File Photo : Bike Theft
शिक्रापूर : सणसवाडी (ता.शिरुर) येथील आनंदनगरमध्ये भाजी विक्रेत्याची दुचाकी घेऊन भाडेकरू फरार झाल्याची घटना घडली. विनोद वाघे यांचे भाजी विक्रीचे दुकान असून, सदर दुकानासमोर रोहिदास गाडेकर यांच्या खोलीमध्ये गुरुदास पाटील भाडेकरू म्हणून राहत होता. दररोज भाजी घेण्यास येत असल्याने गुरुदासची ओळख विनोद यांच्यासोबत झाली होती.
हेदेखील वाचा : Jalna Crime News: पुन्हा सैराट! आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांच घृणास्पद कृत्य, मुलीसह नवऱ्याला आणि नातूला..
गुरुदास याच्याकडे काही उधारी झालेली असल्याने विनोद यांनी त्याला पैसे मागितले असता त्याने माझी पत्नी व मुले गावाला आहेत. त्यांना घेऊन येथून मित्राकडून पैसे आणायचे असे सांगून गुरुदासने विनोद यांना दुचाकी मागितली. तेव्हा विनोद यांनी त्यांची दुचाकी त्याला दिली. त्यांनतर गुरुदास परत आलाच नसल्याने त्याला मोबाईलवर संपर्क केला. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यांनतर त्याचा मोबाईल नंबर बंद झाला. त्यामुळे विनोद याने खोलीमालक रोहिदास गाडेकर यांच्याकडे चौकशी केली.
तेव्हा गुरुदास याने परस्पर खोली खाली करुन पत्नी व मुलाला घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विनोद यांची दुचाकी घेऊन तो फरार झाल्याचे लक्षात आल्याने याबाबत विनोद रघुनाथ वाघे (वय ३३ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुरुदास पाटील (रा. जळगाव जि. जळगाव) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.