Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्ह्यात महायुतीला कल; कोणात्या पक्षाच्या किती जागा आल्या? पाहा एका क्लिकवर

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2024 | 05:20 PM
सांगली जिल्ह्यात महायुतीला कल; कोणात्या पक्षाच्या किती जागा आल्या? पाहा एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला आहे. जिल्ह्यात शिराळा, मिरज, सांगली, आणि जत या जागांवर भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दोन जागा व काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

सुरुवातीला एकाकी वाटणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्यजित देशमुख यांनी विजय मिळवला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक यांचा या ठिकाणी पराजय झाला आहे. मानसिंगराव नाईक हे जयंत पाटील यांचे निकटवर्ती समजले जातात, त्यामुळे ही जयंत पाटील यांची नामुष्की समजली जात आहे.

मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री सुरेश खाडे यांनी विजय मिळवला, याठिकाणी शिवसेने उबठाचे तानाजी सातपुते यांनी निवडणूक लढली होती, वंचित व एमआयएमने देखील निवडणूक काढली मात्र पालकमंत्री असताना केलेली विकास कामांच्या जोरावर खाडे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला, खाडे यांना सुमारे 45 हजारांची आघाडी मिळाली.

सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत हॅट्रिक केले आहे, गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढली, त्याचबरोबर काँग्रेस मधून बंडखोरी करत जयश्री पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला, याचा परिणाम मत विभागणी मध्ये झाला; व गाडगीळ यांची विजयाची वाट मोकळी झालेली या ठिकाणी पाहायला मिळाली.

इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विजय मिळाला, मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून निशिकांत पाटील यांनी त्यांना कडवी झुंज दिली. महायुतीतून माजी मंत्री सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, गौरव नायकवडी, आनंदराव पाटील असे सर्व घटक पक्ष एकत्र आल्याने जयंत पाटील यांचे मताधिक्य कमालीचे कमी झाले.

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळवला, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून वैभव पाटील यांनी निवडणूक लढली तर माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी या ठिकाणी बंडखोरी केली होती. अनिल बाबर यांची सहानुभूती आणि केलेली विकासकामे यामुळे बाबर यांचा विजय झाला.

पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम हे विजयी झाले, मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे संग्राम देशमुख यांनी कडवी झुंज दिली असल्याचे पाहायला मिळाले. विश्वजीत कदम २०१९ मध्ये सुमारे पावणे दोन लाख मतांनी विजयी झाले होते, मात्र यावेळी ते 1 लाख 29 हजार मतांपर्यंत खाली आले.

जतकरांचा छंद गोपीचंद

जत विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला. या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरील उमेदवार हा मुद्दा चर्चेचा राहिला, मात्र पडळकर यांनी प्रचाराच्या माध्यमातून हा मुद्दा खोडून काढला. या ठिकाणी काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढली. भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीनंतरही पडळकर यांना हा विजय मिळवता आला. देवेंद्र फडणवीस यांनी सभेवेळी पडळकर यांना दिलेल्या मंत्री पदाच्या संधीचा उल्लेख देखील त्यांच्या विजयला कारणीभूत ठरला.

हे सुद्धा वाचा : मुलाची रणनीती अन् वडिलांचा विजय; बापू पठारे यांना अश्रू अनावर

तासगवात रोहित दादाच

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विजय मिळवला, त्यांच्या विरोधात दोनवेळा खासदार राहिलेले संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडणूक लढली. याठिकाणी नवीन युवक विरुद्ध मुरब्बी राजकारणी अशी लढत झाली, ज्यामध्ये रोहित पाटील यांनी सुमारे 28 हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

Web Title: Mahayuti has won more seats in sangli district nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 05:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • shivsena

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
2

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
3

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
4

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.