महाराष्ट्र दहावी निकाल २०२५ लाईव्ह, Maharashtra SSC Result Live
Maharashtra SSC 10th Result Live : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज म्हणजेच १३ मे रोजी दुपारी १ वाजता SSC परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) सोमवारी ही घोषणा केली. सकाळी ११ वाजता उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, दहावीचा विभाग व लिंगनिहाय निकाल असे तपशील पत्रकार परिषदेत जाहीर केले जातील तर एसएससी निकालाची लिंक दुपारी १ वाजता सक्रिय होईल. लिंक सक्रिय झाल्यानंतर, तुम्ही अधिकृत वेबसाइट sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org आणि results.digilocker.gov.in ला भेट देऊन निकाल तपासू शकता. तसेत प्रत्येक अपडेटसाठी नवराष्ट्र डिजीटल फॉलो करा.
13 May 2025 01:02 PM (IST)
दहावीच्या गुणपत्रिका 16 मे पासून शाळांमध्ये भेटण्यास सुरुवात होणार. दहावीच्या पुनर्परीक्षेची अवयवदन पत्र 15 मे पासून भरण्यास सुरुवात होईल.
13 May 2025 01:01 PM (IST)
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची लिंक दुपारी १ वाजता सक्रिय होईल, ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा –
महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट sscresult.mkcl.org ला भेट द्या.
होम पेजवरील एसएससी निकाल २०२५ च्या लिंकवर क्लिक करा.
आता रोल नंबर इत्यादी तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
तुमच्या स्क्रीनवर मार्कशीट दिसेल.
आता तपासा आणि डाउनलोड करा.
13 May 2025 12:42 PM (IST)
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी मुलांवर मात केली आहे. यावेळी ९६.१४% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ९२.३२% आहे.
13 May 2025 12:08 PM (IST)
२०२५ च्या एसएससी परीक्षेत बसलेल्या १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. दहावीचा निकाल लवकरच जाहीर होईल. तसेच विभागवार उत्तीर्णतेची टक्केवारी देखील जाहीर केली जाईल.
13 May 2025 11:22 AM (IST)
दहावीचा निकाल 94.10 टक्के निकाल लागला. नेहमीप्रमाणे नऊ विभागीय मंडळातून कोकणातून बाजी मारली आहे. कोकण विभागीय मंडळाचा 98.82 टक्के निकाल, नागपूर विभागाचा सर्वाधिक कमी 90.88 टक्के निकाल लागला आहे.
13 May 2025 11:19 AM (IST)
महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आज संपणाऱ्या परीक्षेच्या समाप्तीपासून जे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.
13 May 2025 11:17 AM (IST)
महाराष्ट्र बोर्डाची एसएससी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात आली. ही परीक्षा राज्यभरात नियुक्त केलेल्या विविध केंद्रांवर घेण्यात आली. मंडळाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही परीक्षा घेण्यात आली.
13 May 2025 11:17 AM (IST)
महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट sscresult.mkcl.org ला भेट द्या.
होम पेजवरील एसएससी निकाल २०२५ च्या लिंकवर क्लिक करा.
आता रोल नंबर इत्यादी तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
तुमच्या स्क्रीनवर मार्कशीट दिसेल.
आता तपासा आणि डाउनलोड करा.
13 May 2025 11:16 AM (IST)
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत बसलेल्या सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होईल.
13 May 2025 11:15 AM (IST)
गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. एकूण ९५.८१ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. यावेळी निकाल १३ मे रोजी जाहीर होत आहे.
13 May 2025 11:07 AM (IST)
1. https://www.mahahsscboard.in/
2. https://mahresult.nic.in/
3. https://main.mahahsscboard.in/mr
4. hscresult.mkcl.org