Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra Politics : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून आज अर्ज दाखल केले जाणार आहे. अजित पवारानंतर आता सुनेत्रा पवार या बारामतीसाठी अर्ज दाखल करत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2026 | 02:01 PM
LIVE
Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Follow Us
Close
Follow Us:
  • 06 Apr 2026 02:01 PM (IST)

    06 Apr 2026 02:01 PM (IST)

    नांदेडमध्ये पुन्हा खून; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची हत्या

    नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढत असून, शिंदे गटाचे कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांची पहाटे मॉर्निंग वॉकदरम्यान अज्ञातांनी हल्ला करून हत्या केली. तीन दिवसांत पाच खुनांनी शहर हादरले आहे. या घटनेवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

  • 06 Apr 2026 02:00 PM (IST)

    06 Apr 2026 02:00 PM (IST)

    अमेरिका-इस्रायलचा थरारक हवाई हल्ला! इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे कंबरडे मोडले

    मध्य-पूर्वेतील रणांगणातून आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि इराणचे कंबरडे मोडणारी बातमी समोर आली आहे. इराणची सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली लष्करी संघटना ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) चे गुप्तचर प्रमुख मेजर जनरल माजिद खातमी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आज ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इराणने अधिकृतपणे या बातमीला दुजोरा दिला असून, यामुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • 06 Apr 2026 01:55 PM (IST)

    06 Apr 2026 01:55 PM (IST)

    लग्नाच्या ४ वर्षांनंतर Karishma Tanna होणार आई

    टिव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. करिश्मा आई होणार असल्याची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली. तिने सोशल मीडियावर ही घोषणा करताच तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर केला आहे. अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत.करिश्मा शेवटची २०२३ मध्ये नेटफ्लिक्सच्या हिट शो ‘स्कूप’मध्ये दिसली होती. तिने तिच्या गरोदरपणाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आणि तिचा नवरा दोघेही ‘मॉम’ आणि ‘डॅड’ लिहिलेल्या बेसबॉल कॅप्स घातलेले दिसत आहेत.लग्नाच्या चार वर्षांनंतर करिश्माने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली, ज्यामुळे तिचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

  • 06 Apr 2026 01:45 PM (IST)

    06 Apr 2026 01:45 PM (IST)

    ‘चिंता, रिकामेपणा, अस्वस्थता’ वयाच्या 83 व्या वर्षीही बिग बींचं लागत नाही घरात मन

    बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षीही ते खूप सक्रिय आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामाबद्दल एक असे विधान केले आहे, ज्यामुळे सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत.

  • 06 Apr 2026 01:35 PM (IST)

    06 Apr 2026 01:35 PM (IST)

    मेक्सिकोत ट्रम्पविरोधात नागरिकांचा संताप अनावर; ‘Burning of Judas’ मध्ये प्रतिमा जळून खाक

    सध्या मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण तणावाबाबत (US Iran War) अनिश्चितता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी एकीकडे इराणसोबत आज करार होणार असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे त्यांना ४८ तांसात करार न झाल्यास हल्ल्याची धमकीही दिली आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. जर युद्ध सुरु झाले तर जागतिक पातळीवर पुन्हा एकदा इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची शक्यका आहे.

  • 06 Apr 2026 01:25 PM (IST)

    06 Apr 2026 01:25 PM (IST)

    कोलकाता – पंजाबच्या सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे खेळपट्टी

    IPL 2026 चा १२ वा सामना सोमवारी संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि पंजाब किंग्स (पीबीकेएस) यांच्यात खेळला जाईल. पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून दोन गुण मिळवणे हे केकेआरसाठी एक मोठे आव्हान आहे. कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएल २०२६ मध्ये सुरुवात खराब झाली आहे. आपले दोन्ही सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर केकेआर सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

  • 06 Apr 2026 01:15 PM (IST)

