Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी मोठा निर्णय; महारेलच्या ६५ कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळा’ (महारेल) मार्फत राज्यात हाती घेण्यात येणाऱ्या १३१ प्रकल्पांपैकी पहिल्या टप्प्यातील ६५ कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि अंडरपास उभारण्यावर भर देणार आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 05:21 PM
महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी मोठा निर्णय; महारेलच्या ६५ कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी मोठा निर्णय; महारेलच्या ६५ कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Follow Us
Follow Us:

Maharashtra Rail Infrastructure News Marathi : ‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळा’मार्फत (महारेल) करण्यात येणाऱ्या एकूण १३१ पैकी पहिल्या टप्प्यात ६५ कामांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘महारेल’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक व आमदार प्रसाद लाड बैठकीस उपस्थित होते. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील (अंडर पास) रस्त्याची कामे महारेलमार्फत करण्यात येणार आहेत. त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध निर्देश दिले.

Tulapur Rave Party Case: पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो आहे का? तुळापूर रेव्ह पार्टीप्रकरणावरून रोहिणी खडसेंचा आक्रमक

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात एकही रेल्वे मार्गावर फाटक राहता काम नये. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात; तसेच महानगरांमध्ये रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला असलेले वाढते शहरीकरण लक्षात घेता अशा भागात गरजेनुसार नागरिकांच्या सुलभ दळणवळणाकरिता पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात यावीत. मान्यता देण्यात आलेल्या ६५ कामांमधील संबंधित रस्त्यांवरील २५ हजार ते १ लाखापर्यंत ‘टीव्हीयू’ (ट्रेन व्हेईकल युनिट) असलेल्या आणि कमीत कमी भूसंपादन आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत.

Hon’ble Chief Minister Devendra Fadnavis chaired a meeting on the subject of making Maharashtra a “Rail Fatak-Free state” by constructing Road Over Bridges (ROBs) and underpasses at railway level crossings. MahaRail’s Managing Director, Rajesh Kumar Jaiswal, presented the status… pic.twitter.com/CTQmNzLxGm — MRIDC (@Maharail_Corp) June 8, 2026

वाढते शहरीकरण लक्षात घेता शहरांमधील ८० रेल्वे पायाभूत सुविधांची कामे नियोजित करण्यात आली आहे. या कामांसाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात यावी. समितीने नियोजित कामाविषयी पडताळणी करावी. त्यानंतर ते काम महारेल हाती घेईल. ही कामे पूर्ण झाल्यास या भागातील नागरिकांना त्यांच्या मागणीआधीच पायाभूत सुविधा मिळतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर चौकाच्या ठिकाणी भविष्यातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. अशा ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्याच्या कार्यवाही करावी. अमरावती- बडनेरा मार्गावरील जुना रेल्वे उड्डाण पूल असून याठिकाणी नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात यावा. महारेलने कामांचे प्रधान्यक्रमानुसार टप्पे पाडावेत.

पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हुडकोकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे. हुडकोने बँकांकडून कर्ज न घेता वेगळी व्यवस्था उभारून बाजारातील स्पर्धेचा अंदाज घेत शासनाला दिलेल्या कर्जावरील व्याज कमी आकारावे. त्याचबरोबर महारेल हे महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आणण्यासाठी कार्यवाही गतीने पूर्ण करावी. महारेलमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे देयक राज्य शासनाकडून तातडीने अदा करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. हुडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय कुलश्रेष्ठ, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, सचिव (नियोजन) शैला ए आदी यावेळी उपस्थित होते. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी बैठकीत सादरीकरण केले.

प्रस्तावित रेल्वे पायाभूत सुविधांची कामे

मुंबई महानगर क्षेत्र- १७, पुणे शहर- १५, नागपूर- १३, नाशिक- ५, अमरावती- ५, सांगली- ४, छत्रपती संभाजीनगर- ३, कोल्हापूर- ३, धुळे- ३, लातूर- ३, परभणी- ३, सोलापूर- २, जळगाव- २, अहिल्यानगर- १ आणि नांदेड शहरात- १. एकूण- ८०.

Web Title: Maharashtra railway infrastructure maharel 65 projects approved cm fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • railway

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
3

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
4

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.