आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांच घृणास्पद कृत्य, मुलीसह नवऱ्याला आणि नातूला.. (फोटो सौजन्य-X)
Jalna Crime News Marathi: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सैराट सिनेमाची पुनरावृत्ती झाल्याचे अनेक घटना ऐकायला मिळत असतात. अशातच पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील एका दुर्गम गावात आंतरधर्मीय धर्माबाहेर लग्न म्हणून मुलीच्या कुटुंबियाने दोन महिने मुलीसह नवरा आणि नातूला बेड्या घालून कोंडून ठेवलं होते. मात्र पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी आलापूर भागातून सुटका केली. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत तिला पतीच्या स्वाधीन केले.
जालन्यातील भोकरदन शहरातील आलापूर येथील खालिद शाह आणि सिकंदर शाह यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असताना, सागर संजय ढगेसोबत आंतरधर्मीय विवाह झाला होता. यानंतर शहा कुटुंब आलापूर येथे परतले. या विवाह संबंधातून शहनाजला 3 वर्षांचा कार्तिक झाला आहे. साधारणपणे सुमारे दोन महिने आधी जेव्हा शहनाजच्या मोठ्या बहीणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ पाहण्याच्या कारणाने आईने तिला व तिचा पती सागर यांना आलापूर येथे बोलावून घेतले. या ठीकाणी आले असता, शहनाज व मुलगा कार्तिकला तिच्या आई-वडिलांनी घरात ठेवून घेतले व पती सागरला घरातून हाकलून दिले. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी सागर पुन्हा पत्नीला घेण्यासाठी गेला असता, तुझा व आमचा धर्म वेगळा असून, आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे म्हणत सागरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत हाकलून दिले.
पण, २४ डिसेंबर रोजी शहनाजच्या बहीणीने सागरला फोन करून शहनाज आणि मुलाला घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे सागरने खंडपीठात धाव घेऊन पत्नी आणि मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बी. टी. सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे आलापूर येथील खालेद शहा यांच्या घरात घुसून शहनाज व कार्तिकला ताब्यात घेतले. यावेळी शहनाजचे दोन्ही पाय साखळदंडाने बांधून त्यांना दोन कुलूप लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी कुलपांच्या बनावट किल्ल्या तयार करून कुलपे उघडून शहनाजला मुक्त केले. त्यानंतर, २९ जानेवारी रोजी, उपनिरीक्षक सहाणे यांनी शहनाज आणि कार्तिक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए. आर. काळ्या यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हजर करून पती सागरच्या स्वाधीन केले.
ठेवलेल्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. मंगळवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना निर्देश दिले, त्यानंतर पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली. शहनाज उर्फ सोनल नावाच्या महिलेची भोकरदन तहसीलमधील अलापूर गावात तिच्या माहेरच्या घरातून सुटका करण्यात आली, जिथे तिच्या पालकांनी तिला दोन महिने साखळदंडांनी बांधून ठेवले होते, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा आंतरधर्मीय विवाह झाला होता आणि तिला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ती दोन महिन्यांपूर्वी तिच्या मुलासह तिच्या पालकांना भेटायला गेली होती. महिलेच्या आंतरधर्मीय विवाहामुळे संतप्त झालेल्या तिच्या पालकांनी तिला तिच्या पतीकडे जाऊ दिले नाही आणि घरात साखळदंडांनी बांधून ठेवले. अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक वेळा प्रयत्न करूनही महिलेचा पती तिला परत आणू शकले नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, पालकांविरुद्ध अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि महिलेने तक्रार दाखल केल्यास कारवाई केली जाईल.
Crime News: आरोपी महिलेच्या घराबाहेर आला, हात पकडला अन्…; पोलिसांकडून गुन्हा दाखल