(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अजित पवारांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या असं अचानक जाण्याने मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणने देखील अजित दादांना सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
सूरज चव्हाणने अजित पवारांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले, ”मित्रांनो माझा देव चोरला आज.. मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…
अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय…माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन…दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमचाच सूरज!”
सूरज चव्हाण हा बारामतीच्या मोढवे गावचा आहे. त्यामुळे आपल्या गावच्या मुलाने बिग बॉससारखा मोठा शो जिंकल्यावर अजित पवारांनी सूरजला हक्काचं घर बांधून देईन असे वचन दिले होते आणि ते वचन त्यांनी पूर्ण करून दाखवल पुढे अवघ्या वर्षभरात सूरज चव्हाण त्याच्या हक्काच्या घरात राहायला गेला. यादरम्यान, सूरजच्या घराचं काम कसं सुरू आहे हे पाहण्यासाठी अजित पवारांनी स्वत: देखील उपस्थित राहिले होते. त्यामुळे आज त्यांच्या जाण्याने सूरज चव्हाण भावुक झाला असून त्याने पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’त खेळाला नवं वळण! प्यादे कोण, वजीर कोण? प्रोमोंमधून उलगडतोय डाव






