Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांना असुरक्षित वाटतंय? अनेकांना हवंय पिस्तूल; तब्बल ‘इतक्या’ जणांनी केली मागणी

सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात रहिवाशी असलेल्या एका विशिष्ट वर्गाला पिस्तूल "कंबरेला" हवेहवेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांकडे अर्ज करून पिस्तूल बाळगण्याची मागणी करत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 15, 2024 | 01:29 PM
पुणेकरांना असुरक्षित वाटतंय? अनेकांना हवंय पिस्तूल; तब्बल 'इतक्या' जणांनी केली मागणी

पुणेकरांना असुरक्षित वाटतंय? अनेकांना हवंय पिस्तूल; तब्बल 'इतक्या' जणांनी केली मागणी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात रहिवाशी असलेल्या एका विशिष्ट वर्गाला पिस्तूल “कंबरेला” हवेहवेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांकडे अर्ज करून पिस्तूल बाळगण्याची मागणी करत आहेत. गेल्या तीन वर्षात हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसत आहे. परंतु, कडक शिस्तीच्या पोलीस आयुक्तांनी कठोर भूमिका बाळगत अनेक माननियांचे अन् बडेजाव मारणाऱ्यांचे फाईलवर नो असा म्हणत परवाने नाकरले आहेत. तीन वर्षात सातशेहून अधिक अर्ज आले असून, त्यापैकी तब्बल ३७३ अर्जदारांना आयुक्तांनी नकाराचा दणका दिला आहे.

सुरक्षित शहरासोबत राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि पेन्शनरांचे शहर ही खरी पुण्याची ओळख. नोकरी, व्यवसाय, उद्योग व शिक्षण यामुळे जगभरातील लोक शहराला पसंती देतात. मात्र अलिकडे विस्तारत असलेल्या शहराने गुन्हेगारीचा आलेख देखील पुर्ण केला आहे. गुन्हेगारीबरोबर बेकायदा पिस्तुलांचा सुळसुळाट झाला आहे. पिस्तुल बाळगणे यासोबत त्याची विक्री देखील येतून होऊ लागली आहे. तर गुन्हेगारीत नव्याने पाऊल ठेवलेल्या तरुणांना कोयता, चाकू यापेक्षा पिस्तुल बाळगणे म्हणजे मोठा भाई झाल्याचा फिल येतो. त्यातून हे अवैध पिस्तुल बाळगू लागले आहेत. अशा शेकडो जणांना पकडले जात आहे.

पुणे शहरात हे चित्र असताना एका विशिष्ट वर्गाला जिवाची इतकी भिती वाटू लागली आहे की ते “स्व-रक्षणा”साठी परवाना घेऊन पिस्तूल मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, गमंत अशी आहे का हा वर्ग श्रीमंत आहे. त्यांना रक्षणापेक्षा असे परवाना असलेले पिस्तूल बाळगणे आणि फिरणे स्टेट्स तयार झाले आहे. त्यासाठी या वर्गाला पिस्तूल हवेहवेसे वाटू लागले आहे. पुण्यासारख्या शहराला हे न शोभणारे आहे. त्यामुळे याला आवर घालणेही गरजेचे आहे. पिस्तूल देताना खरच व्यक्तीला गरज आहे का, की फक्त एक स्टेट्स म्हणून तो पिस्तूल घेत आहे, हे पाहून देणे गरजेचे आहे. कडक शिस्तीच्या पोलीस आयुक्तांनी देखील खरी गमंत ओळखत त्यांना साजेशी भूमिका घेत अनेकांना नकार दिला आहे.

शहरातील परवानाधारक पिस्तूल संख्या

पुणे शहर- ५ हजार ४७८
पिंपरी-चंचिवड- ३ हजार ७५६
पुणे ग्रामीण- १ हजार ५७०

परवाने देतानाचे नियम

पिस्तूल परवाने देण्याची प्रक्रिया फार मोठी आहे. अर्जदार रहिवासी असलेल्या भागातील स्थानिक पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्तांपर्यंत संबंधित फाइल जाते. त्यात अर्जदाराच्या चारित्र्याची पडताळणी होते. सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर परवाना देण्याचा निर्णय घेतला जातो.

पोलिसांच्या नकारानंतरही मिळू शकतो परवाना

एखाद्या व्यक्तीला नियमानुसार परवाना देणे शक्य नसतानाही, पोलीस आयुक्त त्यांच्या अधिकारात निर्णय घेऊन परवाना देऊ शकतात. मात्र, त्यासाठी कारणही ठोस हवे असते. पोलिसांनी परवाना देण्यास नकार दिल्यास संबंधित अर्जदार गृहमंत्री किंवा गृह राज्यमंत्र्याकडे दाद मागू शकतो. त्या प्रकरणी सुनावणी होऊन निर्णय घेतला जातो.

हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद फ्लॅट फोडून तब्बल लाखोंचा ऐवज लंपास

अशी होते प्रक्रिया

  • पिस्तुलाचा परवाना पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून दिला जातो.
  • आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस आयुक्तांचा निर्णय अंतिम असतो.
  • उर्वरित संपूर्ण जिल्ह्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे फाइल पाठवितात.
  • स्थानिक पोलीस संबंधित व्यक्तीबाबत एक रिपोर्ट तयार करतात व तो वरिष्ठांना पाठवितात.
  • संबंधिताला पिस्तूल कशामुळे गरजेचे आहे, याचे ठोस कारण द्यावे लागते.
  • पिस्तूल घेण्यापुर्वी ते कुठे ठेवणार याचीही माहिती द्यावी लागते.
  • पिस्तूल घेतल्यानंतर त्याबाबत माहिती व नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करावी लागते.
  • वर्षाला परवाना रिनीव्ह करावा लागतो.

Web Title: Many citizens of pune have demanded to get pistols nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 01:29 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
1

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
2

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
3

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
4

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.