    06 Apr 2026 01:15 PM (IST)

    बारामतीचा विषय संजय राऊतांनी एकाच वाक्यात संपवला

    बारामतीमध्ये अजित पवारांनंतर पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्ज दाखल केला जात आहे. मात्र बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणार नसल्यासे स्पष्ट झाले आहे. शरद पवार गटाकडून घरातील सदस्य वारल्यामुळे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शरद पवारांच्या या भूमिकेला महाविकास आघाडीने असमर्थन दाखवत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडून आकाश मोरे हे बारामतीची निवडणूक लढवणार आहे. यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) प्रश्न केला. यावर तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

  • 06 Apr 2026 01:07 PM (IST)

    06 Apr 2026 01:07 PM (IST)

    सह्याद्रीचा नवा राजा: ‘राणोजी’! राधानगरीच्या जंगलात नव्या नर वाघाची एन्ट्री

    पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेचा महत्त्वाचा पट्टा ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसरात वाघांच्या उपस्थितीबाबत उत्साहवर्धक घडामोड समोर आली आहे. आधीच नोंद झालेल्या STR-07 आणि STR-08 या प्रौढ नर वाघांनंतर आता STR-10 या नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला ‘राणोजी’ असे नाव देण्यात आले आहे.

  • 06 Apr 2026 01:05 PM (IST)

    06 Apr 2026 01:05 PM (IST)

    भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पुन्हा वादात

    पिंपरी- चिंचवड शहराला मुबलक पाणी मिळवून देणाऱ्या भामा-आसखेड योजनेला दोन वर्षांचा विलंब झाला आहे. ज्या ठेकेदाराने कामात दिरंगाई केली, त्यालाच पुन्हा काम देण्याच्या हालचालींमुळे प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. १६७ एमएलडी क्षमतेच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असूनही, केवळ ३-४ ठिकाणच्या ठप्प कामामुळे योजना रखडली आहे. नवीन निविदा प्रक्रियेत वेळ जाईल, असे समर्थन प्रशासनाकडून दिले जात असले, तरी दोन वर्षे वेळ घालवणाऱ्या ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम पुन्हा सुरू करण्याचा दावा केला जात असला तरी, दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पुन्हा संधी मिळत असल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी आहे.

  • 06 Apr 2026 12:50 PM (IST)

    06 Apr 2026 12:50 PM (IST)

    साखर उत्पादनात महाराष्ट्राची उत्तुंग झेप

    देशाच्या साखर उद्योगात महाराष्ट्राने यंदा आपली मोहोर उमटवली असून, उत्तर प्रदेशला पिछाडीवर टाकत उत्पादनात पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. ३१ मार्च अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने उत्पादनात मोठी झेप घेतली असली तरी, कारखान्यांचे अर्थकारण आणि आगामी मान्सूनच्या चिंतेमुळे साखर उद्योगासमोर आव्हाने कायम असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, यंदा देशातील एकूण साखर उत्पादनात मोठी सुधारणा झाली आहे. ३१ मार्चपर्यंत देशात २७१.२० लाख टन साखरेची निर्मिती झाली असून, गेल्या वर्षी याच काळात हे उत्पादन २४८.६५ लाख टन इतके होते. म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर उत्पादनात सुमारे २३% वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्तर प्रदेशला मागे टाकून साखर उत्पादनामध्ये अव्वल ठरले आहे.

  • 06 Apr 2026 12:40 PM (IST)

    06 Apr 2026 12:40 PM (IST)

    वसई-विरार पट्ट्यात ‘मृतदेहांची मालिका’ सुरूच; 15 दिवसांत सहावी घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    वसई-विरार परिसरात 15 दिवसांत सहा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. विरार फाट्यावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळला. काही प्रकरणांत आरोपी अटकेत, तर काहींचा तपास सुरू आहे.

