महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे नेमकं काय आहे कारण?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, “अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका,” असा इशाराही देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते क्षेत्र जमिनीवर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. मुंबई व पालघरमध्येही पहाटेपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे.
मराठवाड्यातील शेतजमिनी तळ्यांत रूपांतरित झाल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांना वेडा पडला असून घरांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परिणामी रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
Dombivli Crime: संतापजनक! शाळेच्या मुख्याध्यापकानेच 6 वर्षांच्या विद्यार्थिनीवर केला अतिप्रसंग
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
– रेड अलर्ट – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा
– ऑरेंज अलर्ट – रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
– यलो अलर्ट – नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा






