Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’

देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. या योजनेसाठी राज्यातील ज्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 02:58 PM
Kolhapur News : धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’
Follow Us
Follow Us:
  • धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर
  • कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’
कोल्हापूर : देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. या योजनेसाठी राज्यातील ज्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये सहकाराची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यात 7 हजार टन क्षमतेची नवीन गोदामे उभारली जाणार असून, राज्याच्या एकूण एक लाख टन साठवणूक उद्दिष्टात कोल्हापूरचा वाटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘सहकार से समृद्धी’ या अभियानांतर्गत राज्यातील 21 हजार 158 सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये कोल्हापूर, पालघर, नांदेड आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये ‘भारतीय खाद्य महामंडळा’मार्फत आधुनिक गोदामांचे जाळे विणले जात आहे.

‘पॅक्स’ संस्थांचे रूप पालटणार
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना (पॅक्स) या योजनेचा मोठा लाभहोणार आहे. जिल्ह्यात 7 हजार टन क्षमता निर्माण करताना प्रत्येक गोदामाची क्षमता किमान 2 हजार 500 टन असणार आहे. रेल्वे मालधक्का आणि राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असलेल्या संस्थांनी जागेची पाहणी पूर्ण केली असून, कर्ज प्रस्तावांची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे.

Nanded News : नांदेड अर्थसंकल्प अभ्यासात अडकला; सर्वसाधारण सभेसमोर कधी सादर होणार सादर?

सवलतींचा ‘पाऊस’
या योजनेचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे ‘एफसीआय’कडून मिळणारी नऊ वर्षांच्या भाड्याची हमी. संस्थांना प्रति टन 100 रुपये भाडे मिळणार असल्याने बँकांनी कोल्हापूर आणि पुणे विभागातील संस्थांना अर्थपुरवठा करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच, ‘स्मार्ट’ प्रकल्पातून 60 टक्के आणि कृषी पायाभूत निधीतून मिळणाऱ्या व्याज सवलतीमुळे या गोदामांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

व्यवसायसंधींची नवी द्वारे केवळ साठवणूकच नव्हे, तर ‘वेअरहाउस * रिसीट’वर कर्ज मिळवणे आणि भागीदारीत गोदाम व्यवस्थापन करणे अशा विविध व्यवसाय संधी कोल्हापूरच्या सहकारी संस्थांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे संस्था केवळ कर्जवाटप न करता एक सक्षम व्यावसायिक केंद्र म्हणून नावारूपास येतील. यानिमित्ताने व्यावसायिक संधीची नवी दारे खुली होणार आहेत.

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! पारा ४१ अंशांवर; दुपारी रस्ते ओस तर…

Web Title: Maharashtra is leading in grain storage scheme the largest kothar will be built in 10 districts including kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • kolhapur
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.