Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Weather News: अचानक झालेल्या हवामानातील बदल व अवकाळी पाऊस यामुळे सध्या झाडांवर काही प्रमाणात शिल्लक असलेली फळे गळून पडणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 03:18 PM
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Follow Us
Close
Follow Us:

आंबा, काजू बागायतदार संकटात
शासनाला अहवाल सादर करा; शेतकऱ्यांची मागणी 
जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन

सिंधुदुर्गनगरी:  सिंधुदुर्गात बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोक्यात आले आहे. शासनाने अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे काजू आंबा पिक बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी पंचायत समिती सभापती जयप्रकाश चमणकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्यासह तालुक्यातील बागायतदार व व्यापारी प्रकाश विश्राम बोवलेकर, श्यामसुंदर राय यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे. दि. २३ पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून बदललेल्या वातावरणाबाबत व झालेल्या अवकाळी पावसाबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा व ज्या शेतकऱ्यांची पीकपाणी नौद ऑनलाईन झालेली नाही त्यांची ऑफलाइन नोंद करण्याबाबत तलाठ्यांना त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला

या निवेदनाची दखल शासनाने घेतल्यास फळ बागायतदारांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. अचानक झालेल्या हवामानातील बदल व अवकाळी पाऊस यामुळे सध्या झाडांवर काही प्रमाणात शिल्लक असलेली फळे गळून पडणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. याबाबत पालकमंत्री यांना देखील निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Alphonso शेतकरी संकटात?

कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर बंदा हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम झाल्याचे चित्र शिरगाव परिसरात दिसून येत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आलेला मोहर बदललेल्या वातावरणामुळे करपून गळाल्याने बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसाळ्यानंतर अचानक वाढलेली थंडी आणि किमान तापमानातील तीव्र घसरण यामुळे आंब्याच्या बहरावर प्रतिकूल परिणाम झाला.

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

यावर्षी थंडीचे प्रमाण चाढल्यामुळे तुडतुडा व क्षिप्स या कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तापमानातील अचानक बदलामुळे नैसर्गिक परागीभवन प्रक्रियेत अडथळे निर्माण इाले. परिणामी, मोठ्या अपेक्षेने बहरलेला मोहर काळवंडून आंबा पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून महागडी कीटकनाशके व औषधफवारणी केली, मात्र त्यातून अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. कलमांची देखभाल, साफसफाई, खते, मशागत आणि मजुरीचा वाढता खर्च वामुळे बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, दरम्यान, कृषी विभागाने बाधित बागांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Web Title: Mango and cashew are danger in unseasonal rain in sindhudurg kokan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Kokan News
  • Unseasonal Rain
  • Weather

संबंधित बातम्या

Konkan चा ‘वणवा’ विधानसभेत; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमदार निकमांची मागणी
1

Konkan चा ‘वणवा’ विधानसभेत; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमदार निकमांची मागणी

चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय
2

चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा
3

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…
4

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.