप्त’ प्रस्ताव; वाचा अटी

    जागतिक राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इराणमधील तणाव (US-Israel Iran War)  शिगेला पोहोचलेला असतानाच इराणकडून एक महत्त्वपूर्ण राजनैतिक पाऊल उचलण्यात आले आहे. रस्ते आणि सागरी मार्ग रोखून धरणाऱ्या इराणने आता होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा आणि सुरू असलेला सशस्त्र संघर्ष थांबवण्याचा प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला आहे. या प्रस्तावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून युद्धाच्या छायेखाली वावरणाऱ्या जगाला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 27 Apr 2026 10:35 AM (IST)

    27 Apr 2026 10:35 AM (IST)

    स्वच्छ भारत’ मोहिमेला रशियन दूतावासाची साथ; चिमुकल्याच्या सहभागाने जिंकली

    भारताच्या सच्छ भारत मोहिमेला आता जागतिक साथ मिळाला आहे. भारताच्या सर्वात घनिष्ठ मित्र रशियाच्या नवी दिल्लीतील दूतावासाने असे काही केले आहे की सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. याने भारतीयांची मने जिंकली आहेत. नुकतेच रविवारी(२६ एप्रिल २०२६) रोजी नवी दिल्ली येथील रशियन दूतावासाने एक स्वच्छता मोहिम राबवली. या मोहिमेत एका चिमुकल्याचाही सहभाग होता. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • 27 Apr 2026 10:25 AM (IST)

    27 Apr 2026 10:25 AM (IST)

    OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज

    ओप्पोने त्यांच्या एका ईव्हेंटदरम्यान लेटेस्ट टॅब्लेट लाँच केले आहे. हे नवीन टॅब्लेट कंपनीने OPPO Pad 5 Pro या नावाने सादर केलं आहे. हे नवीन टॅब्लेट कंपनीच्या टॅब्लेट श्रेणीमध्ये अनेक मोठे अपग्रेड्स घेऊन आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या टॅब्लेटमध्ये उच्च-रिझोल्यूशन 13.2 -इंचाचा डिस्प्ले आणि इतर अनेक प्रभावी फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच टॅब्लेटमध्ये मोठी बॅटरी आणि लेटेस्ट जेनरेशनचा पावरफुल प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. कंपनीने त्यांचे नवीन डिव्हाईस प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 58,920 रुपये आहे.

  • 27 Apr 2026 10:15 AM (IST)

    27 Apr 2026 10:15 AM (IST)

    दुहेरी हत्याकांड! सासरी घुसला आणि पत्नी आणि सासूवर चाकूने सपासप केले वार; कारण काय?

    उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयानेच आपल्या सासरच्या घरी घुसून आपल्या सासूची आणि बायकोची चाकूने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने सासऱ्यावर देखील वार केले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बलिया जिल्ह्यातील बछईपूर नावाच्या एका गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र त्याने असं का केलं, हत्येमागचं कारण काय? जाणून घेऊया.

  • 27 Apr 2026 10:05 AM (IST)

    27 Apr 2026 10:05 AM (IST)

    गेममध्ये रँक वाढत नाहीये? या सामान्य चुकांमुळे होतो मोठा परिणाम

    ऑनलाइन मोबाईल गेम फ्री फायर मॅक्समध्ये रँक पुश करणं प्रत्येक प्लेयरचं ध्येय असतं. मात्र हे ध्येय साध्य करताना अनेक प्लेअर्स काही चुका करतात, ज्यामुळे रँक वाढण्याऐवजी कमी होतो. तुम्ही देखील फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला देखील रँक वाढवायचा असेल तर काही सामान्य चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

  • 27 Apr 2026 09:55 AM (IST)

    27 Apr 2026 09:55 AM (IST)

    ‘मी रेपिस्ट नाही’ लाइव्ह टीव्हीवर भडकले डोनाल्ड ट्रम्प

    Donald Trump 60 Minutes interview 2026 : वॉशिंग्टनमध्ये झालेल्या हिल्टन हॉटेलमधील गोळीबाराने आधीच खळबळ उडवून दिली होती, मात्र आता या प्रकरणाला एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. हल्लेखोर कोल थॉमस ॲलन याने लिहिलेल्या कथित जाहीरनाम्यातील (Manifesto) मजकुरामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या जाहीरनाम्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे वैयक्तिक आरोप करण्यात आले होते, ज्याला ट्रम्प यांनी ‘६० मिनिट्स’ या कार्यक्रमात थेट उत्तर दिले.

  • 27 Apr 2026 09:45 AM (IST)

    27 Apr 2026 09:45 AM (IST)

    मानसिक छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या

    नागपूर : संपत्तीच्या वादातून आणि घटस्फोटासाठी होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पोलिस कर्मचाऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मृताची पत्नी व प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर (वय ४२, रा. कृष्ण निसर्ग अपार्टमेंट, इसासनी) असे मृत पोलिसाचे नाव आहे. आरोपींमध्ये पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) आणि महेश मेश्राम यांचा समावेश आहे.

