Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला

अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीदरम्यान दावा केला आहे की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती

  • By anuradha sagar
Updated On: Feb 14, 2026 | 12:19 PM
Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला
Follow Us
Follow Us:
  • मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात कार्यरत असलेल्या राजेंद्र ढेरंगे या लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक
  • ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली
  • का मेडिकलचा निंलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्याने ५० हजारांच्या लाचेची मागणी
Narhari Zirwal Not Reachable : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात गुरुवारी झालेल्या ‘एसीबी’ (ACB) च्या कारवाईने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात कार्यरत असलेल्या राजेंद्र ढेरंगे या लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कोठडी सुनावली आहे.

वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा ‘धुरंधर’

अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीदरम्यान दावा केला आहे की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती. या विधानामुळे प्रकरणाची व्याप्ती आता मंत्र्यांच्या जवळच्या वर्तुळापर्यंत पोहोचली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील मंत्र्यांचे कार्यालय तपासासाठी सील केले आहे. कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय अशा प्रकारे सील करण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. या कारवाईनंतर शुक्रवारी झिरवाळ यांनी दिल्लीतून प्रतिक्रिया दिली होती की, “माझा संबंध आढळल्यास मी राजीनामा देईन.” मात्र, आज शनिवार (१४ फेब्रुवारी) सकाळपासून त्यांचा फोन ‘नॉटरिचेबल’ असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ACB ने अटक केलेल्या अन्न आणि औषध प्रसासनातील कर्मचारी राजेंद्र ढेरंगे याने  एका मेडिकलचा निंलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्याने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील ३५ हजारांची लाच घेताना तो रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले.

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’! संजय राऊतांचा गंभीर आरोप

यावरुन झिरवळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.

Web Title: Maharashtra politics first time a cabinet ministers office has been sealed suspicion has increased as narahari jirwal is unreachable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Marathi News
  • Narhari Zirval
  • NCP Politics

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.