Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावर अनेक वाहने ‘फिटनेस’विनाच; सरकारच्या नियोजन अभावामुळे वाहन तपासणी ठप्प

१ फेब्रुवारीपासून वाहन तपासणीसाठी आगाऊ नोंदणी बंद करण्यात आली आहे. परिणामी, एसटी, पीएमपीच्या बसेस, ऑटो रिक्षा, तसेच हलकी, मध्यम व जड मालवाहतूक करणारी हजारो वाहने योग्यता प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2026 | 11:30 AM
रस्त्यावर अनेक वाहने 'फिटनेस'विनाच; सरकारच्या नियोजन अभावामुळे वाहन तपासणी ठप्प

रस्त्यावर अनेक वाहने 'फिटनेस'विनाच; सरकारच्या नियोजन अभावामुळे वाहन तपासणी ठप्प

Follow Us
Follow Us:

पुणे : जड, मध्यम व हलक्या प्रकारच्या सर्व वाहनांना दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस प्रमाणपत्र) घेणे बंधनकारक आहे. परंतु, स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (एटीएस) सुरू न झाल्याने पुणे विभागातील वाहन तपासणी प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली आहे. केंद्र शासनाच्या रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयच्या १२ सप्टेंबर २०२३ च्या अधिसूचनेनुसार योग्यता तपासणी स्वयंचलित केंद्रामध्येच करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, अडीच वर्षे उलटूनही पुणे प्रादेशिक परिवहन विभागात हे केंद्र कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे फिटनेसविना वाहने रस्त्यावर धावत आहेत.

१ फेब्रुवारीपासून वाहन तपासणीसाठी आगाऊ नोंदणी बंद करण्यात आली आहे. परिणामी, एसटी, पीएमपीच्या बसेस, ऑटो रिक्षा, तसेच हलकी, मध्यम व जड मालवाहतूक करणारी हजारो वाहने योग्यता प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे धोका पत्करून रस्त्यावर धावत आहेत. योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या वाहनांमुळे अपघात झाल्यास विमा मिळणार का, हा मोठा प्रश्न वाहनधारकांसमोर उभा आहे. योग्यता प्रमाणपत्राचा मूळ उद्देश वाहनांची योग्य स्थिती, देखभाल व सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. मात्र, ही प्रक्रिया बंद झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

हेदेखील वाचा : ‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

दरम्यान, रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

प्रमुख मागण्या काय?

– एटीएस केंद्र सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच योग्यता प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू ठेवावी. रिक्षा व छोट्या वाहनांना ३५-४० किमी दूर दिवे घाट परिसरात जावे लागू नये; आळंदी रस्त्यावरील परिवहन कार्यालयातच तपासणी करावी.

– रिक्षा पंचायतीने खासदार निधीतून दिलेल्या ५० लाख रुपयांत बसवलेल्या रोलर ब्रेक टेस्टरचा वापर तातडीने सुरू करावा.

– सीएनजी रिक्षांच्या हायड्रो टेस्टिंगचे दर ८००-९०० रुपयांवरून ३५००-४००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले असून, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित केंद्रांवर कारवाई करून दर पूर्ववत करावेत.

शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा

वाहनधारकांचा कसलाही दोष नसताना केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे हजारो वाहने ठप्प झाली असून, प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही प्रक्रिया सुरळीत करावी.

– नितीन पवार, रिक्षा पंचायत.

Web Title: Many vehicles on road without fitness vehicle inspections stalled due to government lack of planning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका
1

लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका

महाळुंगेतील भूखंड वाद तापला, दोन्ही बिल्डरांकडून परस्परांवर आरोप; नेमकं काय घडलं?
2

महाळुंगेतील भूखंड वाद तापला, दोन्ही बिल्डरांकडून परस्परांवर आरोप; नेमकं काय घडलं?

पेठ संस्कृतीवर मॉल संस्कृतीचे सावट? बदलत्या खरेदीच्या सवयींमुळे पारंपरिक बाजारपेठांचे बदलते स्वरूप 
3

पेठ संस्कृतीवर मॉल संस्कृतीचे सावट? बदलत्या खरेदीच्या सवयींमुळे पारंपरिक बाजारपेठांचे बदलते स्वरूप 

आरोग्याशी खेळणाऱ्यांवर ‘PMC’ ची कडक कारवाई; बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र
4

आरोग्याशी खेळणाऱ्यांवर ‘PMC’ ची कडक कारवाई; बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.