  • 27 Apr 2026 09:35 AM (IST)

    27 Apr 2026 09:35 AM (IST)

    लाडकी बहीण योजना: २६ लाख महिलांना शेवटची संधी; ३० एप्रिलपर्यंत 'हे' काम पूर्ण करा

    महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत.

    ३० एप्रिल २०२६ ही शेवटची मुदत राज्यातील सुमारे २६ लाख लाभार्थी महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सरकारने या कामासाठी ३० एप्रिल २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. जर या मुदतीत ई-केवायसी पूर्ण झाले नाही, तर या महिलांना योजनेच्या पुढील हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते किंवा त्या कायमच्या अपात्र ठरू शकतात.

  • 27 Apr 2026 09:30 AM (IST)

    27 Apr 2026 09:30 AM (IST)

    विदर्भाचा पारा ४६ अंशांच्या पार; अकोला, अमरावतीसह तीन जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट'

    राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आता उष्णतेचा प्रचंड भडका उडाला आहे. विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने अमरावती, अकोला आणि वर्धा या तीन जिल्ह्यांसाठी उष्णतेचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

    वाढत्या उष्णतेची सद्यस्थिती:

    • ऑरेंज अलर्ट: अमरावती, अकोला, वर्धा.

    • येलो अलर्ट: नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर.

    • विक्रमी तापमान: अनेक जिल्ह्यांमध्ये ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

    नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना: वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा (Sunstroke) धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    • वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.

    • पाण्याचे सेवन: शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी, लिंबू सरबत किंवा ताकाचे सेवन करावे.

    • आरोग्याची काळजी: चक्कर येणे, मळमळणे किंवा तीव्र डोकेदुखी जाणवल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

    सूर्य आग ओकत असल्याने विदर्भातील परिस्थिती गंभीर बनली असून, पुढील काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • 27 Apr 2026 09:25 AM (IST)

    27 Apr 2026 09:25 AM (IST)

    इराण-अमेरिका संघर्षात  'होर्मुज'ची कोंडी फुटण्याची शक्यता

    इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला दोन महिने उलटले असून, युद्धविराम जाहीर होऊनही तणाव कायम आहे. मात्र, आता जागतिक स्तरावर दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणने अमेरिकेसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला असून, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) खुली करण्याबाबत सकारात्मक भाष्य करण्यात आले आहे.

    गेल्या काही काळापासून होर्मुज खाडी बंद असल्याने जगभरात ऊर्जेचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून अनेक देशांना याचा आर्थिक फटका बसत आहे. अमेरिकेच्या धमकावण्याच्या भूमिकेमुळे इराणने थेट चर्चेला नकार दिला होता आणि त्यांचे शिष्टमंडळ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर इराणने दिलेला हा नवा प्रस्ताव कोंडी फोडण्यासाठी मैलाचा दगड ठरू शकतो. जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर जागतिक तेल पुरवठा सुरळीत होऊन विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल.

  • 27 Apr 2026 09:20 AM (IST)

    27 Apr 2026 09:20 AM (IST)

    मुंबईचा पाऊस आणि भरतीचा इशारा: पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षेला प्राधान्य द्या

    मान्सूनच्या आगमनामुळे मुंबईचे सौंदर्य अधिकच खुलते, मात्र अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय होणे आणि वाहतूक विस्कळीत होणे यांसारखी आव्हानेही उभी राहतात. मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने चौपाटीवर गर्दी करतात, पण याच काळात समुद्रात येणाऱ्या मोठ्या भरतीचा धोकाही वाढतो. उधाणलेल्या समुद्राजवळ पर्यटनाचा आनंद घेताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून वारंवार धोक्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे पावसाचा आनंद लुटताना भरतीच्या वेळा सांभाळून सुरक्षित अंतर राखणे आणि सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

  • 27 Apr 2026 09:15 AM (IST)

    27 Apr 2026 09:15 AM (IST)

    Vasai Accident: वसईत भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू

    वसई: वसई येथे एक दुर्दैवी अपघात झाल्याचे समोर आले आहे. भंगाराने भरलेल्या ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडल्याचे समोर आले आहे. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरून गेला, आणि हा अपघात घडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बिंदर रामनारायण प्रजापती (वय 55) असे आहे. ही घटना रविवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वजन काट्यासमोर घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

  • 27 Apr 2026 09:10 AM (IST)

    27 Apr 2026 09:10 AM (IST)

    KKR Beat LSG: रिंकू सिंगचा ‘फिनिशिंग’ टच! सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा लखनौवर विजय

    IPL 2026 मधील 38 वा सामना आणि या हंगामातील ‘सुपर ओव्हर’चा समावेश असलेला पहिलाच सामना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना दोन्ही संघांमध्ये अत्यंत रोमांचक ठरला आणि अखेरीस ‘सुपर ओव्हर’मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला. तत्पूर्वी, सामन्यात LSG चा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावांची धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, लखनौ सुपर जायंट्सनेही 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला. परिणामी, सामन्याचा निकाल ‘सुपर ओव्हर’मध्ये लावण्यात आला.

