Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी मतदानाला सुरुवात

Marathi Breaking Live Updates : राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, क्रीडा विश्व, देश-विदेशसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 20, 2025 | 12:45 PM
LIVE
Top Marathi News Today Live : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी मतदानाला सुरुवात

Top Marathi News Today Live : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी मतदानाला सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:
  • 20 Dec 2025 01:00 PM (IST)

    20 Dec 2025 01:00 PM (IST)

    येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, फरशीने डोके-कंबर फोडली

    पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत विशाल कांबळेचा मृत्यू झाला. बराक क्रमांक 1 मध्ये फरशीने डोके व कंबरेवर वार करण्यात आले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून तुरुंग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

  • 20 Dec 2025 12:55 PM (IST)

    20 Dec 2025 12:55 PM (IST)

    १८ वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या

    गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे १८ वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी नीळ हिचा अज्ञाताने घरात गळा चिरून खून केला. आई-वडील बाहेर असताना ती घरात एकटी होती. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 20 Dec 2025 12:50 PM (IST)

    20 Dec 2025 12:50 PM (IST)

    सांगलीत खुनांची मालिका; एकाच दिवशी दोन हत्या

    सांगली जिल्ह्यात खुनांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी एकाच दिवशी कुपवाड आणि जतमध्ये दोन तरुणांची निर्घृण हत्या झाली. पूर्ववैमनस्य आणि जमिनीच्या वादातून हे खून झाले असून जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 20 Dec 2025 12:45 PM (IST)

    20 Dec 2025 12:45 PM (IST)

    JALGAON : वरणगाव मध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत सुरू

    भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहेत सकाळी सात वाजल्यापासून मतदार राजा हा निवडणूक केंद्रावरती मतदान करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

  • 20 Dec 2025 12:40 PM (IST)

    20 Dec 2025 12:40 PM (IST)

    इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन

    सोलापूरमधील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये 20 वर्षीय ई अँड टीसी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांचा फोन न आल्याने प्रकार उघडकीस आला; कारण अस्पष्ट.

  • 20 Dec 2025 12:30 PM (IST)

    20 Dec 2025 12:30 PM (IST)

    गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

    कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये दोन गटांनी केला मतदान केंद्रावर गोंधळ

  • 20 Dec 2025 12:20 PM (IST)

    20 Dec 2025 12:20 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात evm अर्ध्या तासांपासून बंद, प्रभाग १० मध्ये मतदान ठप्प

    वाशिम नगर परिषद निवडुणुकी करिता आज सकाळपासून सुरुवात झाली असून ,शहरात 81 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असून प्रभाग 10 मधील मतदान केंद्रावर मतदान मशीन गेल्या 30 मिनिटे पासून बंद पडली असल्याने मतदान ठप्प झाले आहे. त्यामुळे मतदारांची तारांबळ उडाली आहे.

  • 20 Dec 2025 12:19 PM (IST)

    20 Dec 2025 12:19 PM (IST)

    शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा आज भाजप मध्ये प्रवेश, ठाकरे गटाला मोठा धक्का

    शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्ह्यात सभेला आले असताना ऐके ठिकाणी मुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले असताना सुभाष भोईर सुद्धा उपस्थिती होते आणि याचा व्हिडिओ व्हायरलं झाला होता, यानंतर सुभाष भोईर हें भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा होती.

  • 20 Dec 2025 12:19 PM (IST)

    20 Dec 2025 12:19 PM (IST)

    बारामती नगरपालिकेसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात

    बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बारामती नगरपालिकेसाठी 41 जागांसाठी मतदान होत. असून त्यातील आठ जागा ह्या बिनविरोध झाल्याने 34 जागांसाठी आज मतदान होत आहे.

  • 20 Dec 2025 12:19 PM (IST)

    20 Dec 2025 12:19 PM (IST)

    बीड नगर पालिकेतील प्रभाग क्रमांक ३ साठी मतदानाला सुरुवात...

