Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Updates : छत्री घेऊनच पडा बाहेर! अवकाळी अन् गारपिटीचा फटका; IMD कडून राज्याला अलर्ट

आयएमडीकडून म्हणजेच भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2026 | 10:51 AM
Maharashtra Weather Updates today weather marathi news mumbai pune rain

Maharashtra Weather Updates today weather marathi news mumbai pune rain

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रामधील आजचे हवामान काय?
  • राज्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता
  • मुंबई, पुणे आणि कोकणमधील हवामान अंदाज आला समोर
 

Maharashtra Weather Updates : मुंबई : महाराष्ट्राला प्रचंड कडक उन्हाळा आणि अवकाळी पाऊस असा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला 40 अंश पार चढलेला उन्हाच्या पाराने सर्वांच्या जीवाची लाही केली आहे. तर दुसरीकडे अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावला आहे. मागील पाच दिवसांपासून उन्हाचा चटका जोरदार वाढलेला असताना कालपासून राज्यात हवामान (IMD Weather Update) बदल झाला आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या असून पूर्वमौसमी पावसाला पोषक असे हवामान तयार झाले आहे.

 

भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कर्नाटक ते मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. सोमवारी वर्धा जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हे देखील वाचा : ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा

तुमच्या शहरातील हवामान अंदाज काय?
उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पाच दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. त्यातच पुढील दोन दिवस मुंबईत पावसाची अधिक शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील ४८ तास पावसाळी वातावरण राहणार आहे.

हे देखील वाचा : मुंबईचा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर! मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश

त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रसह कोकण मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिट होणार असल्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वीच कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला होता.

रात्री बरसल्या सरी

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काल सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अवकाळी पावसाने लोकांची तारांबळ उडाली असून चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. अवकाळी पावसाचा आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra weather updates today weather marathi news mumbai pune rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • imd
  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Weather
  • maharashtra weather news

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून दाखल; तळकोकणाला झोडपले; आता काही दिवसांतच…
1

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून दाखल; तळकोकणाला झोडपले; आता काही दिवसांतच…

Maharashtra Rain Alert: पुणेकर सावधान! पुढील तीन दिवसांत मेघगर्जना अन्…; IMD कडून ‘यलो’ अलर्ट जारी
2

Maharashtra Rain Alert: पुणेकर सावधान! पुढील तीन दिवसांत मेघगर्जना अन्…; IMD कडून ‘यलो’ अलर्ट जारी

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज!  सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी
3

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज! सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी

Mumbai News: मुंबईच्या 7 तलावांत केवळ 45 दिवसांचा पाणीसाठा; IMD च्या अंदाजाने BMC ची चिंता वाढली
4

Mumbai News: मुंबईच्या 7 तलावांत केवळ 45 दिवसांचा पाणीसाठा; IMD च्या अंदाजाने BMC ची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.