Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा -मानांकन मिळाले पाहिजे”, शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली स्पष्ट भूमिका

कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. बांबू लागवड, ॲग्रीस्टॅक योजनेतील अडचणी संदर्भात देखील निकम यांनी यावेळी भाष्य केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 11, 2025 | 06:44 PM
"कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा -मानांकन मिळाले पाहिजे", शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली स्पष्ट भूमिका

"कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा -मानांकन मिळाले पाहिजे", शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली स्पष्ट भूमिका

Follow Us
Close
Follow Us:
  • कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा
  • शेखर निकम यांची अधिवेशनात मागणी
  • बलसाडच्या आंब्याला हापूसचा मानांकन देण्यास विरोध
चिपळूण : चिपळूण -कराड मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरावस्था, घाटात झालेल्या कामांची चौकशी करण्याबरोबरच कोकणातील आंब्याला हापूसचा दर्जा, मानांकन मिळालेच पाहिजे. बलसाडच्या आंब्याला हापूसचा मानांकन देण्यास आमचा प्रखर विरोध आहे, असे ठामपणे आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडून कोकणाला न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी केली. तसेच बांबू लागवड, ॲग्रीस्टॅक योजनेतील अडचणी संदर्भात देखील निकम यांनी यावेळी भाष्य केले.

नागपूर येथे राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आमदार शेखर निकम चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर विधानसभेचे लक्ष वेधून घेत आहेत. गुरुवारी कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरावस्था, कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या घाटातून प्रवास करणे म्हणजे दिवास्वप्नच आहे. गेल्यावर्षी या घाटातील कामांसाठी ११ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या घाटातील काम दर्जेदार झालेले दिसत नाही. चिपळूण ते पाटण असा प्रवास आपल्या वाहनाने करायचे म्हटले, तर आमदारकीचा ‘सिम्बॉल’ लपवून ये – जा करावे लागते अशी या रस्त्याची परिस्थिती आहे. तरी कुंभार्ली घाटात झालेल्या कामांची चौकशी होऊन हा घाट प्रवासा योग्य करावा, अशी मागणी निकम यांनी यावेळी केली.

तसेच कोकणातील हापूसच्या आंब्याला बलसाडच्या आंब्याला हापूसचा दर्जा मिळण्याच्या विषयावरून आमदार शेखर निकम यांनी कोकणातील हापूस आंब्याच्या बाजूने जोरदारपणे आपली भूमिका अधिवेशनात मांडली. यावेळी ते म्हणाले की, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याला हापूस दर्जा, मानांकन मिळाले पाहिजे. बलसाडच्या आंब्याला हापूसचे मानांकन देण्याचे जे धोरण सुरू आहे. त्याला आमचा प्रखर विरोध आहे, ते सर्वांनी मिळून करायला हवे. महाराष्ट्र सरकारने कोकणच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ चेन्नईच्या कोर्टात गेले आहे. हापुस आमच्या हक्काचा आंबा आहे. शासनाने कोकणाला न्याय द्यावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी यावेळी केली.

फळपीक विमा योजनेबाबत भाष्य करताना १५ मे पर्यंत विमा काढण्याची मुदत आहे. ती मुदत आंबा पिकासाठी १५ जून पर्यंत वाढवून मिळावी. बांबू लागवड योजनेबाबत देखील योग्य धोरण आखण्यात यावे. ॲग्री स्टॅक योजनेत अनेक अडचणी आहेत. यावर देखील उपाययोजना कराव्यात. सिंधू रत्न योजना बंद झालेली आहे. ही योजना कोकणासाठी वरदान ठरली आहे. तरी ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेखर निकम यांनी यावेळी केली.

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर

Web Title: Mangoes from konkan should be given the hapus grade shekhar nikam stated clearly during the winter session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश
1

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
2

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महानगरपालिका निवडणुकीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास…; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
3

महानगरपालिका निवडणुकीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास…; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा
4

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.