    बीड नगरपालिकेतील 26 प्रभागापैकी ३ नंबरच्या प्रभागाचे मतदान राहिले होते. त्या प्रभागातील मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. यासाठी एकूण सात बूथ असून 6 हजार 998 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान मतदान करण्यासाठी सकाळपासूनच बीडमधील मतदारांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

  • 20 Dec 2025 12:00 PM (IST)

    20 Dec 2025 12:00 PM (IST)

    IndianArmy: बांगलादेशातील अशांततेनंतर भारतीय लष्कर सतर्क

    शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) हिंसक निदर्शने आणि शेख हसीना (Sheikh Hasina) सरकारचे पतन झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर अराजकता माजली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतविरोधी शक्ती किंवा दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती गांभीर्याने घेत भारतीय लष्कराने बांगलादेशला लागून असलेल्या ईशान्येकडील सीमांवर आपली पकड मजबूत केली आहे. आता सीमेवर केवळ जवानच नाही, तर जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी S-400 क्षेपणास्त्र प्रणाली आणि आधुनिक ड्रोन डोळ्यात तेल घालून नजर ठेवत आहेत.

  • 20 Dec 2025 11:50 AM (IST)

    20 Dec 2025 11:50 AM (IST)

    IND vs SL Women : चॅम्पियन महिला संघ जेतेपदानंतर पहिल्यांदाच उतरणार मैदानात

    2025 मध्ये झालेल्या महिला एक दिवसीय विश्वचषकाचे जेतेपद भारतीय महिला संघाने नावावर केले. भारताचे संघाने कमालीची कामगिरी करत शेवटचे सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे संघाला पराभूत करून ट्रॉफी जिंकली आणि इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने पहिल्यांदा भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासामध्ये विश्वचषक जिंकून विक्रम नावावर केला आहे. एकदिवसीय विश्वचषक झाल्यानंतर आता भारतीय संघ लक्ष हे t20 विश्वचषक २०२६ वर असणार आहेत.

  • 20 Dec 2025 11:40 AM (IST)

    20 Dec 2025 11:40 AM (IST)

    Income Tax Collections: कंपन्यांनी भरली सरकारची तिजोरी

    २०२५  या आर्थिक वर्षात देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ८% वाढून १७.०५ लाख कोटींवर पोहोचले आहे. कॉर्पोरेट करात सतत वाढ आणि कमी परताव्यांमुळे ही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शेअर बाजारातील वाढत्या हालचालींचा थेट कर संकलनावरही स्पष्ट परिणाम होत आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर दरम्यान सरकारला सिक्युरिटीज ट्रान्ड्रॉक्शन टॅक्स (STT) मधून ४०,१९५ कोटी रुपयांचा निव्वळ महसूल मिळाला, जो बाजारात मजबूत व्यापार आणि गुंतवणूकदारांच्या आर्थिक उलाढालींना प्रतिबिंचित करतो.

  • 20 Dec 2025 11:30 AM (IST)

    20 Dec 2025 11:30 AM (IST)

    Sangli Crime: तलवार, कुकरी, दगड… सांगलीत खुनांची मालिका

    सांगली जिल्ह्यात हत्येचं सत्र सुरु असल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वृत्त समोर येत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. आता सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जमिनीचा वाद आणि पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 20 Dec 2025 11:20 AM (IST)

    20 Dec 2025 11:20 AM (IST)

    Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल

    तुम्ही देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंंस्टाग्रामचा वापर करता का? तुम्हाला देखील इंस्टाग्रामवर नवीन रिल्स आणि पोस्ट्स शेअर करायला आवडतं का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा सर्व यूजर्सवर परिणाम होणार आहे, यात काही शंकाच नाही. कंपनीने प्लॅटफॉर्मवर कंटेंट डिस्कवरीसाठी एका लिमिटची घोषणा केली आहे. कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार आता रिल्स आणि पोस्ट्चे व्ह्युव्स आणि रिच वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅगच्या संख्येवर आता मर्यादा घालण्यात आली आहे.

  • 20 Dec 2025 11:10 AM (IST)

    20 Dec 2025 11:10 AM (IST)

    IND vs SA 5th T20I! हार्दिक पंड्याची एक्सप्रेस सुसाट! T20 मध्ये केला भीम पराक्रम

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवट भारताच्या विजयाने झाला. पाचव्या टी२० सामन्यात भारताने  प्रथम फलंदाजी करत २३१ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात दक्षिण आफ्रिका संघ २०१ धावाच करू शकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव करून भारताने या मालिकेवर ३-१ असा कब्जा केला.  या सामन्यात, भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इतिहास घडवला आहे. हार्दिक पंड्याने पाचव्या सामन्यात अर्धशतक झळकावत टी-२० मध्ये २००० धावा पूर्ण केल्या. यासह, तो टी-२० मध्ये २००० धावा आणि १०० विकेट घेणारा पहिलाच भारतीय खेळाडू  बनला. हा पराक्रम करणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरला.

  • 20 Dec 2025 11:08 AM (IST)

    20 Dec 2025 11:08 AM (IST)

    अंबरनाथमध्ये तब्बल 208 संशयित बोगस मतदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    अंबरनाथमध्ये पोलिसांनी सुमारे २०८ बोगस मतदारांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. भाजप व काँग्रेसकडून काल रात्री २०० बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • 20 Dec 2025 10:59 AM (IST)

    20 Dec 2025 10:59 AM (IST)

    चॅम्पियन महिला संघ जेतेपदानंतर पहिल्यांदाच उतरणार मैदानात!

    पुरुष t20 विश्वचषक झाल्यानंतर भारतीय महिला संघ देखील टी-ट्वेंटी विश्वचषकांसाठी खेळताना दिसणार आहे. आता भारतीय संघाची तयारी सुरू होणार आहे. विश्वचषकानंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदाच मालिका खेळताना दिसणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची t20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना विशाखापटनम् येथे खेळला जाणार आहे. 21 डिसेंबर रोजी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 20 Dec 2025 10:54 AM (IST)

    20 Dec 2025 10:54 AM (IST)

    कंपन्यांनी भरली सरकारची तिजोरी

    २०२५  या आर्थिक वर्षात देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ८% वाढून १७.०५ लाख कोटींवर पोहोचले आहे. कॉर्पोरेट करात सतत वाढ आणि कमी परताव्यांमुळे ही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शेअर बाजारातील वाढत्या हालचालींचा थेट कर संकलनावरही स्पष्ट परिणाम होत आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर दरम्यान सरकारला सिक्युरिटीज ट्रान्ड्रॉक्शन टॅक्स (STT) मधून ४०,१९५ कोटी रुपयांचा निव्वळ महसूल मिळाला, जो बाजारात मजबूत व्यापार आणि गुंतवणूकदारांच्या आर्थिक उलाढालींना प्रतिबिंचित करतो.

  • 20 Dec 2025 10:49 AM (IST)

    20 Dec 2025 10:49 AM (IST)

    या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स

    जगातील लोकप्रिय मोबाईल गेम्सपैकी एक फ्री फायर मॅक्स आहे. फ्री फायर मॅक्स जबरदस्त शूटिंग, अ‍ॅक्शन आणि वेगवान गेमप्लेसाठी ओळखला जातो. गेममध्ये शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी योग्य शस्त्राची निवड करणं अत्यंत गरजेचं असते. शस्त्र निवडताना तुमच्या कॅरेक्टर आणि स्टाईलला योग्य वाटले अशी निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही संपूर्ण गेम बदलू शकता, आणि शत्रूंवर विजय मिळवू शकता. चला तर मग फ्री फायर मॅक्समध्ये उपलब्ध असलेल्या काही टॉप गन्सबद्दल जाणून घेऊया. या गन्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूंवर काही क्षणातच विजय मिळवू शकता.

  • 20 Dec 2025 10:41 AM (IST)

    20 Dec 2025 10:41 AM (IST)

    Putin प्रेमात पडले! ‘Girlfriend कोण?’

    जगातील सर्वात शक्तिशाली आणि कठोर नेत्यांपैकी एक म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची ओळख आहे. युद्ध, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भेदक नजरेसाठी ओळखले जाणारे पुतिन सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. पुतिन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आपल्या आयुष्यातील प्रेमाबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे पुतिन यांची एक ‘मृदू’ बाजू जगासमोर आली असून, त्यांची ‘ती’ रहस्यमयी गर्लफ्रेंड कोण? याची शोधमोहीम इंटरनेटवर सुरू झाली आहे.

