Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Vehicle Sales : गाड्यांच्या विक्रीत महाराष्ट्राचा ‘टॉप गिअर’ ; देशात पहिल्या तिनमध्ये दबदबा

Maharashtra Vehicle Sales : पुण्यातील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (एसआयएएम) अहवालानुसार, वाहन विक्रीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. कार आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2026 | 04:07 PM
Maharashtra Leads India in Vehicle Sales

Maharashtra Leads India in Vehicle Sales

Follow Us
Follow Us:
  • वाहन विक्रीत महाराष्ट्राची देशात बाजी
  • आंर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सर्वच श्रेणींत महाराष्ट्र पुढे
  • देशात पहिल्या तीनमध्ये दबदबा
Maharashtra Vehicle Sales : किरण ढोरे: पुणे : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वाहन विक्रीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून कार आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीतही महाराष्ट्राने देशातील पहिल्या तीन राज्यांमध्ये स्थान मिळविले आहे.

पुण्यातील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (एसआयएएम) आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत देशभरात ४६.४३ लाख कारची विक्री झाली. त्यापैकी महाराष्ट्रात तब्बल ५.६१ लाख कारची विक्री झाली असून, एकूण विक्रीत राज्याचा १२.१ टक्के वाटा आहे. उत्तर प्रदेश ४.९२ लाख कार विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर असून गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे.

‘लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता…’; अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी

व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत पहिले स्थान

अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवली आहे. देशभरात १०.८० लाख व्यावसायिक वाहनांची विक्री झाली असून, त्यापैकी १.६२ लाख वाहने महाराष्ट्रात विकली गेली. यामध्ये मालवाहतूक वाहने आणि प्रवासी बसचा समावेश आहे. एकूण विक्रीतील १५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.

दुचाकीत दुसऱ्या स्थानावर

दुचाकी वाहन विक्रीत उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर असला, तरी महाराष्ट्राने २४.५३ लाख दुचाकी विक्रीसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे. एकूण विक्रीतील राज्याचा वाटा ११.३ टक्के इतका आहे. तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तीनचाकी वाहनांच्या विक्रीतही महाराष्ट्राने मजबूत कामगिरी केली आहे. देशभरात ८.३६ लाख तीनचाकी वाहनांची विक्री झाली असून, महाराष्ट्रात ८८ हजार ६१६ वाहनांची विक्री झाली. राज्याचा एकूण विक्रीतील वाटा १०.६ टक्के आहे.

वाहन उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्रातील वाढती शहरीकरण प्रक्रिया, औद्योगिक विकास, मजबूत रस्ते जाळे आणि वाहन खरेदीसाठी उपलब्ध वित्तपुरवठा यामुळे वाहन विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक यांसारख्या शहरांमध्ये खासगी वाहनांची मागणी वाढल्याचेही चित्र आहे.

व्यावसायिक वाहन विक्रीतील १५ टक्के वाटा राज्याचा

अवजड मालवाहतूक वाहने, प्रवासी बस यांसारख्या १०.८० लाख व्यावसायिक वाहनांची देशात विक्री झाली. महाराष्ट्राने १.६२ लाख वाहनांची विक्री करत १५ टक्के वाटा संपादन केला आहे. गुजरातमध्ये ९२ हजार ८८० वाहनांची विक्री झाली असून, ८.६ टक्के वाटा संपादन केला आहे. तमिळनाडूमध्ये ९० हजार ७२० वाहनांची विक्री झाली असून, ८.४ टक्के वाटा संपादन केला आहे. उत्तर प्रदेशने ८.३ टक्के आणि कर्नाटकने एकूण विक्रीतील ७.१ टक्के वाटा.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील वाहन विक्रीची आकडेवारी

वाहन प्रकार   देशातील एकूण विक्री महाराष्ट्रातील विक्री  राज्याचा वाटा
कार  ४६.४३ लाख ५.६१ लाख १२.१ टक्के
व्यावसायिक (वाहने) १०.८० लाख १.६२ लाख १५ टक्के
दुचाकी २.१७ कोटी  २४.५३ लाख ११.३ टक्के
तीनचाकी  ८.३६ लाख ८८,६१६ लाख १०.६ टक्के

देशातील प्रमुख राज्यांची कामगिरी

  • कार विक्रीत महाराष्ट्र प्रथम
  • व्यावसायिक वाहन विक्रीत महाराष्ट्र अव्वल
  • दुचाकी विक्रीत उत्तर प्रदेश प्रथम, महाराष्ट्र द्वितीय
  • तीनचाकी विक्रीत उत्तर प्रदेश प्रथम, महाराष्ट्र तृतीय
  • गुजरात आणि कर्नाटकचीही मजबूत कामगिरी
महायुतीत वर्चस्ववादासाठी रस्सीखेच; भाजपा, राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून मतदारसंघ मिळवण्यासाठी हालचाली

Web Title: Maharashtra tops vehicle sales india 2025 26 auto market growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
1

TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

धाराशिव जिल्हा परिषद राज्यात अव्वल; प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब ते सौरऊर्जा; ‘धाराशिव व्हिजन २०३०’ची राज्यभर चर्चा
2

धाराशिव जिल्हा परिषद राज्यात अव्वल; प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब ते सौरऊर्जा; ‘धाराशिव व्हिजन २०३०’ची राज्यभर चर्चा

Bhandara: बसस्थानकावरील पाणपोई बंदच; परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती
3

Bhandara: बसस्थानकावरील पाणपोई बंदच; परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
4

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.