Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashish Shelar: गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा प्लॅन! राज्यभर विविध उपक्रमांची तयारी, आशिष शेलारांची मोठी घोषणा

Ashish Shelar: महाराष्ट्राचा गणेशोत्सव अधिक व्यापक स्वरूपात ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपक्रमांची तयारी सुरू केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 17, 2026 | 07:00 PM
Ashish Shelar: गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा प्लॅन! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ashish Shelar: गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा प्लॅन! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सव अधिक व्यापक स्वरूपात ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार
  • ४८० उत्कृष्ट गणेश मंडळांना सुमारे दीड कोटींची पारितोषिके
  • गणेशोत्सवाला UNESCO जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न
 

Maharashtra Ganeshotsav: गणेशोत्सव हा राज्याचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालये, आस्थापना आणि महामंडळांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

गावापासून शहरापर्यंत गणेशोत्सवाचा व्यापक सहभाग वाढविण्यासोबतच या उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीनेही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील 480 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सुमारे दीड कोटी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात येईल. तालुका व जिल्हास्तरीय द्वितीय आणि तृतीय विजेत्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत समारंभ आयोजित केले जातील.

गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांसह महाराष्ट्राबाहेरील 10 राज्ये आणि भारताबाहेरील एका देशात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नवी दिल्ली येथे पाच दिवस, तर मुंबईत आठ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्थानिक संस्थांच्या सहकार्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यात येईल. Ashish Shelar

प्रमुख गणेश मंदिरे व सार्वजनिक गणेशोत्सवांचे ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मही तयार केला जाईल. गणेशोत्सवाचा इतिहास, परंपरा, अष्टविनायक, पर्यावरणपूरक उत्सव आणि शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून व्यापकपणे प्रसारित केली जाणार आहे. ‘राज्य महोत्सव’चा लोगो शासनाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.

दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांच्या माध्यमातून गणपतीविषयक रील्स स्पर्धा महसूल विभागीय आणि राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा व प्रथांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या मराठी चित्रपटाचाही गौरव केला जाणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर

शाडूच्या मातीच्या मूर्ती, बीज गणपती, निर्माल्य संकलन व पुनर्वापर, प्लास्टिकमुक्त उत्सव, एलईडी सजावट आणि सौरऊर्जेवरील मंडप याबाबत राज्यभर जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आणि कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्याचे उपक्रम राबविण्यात येतील. जलस्रोतांना बाधा होणार नाही, याची दक्षता घेत जलसंवर्धनाबाबतही जनजागृती केली जाणार आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागातून दुर्वा, फुले, नैवेद्य साहित्य व सेंद्रिय कृषी उत्पादनांची माहिती प्रसारित केली जाईल. महिला बचतगट व सहकारी संस्थांना मोदक, प्रसाद साहित्य व स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. गणेशमूर्ती, मखर, सजावट व पूजासाहित्य तयार करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह कारागिरांसाठीही प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातील.

युवकांसाठी शाडूच्या मूर्ती, मखर, सजावट व डिजिटल डिझाइनवर आधारित उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. शाळांमध्ये शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याच्या कार्यशाळा, निबंध, वक्तृत्व व सांस्कृतिक उपक्रम, तर महाविद्यालयांमध्ये ‘गणेश आणि विज्ञान’ या विषयावर परिसंवाद, व्याख्याने व नवोपक्रम प्रदर्शने आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण रोबोटिक्स देखावे आणि पर्यावरणपूरक सजावटीबाबत जनजागृती करण्यात येईल.

आरोग्य, सुरक्षितता व सर्वसमावेशकतेला प्राधान्य

गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि हृदयविकाराच्या प्रसंगी प्रथमोपचारासाठी सीपीआर प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. वैद्यकीय मदत केंद्रे, स्वयंसेवक, अन्नसुरक्षा तपासणी आणि भेसळ प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दिव्यांग भाविकांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सांकेतिक भाषेतील आरती, स्पर्शदर्शन व सुलभ प्रवेशाची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Wardha News : वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी तालुका व जिल्हास्तरीय समित्या गठित करून प्रत्यक्ष भेटीद्वारे अर्जांची तपासणी, गुणांकन आणि अंतिम निकालाची कार्यवाही करावी. प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई, विसर्जन मिरवणुकांचे संयोजन, स्थानिक कार्यक्रमांचे नियंत्रण व प्रसिद्धीची जबाबदारीही जिल्हाधिकारी कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे. गृह विभागाने उत्सवाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन करावे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने विसर्जन मार्ग, दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि सुरक्षित पादचारी सुविधांची दक्षता घ्यावी.

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट

विविध स्पर्धांच्या समन्वयाची जबाबदारी संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र राज्य कला अकादमी, मुंबई यांच्याकडे देण्यात आली आहे. मंत्रालयीन विभाग व कार्यालयांमार्फत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समन्वयासाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक सूचना जारी करून राज्य महोत्सव गणेशोत्सवातील सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवावेत, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी दिले आहेत.

Web Title: Maharashtra ganeshotsav to get state festival status

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Ganpati Festival
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maskarya Ganpati: गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षात विराजमान होतो मस्कऱ्या गणपती; काय आहे इतिहास
2

Maskarya Ganpati: गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षात विराजमान होतो मस्कऱ्या गणपती; काय आहे इतिहास

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
3

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
4

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.