• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Alphonso Mohor Damage By Weather Changes In Ratnagiri Kokan Farmers

Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला

आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, तर दुसऱ्या टण्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर अति थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2026 | 02:44 PM
Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला

हापूसचा मोहोर करपला (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हवामानबदलाचा फळावर परिणाम
हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला
रायवळही कीड-रोगांच्या विळख्यात

सिंधुदुर्गनगरी: कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर बंदा हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम झाल्याचे चित्र शिरगाव परिसरात दिसून येत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आलेला मोहर बदललेल्या वातावरणामुळे करपून गळाल्याने बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसाळ्यानंतर अचानक वाढलेली थंडी आणि किमान तापमानातील तीव्र घसरण यामुळे आंब्याच्या बहरावर प्रतिकूल परिणाम झाला.

यावर्षी थंडीचे प्रमाण चाढल्यामुळे तुडतुडा व क्षिप्स या कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तापमानातील अचानक बदलामुळे नैसर्गिक परागीभवन प्रक्रियेत अडथळे निर्माण इाले. परिणामी, मोठ्या अपेक्षेने बहरलेला मोहर काळवंडून आंबा पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून महागडी कीटकनाशके व औषधफवारणी केली, मात्र त्यातून अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. कलमांची देखभाल, साफसफाई, खते, मशागत आणि मजुरीचा वाढता खर्च वामुळे बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, दरम्यान, कृषी विभागाने बाधित बागांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

कष्टाने जोपासलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. हवामानातील बदल आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव या दुहेरी संकटात बागायतदार सापडले आहेत, रायवळ आंबाही कीड-रोगाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. आबा व काजू ही येथील प्रमुख नगदी पिके असून शेतक-यांचा उदरनिर्वाह आणि स्थानिक अर्थकारण मोठ्या प्रमाणावर त्यावर अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे चंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला, आता आधार कोणाच? असा प्रथन बागायतदार उपस्थित करीत आहेत.

‘हापूस’कडून निराशा!

आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, तर दुसऱ्या टण्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर अति थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे. त्यामुळे १९० टक्के मोहोर आला असला तरी दहा टक्के देखील फळधारणा न झाल्यामुळे लाखो रुपये खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांवर खर्च केलेले आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड

आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे. आंबा पीक तर गेली काही वर्षे सतत बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूहात अडकल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस लांबला, त्यामुळे आंबा हंगाम लांबणार, असा सुरुवातीचा अंदाज होता. परंतु, १५ नोव्हेंबरनंतर थंडीची चाहुल सुरू झाली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Alphonso mohor damage by weather changes in ratnagiri kokan farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Farmers
  • kokan

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे? कागदोपत्री साठा मुबलक असून देखील शेतकरी हतबल
1

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरियाचा खेळ नेमका अडतोय कुठे? कागदोपत्री साठा मुबलक असून देखील शेतकरी हतबल

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
2

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल ‘इतके’ बिबटे जेरबंद
3

ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल ‘इतके’ बिबटे जेरबंद

कोकणच्या ‘लक्ष्मी’वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले, “जिल्हाधिकारी…”
4

कोकणच्या ‘लक्ष्मी’वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले, “जिल्हाधिकारी…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND w vs AUS W, 3rd T20I :  भारताला ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे लक्ष्य! मानधना आणि रॉड्रिग्ज जोडीची तूफान फटकेबाजी 

IND w vs AUS W, 3rd T20I :  भारताला ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे लक्ष्य! मानधना आणि रॉड्रिग्ज जोडीची तूफान फटकेबाजी 

Feb 21, 2026 | 04:49 PM
Mumbai Central Park: महालक्ष्मी रेसकोर्सवरील ‘सेंट्रल पार्क’ वादाच्या भोवऱ्यात! १०२ वास्तुविशारदांचा भूमिगत बांधकामाला तीव्र विरोध

Mumbai Central Park: महालक्ष्मी रेसकोर्सवरील ‘सेंट्रल पार्क’ वादाच्या भोवऱ्यात! १०२ वास्तुविशारदांचा भूमिगत बांधकामाला तीव्र विरोध

Feb 21, 2026 | 04:45 PM
अत्यंत दु:खद! CRPF चे वाहन रस्त्यावरून घसरले अन् थेट…; 7 पेक्षा जास्त जवान जखमी

अत्यंत दु:खद! CRPF चे वाहन रस्त्यावरून घसरले अन् थेट…; 7 पेक्षा जास्त जवान जखमी

Feb 21, 2026 | 04:38 PM
Bigg Boss Marathi 6 : चालू भाऊच्या धक्क्यावर तुफान राडा! ‘मी काहीतरी केलं, तुम्ही फक्त लव्हलपाटा…’ राखी उठली पेटून

Bigg Boss Marathi 6 : चालू भाऊच्या धक्क्यावर तुफान राडा! ‘मी काहीतरी केलं, तुम्ही फक्त लव्हलपाटा…’ राखी उठली पेटून

Feb 21, 2026 | 04:35 PM
Maval SSC Exam: दहावीच्या परीक्षेसाठी मावळ सज्ज! २३६९ विद्यार्थ्यांना ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत पिक-अप आणि ड्रॉप सुविधा

Maval SSC Exam: दहावीच्या परीक्षेसाठी मावळ सज्ज! २३६९ विद्यार्थ्यांना ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत पिक-अप आणि ड्रॉप सुविधा

Feb 21, 2026 | 04:34 PM
सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; ट्रम्प टॅरिफमुळे धमाका!, पाहा तुमच्या शहरातील नवे दर…

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; ट्रम्प टॅरिफमुळे धमाका!, पाहा तुमच्या शहरातील नवे दर…

Feb 21, 2026 | 04:33 PM
मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

Feb 21, 2026 | 04:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.