  • 20 Dec 2025 10:32 AM (IST)

    20 Dec 2025 10:32 AM (IST)

    १८ वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या; तपास सुरु

    छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणीची घरात गळा चिरून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या तरुणीचे नाव वैष्णवी संतोष नीळ असे आहे. घरात कोणीच नसताना ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही धक्कदायक घटना (शुक्रवारी, ता १९) दुपारी गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे घडली. वैष्णवी ही वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. या घटनेने गंगापूर हादरून गेला आहे.

  • 20 Dec 2025 10:25 AM (IST)

    20 Dec 2025 10:25 AM (IST)

    हार्दिक पंड्याची एक्सप्रेस सुसाट!

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवट भारताच्या विजयाने झाला. पाचव्या टी२० सामन्यात भारताने  प्रथम फलंदाजी करत २३१ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात दक्षिण आफ्रिका संघ २०१ धावाच करू शकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव करून भारताने या मालिकेवर ३-१ असा कब्जा केला.  या सामन्यात, भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इतिहास घडवला आहे. हार्दिक पंड्याने पाचव्या सामन्यात अर्धशतक झळकावत टी-२० मध्ये २००० धावा पूर्ण केल्या. यासह, तो टी-२० मध्ये २००० धावा आणि १०० विकेट घेणारा पहिलाच भारतीय खेळाडू  बनला. हा पराक्रम करणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरला.

  • 20 Dec 2025 10:18 AM (IST)

    20 Dec 2025 10:18 AM (IST)

    इंस्टाग्राम यूजर्सना धक्का!

    तुम्ही देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंंस्टाग्रामचा वापर करता का? तुम्हाला देखील इंस्टाग्रामवर नवीन रिल्स आणि पोस्ट्स शेअर करायला आवडतं का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा सर्व यूजर्सवर परिणाम होणार आहे, यात काही शंकाच नाही. कंपनीने प्लॅटफॉर्मवर कंटेंट डिस्कवरीसाठी एका लिमिटची घोषणा केली आहे. कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार आता रिल्स आणि पोस्ट्चे व्ह्युव्स आणि रिच वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅगच्या संख्येवर आता मर्यादा घालण्यात आली आहे.

  • 20 Dec 2025 10:10 AM (IST)

    20 Dec 2025 10:10 AM (IST)

    सात्विक-चिरागची जोडी सेमीफायनलमध्ये!

    सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपला विजयी प्रवास सुरू ठेवला आणि बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या बाद फेरीत स्थान निश्चित केले. भारतीय जोडीने शुक्रवारी हांगझोऊ येथे झालेल्या त्यांच्या शेवटच्या ग्रुप बी सामन्यात त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मलेशियाचे आरोन चिया आणि सोह वूई यिक यांचा पराभव केला. तिसऱ्या मानांकित सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम गमावल्यानंतर संयम आणि धोरणात्मक कौशल्य दाखवत पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या जोडीला ७० मिनिटांच्या रोमांचक सामन्यात १७-२१, २१-१८, २१-१५ असे पराभूत केले. अशा प्रकारे, ते हंगामातील शेवटच्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय पुरुष जोडी ठरली.

  • 20 Dec 2025 09:59 AM (IST)

    20 Dec 2025 09:59 AM (IST)

    तिलक वर्माचा ‘हिटमॅन’ शर्माला धोबीपछाड!

    Tilak Varma broke Rohit Sharma’s record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. भारताने दिलेल्या २३१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ २०१ धावाच करू शकला आणि भारताने ३० धावांनी सामना जिंकून मालिका ३-१ अशी खिशात घातली. या सामन्यात भारतीय मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने ७३ धावांची खेळी केली. या खेळीसह तिलकने  रोहित शर्माचा ४२९ धावांचा विक्रम मोडला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.

  • 20 Dec 2025 09:55 AM (IST)

    20 Dec 2025 09:55 AM (IST)

    2025 मध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठे चढउतार

    Gold Rate Today: भारतात 20 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,417 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,299 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,063 रुपये आहे. भारतात 20 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,34,170 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,630 रुपये आहे. भारतात 20 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 208.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,08,900 रुपये आहे.

  • 20 Dec 2025 09:50 AM (IST)

    20 Dec 2025 09:50 AM (IST)

    आता आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होणार; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर लवकरच आणखी एक मंत्री पायउतार होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

  • 20 Dec 2025 09:45 AM (IST)

    20 Dec 2025 09:45 AM (IST)

    हार्दिक पांड्याचा रोमॅंटिक अंदाज!