  • 27 Apr 2026 09:05 AM (IST)

    27 Apr 2026 09:05 AM (IST)

    विधान परिषद निवडणूक २०२६: शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीवरून नाराजीनाट्य

    बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता राज्याचे लक्ष १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हालचालींना वेग आला असून, उमेदवारीवरून अंतर्गत कलह समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे निश्चित केल्याची चर्चा असतानाच, पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातून या नावांना तीव्र विरोध होत असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील निष्ठावंत आणि इतर इच्छुक नेत्यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केल्याने शिंदेंसमोर पेच निर्माण झाला आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार असल्याने या राजकीय रस्सीखेचीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 27 Apr 2026 09:00 AM (IST)

    27 Apr 2026 09:00 AM (IST)

    पद्म पुरस्कार २०२७: शिफारस समितीमधून सांस्कृतिक मंत्र्यांना डच्चू; जयकुमार रावल अध्यक्षपदी

    केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कारांसाठी नावे सुचवण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिफारस समितीमुळे राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र धक्कादायक बाब म्हणजे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना या समितीमधून पूर्णपणे डावलण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रक्रियेत सांस्कृतिक मंत्र्यांचा सहभाग असण्याचा पायंडा यावेळी मोडीत काढण्यात आल्याने सरकारच्या या निर्णयाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मंत्र्यांच्या या अंतर्गत बदलामुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • 27 Apr 2026 08:55 AM (IST)

    27 Apr 2026 08:55 AM (IST)

    अकोला ठरले जगातील सर्वात उष्ण शहर; लातूरमध्ये उष्माघाताचा तिसरा बळी

    महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून, विदर्भातील अकोल्यात रविवारी ४६.९ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या तापमानामुळे अकोला जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत वरच्या स्थानावर पोहोचले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, वाढत्या उन्हामुळे राज्यात मृत्यूचे सत्रही सुरू झाले असून लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी गेला आहे; औसा तालुक्यातील एका २५ वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झाला. उपराजधानी नागपुरातही उष्माघाताने पहिला बळी गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, वाढता पारा पाहता प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • 27 Apr 2026 08:49 AM (IST)

    27 Apr 2026 08:49 AM (IST)

    गायकवाडांच्या धमकीचा उलटा परिणाम; 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या १० हजार प्रतींची विक्रमी विक्री

    शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचा अनपेक्षित परिणाम झाला आहे. या वादामुळे पुस्तकाबद्दल राज्यभर प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून, अवघ्या चार दिवसांत १० हजारहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. सध्या बाजारातील सर्व साठा संपल्याने प्रकाशकांकडून नव्या आवृत्तीच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकावरून सुरू झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असला, तरी वाचक वर्गाने मात्र या पुस्तकाला मोठी पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला राजकीय तणाव वाढत असताना, दुसरीकडे या पुस्तकाच्या मागणीने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

सोन्याच्या दरात हलकी घसरण, पण किंमत अजूनही उच्चांकी!

Gold Rate Today: भारतात 27 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,403 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,119 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,552 रुपये आहे. भारतात 27 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,41,190 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,54,030 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,520 रुपये आहे. भारतात 27 एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 259.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये आहे.

Web Title: Maharashtra desh videsh 27th april breaking news politics economy live blog marathi breaking news political news economice ipl 2026 live national news international news middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे पुन्हा विधीमंडळात जाणार? खासदार संजय राऊतांनी दिलं मिश्किल उत्तर
1

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे पुन्हा विधीमंडळात जाणार? खासदार संजय राऊतांनी दिलं मिश्किल उत्तर

शस्त्रसंधीदरम्यानच लेबनॉनवर इस्त्रायलचा मोठा हल्ला; 14 जणांचा मृत्यू तर 37 जण जखमी
2

शस्त्रसंधीदरम्यानच लेबनॉनवर इस्त्रायलचा मोठा हल्ला; 14 जणांचा मृत्यू तर 37 जण जखमी

Stock Market Update: शेअर मार्केटमध्ये पुन्हा तेजी येणार की मंदी कायम राहणार? ‘हे’ फॅक्टर्स ठरवतील बाजाराची दिशा
3

Stock Market Update: शेअर मार्केटमध्ये पुन्हा तेजी येणार की मंदी कायम राहणार? ‘हे’ फॅक्टर्स ठरवतील बाजाराची दिशा

Maharashtra Politics : “भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी..; छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याने रोहित पवारांचा संताप अनावर
4

Maharashtra Politics : “भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी..; छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याने रोहित पवारांचा संताप अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.