India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोबंली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले 'भारत फायद्यात... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नुकतेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे काँग्रेसमन आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत या करारामुळे अधिक फायद्यात राहाणार आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ग्रीर यांनी भारत आणि युरोपमधील करारावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, या करारामुळे भारताला युरोमध्ये अधिक बाजारपेठां उपलब्ध होतील, ज्यामुळे तेथील स्थलांतरितांची स्थिती सुधारले. या करारात भारत अधिक फायदेशीर राहणार असल्याचे ग्रीर यांनी म्हटले आहे.
ग्रीर भारतावरील शुल्काबाबत विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केले की भारतीय आयातींवर अमेरिकेने लादलेले शुल्क अद्यापर हटवण्यात आलेले नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे, परंतु त्यांच्यावरील २५% शुल्क (Tariff) आहे. परंतु ग्रीन यांचे विधान हे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांच्या विधानाच्या विरोधात आहे. बेसंट यांनी भारतावरील शुल्क कमी होण्याचे संकेत दिले होते. परंतु ग्रीर यांच्या विधानामुळे भारतावरील शुल्क कमी होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
स्कॉट बेसंट यांचे युरोपवर आरोप
तसेच स्कॉट बेसंट यांनी युरोप भारताशी करार करुन युक्रेन युद्धाविरोधात रशियाला अप्रत्यक्ष निधी देत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले की, आम्ही युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे २५% टॅरिफ लादले, पण आमच्या युरोपीय मित्रांनी याला पाठिंबा दिला नाही, तर याउलट तो भारतासोबत मोठा व्यापार करार करत आहेत.
याशिवाय नाटोचे महासचिव मार्क रुटे यांनी देखील भारत युरोप व्यापार करारावर तीव्र टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, युरोपची संरक्षण व्यवस्था मर्यादित आहे. यामुळे अमेरिकने युरोपची सुरक्षा काढून घेतली तर युरोपला संरक्षण खर्चात वाढ करावी लागले. ही वाढ युरोपला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करेल असे त्यांनी म्हटले होते.
Ans: भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारात भारत सर्वाधिक फायदेशीर राहिल असे टीप्पणी केली आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांचे काँग्रेसमन आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी भारतावरील अतिरक्त कर अजूनही हटवण्यात आलेला नाही असे म्हटले आहे.