  • 06 Apr 2026 12:40 PM (IST)

    06 Apr 2026 12:40 PM (IST)

    युद्ध थांबणार! अमेरिका-इराणमध्ये ४५ दिवसांच्या संघर्षविरामावर चर्चा? पुढील ४८ तांस ठरणार निर्णायक

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. यानंतर इराणने शांतता करार किंवा होर्मुझ खुला न केल्यास इराणवर लष्करी कारवाईचे संकेत दिले आहे. याच पार्श्वभूमीवर निर्णायक हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळाले आहे. अमेरिका इराणध्ये ४५ दिवसांचा संभाव्य युद्ध विरामासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. ही चर्चा अशी वेळी सुरु झाली आहे, जेव्हा दोन्ही देश एकमेकांना सातत्याने विनाशाच्या धमक्या देत आहेत.

  • 06 Apr 2026 12:30 PM (IST)

    06 Apr 2026 12:30 PM (IST)

    पवना धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

    कडक उन्हाळा आणि वाढत्या मागणीमुळे पिंपरी- चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. शनिवारी (दि. ४) सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, धरणात आता केवळ ४६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जून अखेरपर्यंत म्हणजेच पावसाळ्याच्या आगमनापर्यंत शहराला पुरेल इतकाच असल्याने, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

  • 06 Apr 2026 12:20 PM (IST)

    06 Apr 2026 12:20 PM (IST)

    पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या

    ‘शेजारच्या मुलासोबत का बोलतेस’ या शुल्लक कारणावरून सातत्याने मित्राकडून होणारा त्रास तसेच त्याच्या धमक्यांना कंटाळून १७ वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीने १७ व्या मजल्यावरून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. साक्षी शिवाजी आवटे (वय १७, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी गोरख सुग्रिव गोरे (वय २१, रा. बालेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत साक्षीच्या भावाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे.

  • 06 Apr 2026 12:10 PM (IST)

    06 Apr 2026 12:10 PM (IST)

    कर्जबाजारी आंबा बागायतदारांसाठी राजू शेट्टी सरसावले

    कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांसमोर असलेल्या व्यापाऱ्यांनी व्याजाने दिलेले ॲडव्हान्सेस, बाजार समितीमधील सौदे, वाहतूक व्यवस्था व सुविधा यासह विविध समस्या आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. यावेळी व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवित व्याजाची रक्कम न मागता ॲडव्हान्स रक्कम वसूलीस सहकार्य करण्याचे ठरविले. याबरोबरच कोकणातून येणारा आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पध्दतीने जिल्हानिहाय वर्गवारी करण्याचे ठरले. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय किती आंबा बाजार समितीत दाखल झाला याची माहिती दैनंदिन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी अथवा देवगड हापूस म्हणून बोगस आंब्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बागायतदार व व्यापाऱ्यांनीही केली.

  • 06 Apr 2026 12:00 PM (IST)

    06 Apr 2026 12:00 PM (IST)

    भारताची यशस्वी कूटनीती! US-Iran युद्धात होर्मुझमधून 9वां LPG टँकर सुखरुप बाहेर; देशाचा उर्जा पुरवठा सुरक्षित?

    मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण युद्ध दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मार्गावर कृडक नाकेबंदी केली आहे. ट्रम्प यांनी होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी इराणला ४८ तास दिले आहेत. परंतु इराणने कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या युद्धजन्य परिस्थितीदरम्यान भारतासाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. भारतीय ध्वज असलेले आणखी एक जहाज सुरक्षितपणे होर्मुझमधून बाहेर पडले आहे.

  • 06 Apr 2026 11:50 AM (IST)

    06 Apr 2026 11:50 AM (IST)

    ‘रात्री 8 वाजता…!’ ट्रम्प यांनी निश्चित केली वेळ; इराणवर युद्धाची सावली; हल्ल्याची ‘ही’ तारीख ठरली

    मध्य पूर्वेतील युद्ध अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी उघडून तडजोड करण्याची धमकी दिली आहे आणि तसे न केल्यास मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.

  • 06 Apr 2026 11:40 AM (IST)

    06 Apr 2026 11:40 AM (IST)

    सिलेंडर होणार बंद? एका महिन्यात 8,00,000 घरांपर्यंत पोहचला पाईप गॅस

    पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पुरवठ्याच्या विस्ताराचा वेग आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे. एकाच महिन्यात 8 लाख PNG जोडण्यात आले असून घरगुती मागणीपैकी 100% मागणी पाईपलाईनद्वारे पूर्ण केली जात आहे.

