सौजन्य - नवराष्ट्र टीम
नगरपरिषदेकडून यापूर्वीच अनधिकृत लेआउट धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र काही जणांनी निर्धारित मुदतीत पालन न केल्यामुळे प्रशासनाने सक्त कारवाई करत अनधिकृत प्लॉटिंग हटवण्याची मोहीम उभारली. चाकणमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई प्रथमच होत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. यामुळे अनधिकृत भूखंड विक्री करणाऱ्यांवर निश्चित अंकुश बसेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
कारवाईचा तपशील
कारवाईत तीन अधिकारी, तीन कर्मचारी, पाच पोलीस कर्मचारी, चार जेसीबी यंत्रणा, व्हिडिओग्राफर, अग्निशमन बंब, ट्रेलर आदी पथकांचा समावेश होता. एकूण 21 अनधिकृत भूखंडांवर कारवाई करण्यात आली आहे. हटविण्यात आलेल्या लेआउटचे एकत्रित क्षेत्रफळ अंदाजे 55 एकर आहे.
तोतया विक्रेते, सल्लागारांपासून सावध राहणे अत्यावश्यक
चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी सांगितले की, “अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामांविरुद्धची कारवाई पुढील काळातही कठोरपणे सुरू राहील. नागरिकांनी केवळ नगरपरिषदेत नियमित मंजूर असलेल्या प्लॉटचीच खरेदी करावी. तोतया विक्रेते आणि सल्लागारांपासून सावध राहणे अत्यावश्यक आहे.” चाकण शहरात अनधिकृत बांधकाम व प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेकडून करण्यात आलेली ही मोहीम निर्णायक ठरत असल्याचे प्रशासनाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे.






