Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Hunger Strike: “तळपत्या उन्हात तडफडून मरू दिलं तरी चालेल…”; उपोषण सुरू करताना जरांगे पाटील आक्रमक

आंतरवालीत आलेले लोक पाहून माझाही हुंदता दाटून आला. इतकं प्रेम कोणालाही मिळणार नाही. पण मी माझ्या मराठा समाजावर सरकारने अन्याय करू नये, अशी माझी भूमिका आहे. मी वारंवार विनंती केली की माझ्या समाजाला वेठीस धरू नका, माझ्या समाजाच्या लेकराबाळांनी काहीही केलेलं नाही

  • By anuradha sagar
Updated On: May 30, 2026 | 10:49 AM
'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Follow Us
Follow Us:

Manoj Jarange Hunger Strike: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आजपासून (30मे) पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं. उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. “मी समाजासाठी मरायला तयार आहे, लढायला तयार आहे, पण मागे हटणार नाही,” असे त्यांनी सांगितले.जरांगे पाटील यांच्या या भुमिकेनंतर उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू आले.अनेकांचा कंठ दाटून आला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकांचा माझ्यावर जीव आहे हे मला माहिती आहे. इथे आंतरवालीत उभं राहायला जागा नाही, ते पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं हा काहीतरी देऊ शकतो, समाजाला माझ्याकडून आशा आहेत. पण सरकार मराठा समाजावर वारंवार अन्याय करत आहे. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. पण मी मागे हटणार नाही,”

“सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान!

आंतरवालीत आलेले लोक पाहून माझाही हुंदता दाटून आला. इतकं प्रेम कोणालाही मिळणार नाही. पण मी माझ्या मराठा समाजावर सरकारने अन्याय करू नये, अशी माझी भूमिका आहे. मी वारंवार विनंती केली की माझ्या समाजाला वेठीस धरू नका, माझ्या समाजाच्या लेकराबाळांनी काहीही केलेलं नाही. पण सरकार तरीही अन्याय करत आहे. मला इथे गोळ्या घालून मारलं तरी मी मरायला तयार आहे. मी तडफडून या तळपत्या उन्हात मरू दिलं तरी मी मरायला तयार आहे. असंही जरांगे म्हणाले. मी सरकारवर अविश्वास दाखवत नाही. सरकारचे शिष्टमंडळ येईलच. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. शेवटी मला माझा समाज आणि समाजातील लेकरं प्रिय आहेत. असही त्यांनी नमुद केलं.

मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी सरकारसमोर काही ठोस मागण्या मांडल्या आणि केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष आदेश काढण्याची मागणी केली.

“प्रिय देवेंद्रजी, पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन,” संजय राऊत यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

१. ५८ लाख मराठा-कुणबी नोंदीं

जरांगे म्हणाले की, सरकारने शोधलेल्या ५८ लाख मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे संबंधित नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र (Validity) देण्यात यावे. यासाठी शासनाने स्पष्ट आदेश काढावेत. प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा निलंबनाची तरतूद असावी, अशी मागणी त्यांनी केली.

२. हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्र

हैदराबाद गॅझेट आणि स्थानिक चौकशी अहवालाच्या आधारे अर्ज करणाऱ्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता देण्यात यावी. केवळ मसुदा (Draft) नव्हे तर प्रत्यक्ष शासन आदेश जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.

३. सातारा संस्थान संदर्भातील जीआर

सातारा संस्थानाशी संबंधित शासन निर्णय (GR) काढण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र मराठा आरक्षणासंदर्भातील कोणताही निर्णय न्यायालयात आव्हान दिला जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

सरकारबाबत भूमिका

“सरकार येत राहील, जात राहील. चर्चा होत राहील. पण मी उपोषणावर ठाम आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठका सुरू असल्याची माहिती असल्याचे सांगितले. मात्र केवळ चर्चा किंवा मसुदा नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे आदेश काढावेत, अशी त्यांची भूमिका आहे.

Web Title: Manoj jarange patil hunger strike updates 2026 maratha reservation protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • hunger strike
  • Maharashtra Politics
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
1

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
3

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
4

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.