  • 06 Apr 2026 11:40 AM (IST)

    06 Apr 2026 11:40 AM (IST)

    ‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते…’ चिठ्ठी लिहून विवाहितेची आत्महत्या; पतीवर मानसिक त्रासाचे आरोप

    नागपूरच्या महादुला येथे मयुरी मेंढे या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. चिठ्ठीत पतीवर प्रेम व्यक्त करत वेदना मांडल्या. पतीकडून मानसिक त्रास झाल्याचा आरोप असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • 06 Apr 2026 11:30 AM (IST)

    06 Apr 2026 11:30 AM (IST)

    महात्मा गांधींनी केला भारतीयांना स्वाभिमान जागवणारा मिठाचा सत्याग्रह; जाणून घ्या 06 एप्रिल

    मिठाचा सत्याग्रह हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावल्यामुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत होता. याविरोधात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून दांडीपर्यंत पदयात्रा सुरू केली. सुमारे २४० मैलांचा हा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला. ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले. या कृतीने संपूर्ण देशात आंदोलनाची ठिणगी पडली.

  • 06 Apr 2026 11:04 AM (IST)

    06 Apr 2026 11:04 AM (IST)

    शरद पवारांनी राज्यसभेत घेतली शपथ

    शरद पवार यांनी राज्यसभेत आज पुन्हा एकदा खासदारकीची शपथ घेतली.  शरद पवार यांना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.  महाराष्ट्रातून आज सात नवनिर्वाचित  खासदार राज्यसभेची शपथ घेतील. यात भाजप प्रणित महाविकासआघाडीचे विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईनवाते, आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. तर  शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे या शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पार्थ पवार हेदेखील आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार आहेत.

     

     

  • 06 Apr 2026 11:00 AM (IST)

    06 Apr 2026 11:00 AM (IST)

    सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

    बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांसाठी खास भावनिक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी बारामतीकरांना आवाहन केले आहे. रोहित पवारांनी लिहिलं आहे की, आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो! असे रोहित पवारांनी लिहिले आहे.

    बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य… pic.twitter.com/wUXsMsQusF

    — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2026

     

  • 06 Apr 2026 10:57 AM (IST)

    06 Apr 2026 10:57 AM (IST)

    बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी पवार कुटुंबाचे देवदर्शन

    बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी देवदर्शन केले. त्यांनी गणरायाच्या आशीर्वादाने नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.

    #WATCH | Baramati | Maharashtra Deputy CM & NCP leader Sunetra Pawar, along with her two sons, offers prayers at Hanuman Temple, ahead of filing nomination for by-election to Baramati Assembly seat

    (Source: NCP) pic.twitter.com/0h2i1Kmr6A

    — ANI (@ANI) April 6, 2026

Marathi Breaking news live updates : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे बारामतीमध्ये भावूक वातावरण तयार झाले आहे. अजित पवारांनंतर बारामतीचा पुढचा दादा कोण होणार यावरुन राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यापूर्वी त्यांनी देवदर्शन घेतले आहे. जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी गणरायाचे दर्शन घेऊन नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.

Web Title: Marathi breaking live marathi headlines update date 06 april baramati by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Baramati by-election
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Sunetra Pawar PC:  दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन
1

Sunetra Pawar PC: दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन

Maharashtra Politics : “तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? बारामतीचा विषय संजय राऊतांनी एकाच वाक्यात संपवला
2

Maharashtra Politics : “तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? बारामतीचा विषय संजय राऊतांनी एकाच वाक्यात संपवला

Baramati by election : सुनेत्रा पवारांसमोर आकाश मोरेंचे तगडे आव्हान? काँग्रेसने का दिली मोरेंना संधी?
3

Baramati by election : सुनेत्रा पवारांसमोर आकाश मोरेंचे तगडे आव्हान? काँग्रेसने का दिली मोरेंना संधी?

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद
4

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.