
फोटो सौजन्य सोशल मिडिया
याचं आशेने नाशिक जिल्ह्यामधिल येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शेतकऱ्यांनी ( भोपळा ) डांगराचे पीक लावण्याचा ठरवले; पण पावसाने पाठ फिरवल्याने आणि उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे तब्बल 70 टक्के डांगराचे पीक खराब झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा तोटा सहन करावा लागत आहे.
इतर पिकांपेक्षा डांगराला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी डांगराची शेती केली. पण पावसाने पाठ फिरवल्याने आणि उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे तब्बल 70 टक्के डांगराचे पीक खराब झाले असून शेतकऱ्यांना याचा तोटा सहन करावा लागतोय.
शेतकऱ्यांनी पिकलेल्या डांगराला 30 टक्के उत्पादनालाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने; डांगराला 4 ते 5 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले पिकाचे नुकसान आणि डांगराच्या पिकाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळत नसून शेतकरी हतबल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर डांगर विकण्याऐवजी तो कापून जनावरांना खाण्यास दिला. ऐवढी मेहनत आणि खर्च करुन देखील पिकवलेल्या डांगरापासून हवे तसे उत्पन्न मिळत नाही आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दुष्काळामुळे पाऊस कमी आहे. आम्ही डांगराची शेती करायला सुरूवात केली; आणि आता डांगराला बाजाराच बाजारात योग्य भाव मिळत नाही आहे. नवरात्र तोंडावर असल्याकारणाने डांगराचा सिजन वाया गेला. 30 ते 40 टक्के डांगर चांगला आहे. पण 60 टक्के डांगर खराब झाला असून बाजारात डांगराला 3-4 रूपये भाव मिळत असल्याने आम्हाला नुकसान सहन करावं लागत आहे. असे शेतकऱ्यांचे मत आहे.
Nashik News : नाशिकमधील बंद मनपा शाळा पुन्हा सुरू होणार; दादा भुसे …