    Hardik Pandya and his girlfriend Mahika Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिका संपली आहे. या मालिकेतील  शेवटचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ३० धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला. यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अधिक आक्रमक  दिसून आला. त्याने १६ चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने अर्धशतक झळकवताच त्याने त्याची प्रियसी महिका शर्माला फ्लाईंग कीस दिला.

  • 20 Dec 2025 09:45 AM (IST)

    20 Dec 2025 09:45 AM (IST)

    कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होणार; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

    माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर लवकरच आणखी एक मंत्री पायउतार होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

  • 20 Dec 2025 09:40 AM (IST)

    20 Dec 2025 09:40 AM (IST)

    हिटमॅन खेळणार या तारखेला Vijay Hazare Trophy 2025–26 चा सामना!

    काल भारतीय संघाची टी20 मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडली यामध्ये भारताच्या संघाने 3-1 अशी जिंकली. भारताचे दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी20 क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली होती. त्यानंतर या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून देखील अलविदा केला आहे. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे फक्त एकदिवसीय मालिका खेळताना दिसत आहेत. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे आगामी विजय हजारे ट्राॅफीचे सामने खेळताना दिसणार आहेत.

  • 20 Dec 2025 09:37 AM (IST)

    20 Dec 2025 09:37 AM (IST)

    राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान

    मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक नगरपरिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मात्र, न्यायालयीन प्रकरणांमुळे काही ठिकाणी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. या स्थगित झालेल्या १६ जिल्ह्यांतील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान होणार आहे. तसेच याआधी झालेल्या नगर परिषद, नगर पंचायतींसह शनिवारी होणाऱ्या मतदानानंतर रविवारी (दि. २१) एकत्रितपणे मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर केले जाणार आहेत.

  • 20 Dec 2025 09:35 AM (IST)

    20 Dec 2025 09:35 AM (IST)

    18 वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या

    छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणीची घरात गळा चिरून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या तरुणीचे नाव वैष्णवी संतोष नीळ असे आहे. घरात कोणीच नसताना ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही धक्कदायक घटना (शुक्रवारी, ता १९) दुपारी गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे घडली. वैष्णवी ही वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. या घटनेने गंगापूर हादरून गेला आहे.

  • 20 Dec 2025 09:30 AM (IST)

    20 Dec 2025 09:30 AM (IST)

    आज होणार T20 World cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा

    Team India Squad T20 World cup 2026 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेचा शेवटचा सामना काल पार पडला. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने एक सामना रद्द झाल्यानंतर 3-1 अशी मालिका नावावर केली आहे. 2024 मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताच्या संघाने एकही मालिका गमावलेला नाही. आता 50 दिवसांमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या संघाची घोषणा काही तासांमध्ये होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी केली जाईल.

  • 20 Dec 2025 09:25 AM (IST)

    20 Dec 2025 09:25 AM (IST)

    जामखेडमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार; मालक गंभीर जखमी तर हल्लेखोर फरार

    जामखेड–बीड रोडवरील हॉटेल कावेरी येथे हॉटेलची तोडफोड करत केलेल्या गोळीबारात हॉटेल मालक रोहित अनिल पवार (वय 27, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) हा गंभीर जखमी झाला. गोळी पायाला लागल्यामुळे सुदैवाने रोहितचे प्राण वाचले. या हल्ल्यात हल्लेखोरांनी हॉटेलसमोर उभी असलेली पवार यांच्या मालकीची चारचाकी गाडीही फोडून मोठे नुकसान केले आहे.

  • 20 Dec 2025 09:15 AM (IST)

    20 Dec 2025 09:15 AM (IST)

    येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, फरशीने डोके फोडले

    महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग हा पुण्यातील येरवडा मध्यवर्ती तुरुंग आहे. हा तुरुंग महासुरक्षित तुरुंग आहे असल्याचे म्हंटले जाते. परंतु आता याच कारागृहातून हाणामारी झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या आरपीचा नाव विशाल कांबळे असे आहे.

Marathi Breaking News Updates : मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक नगरपरिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मात्र, न्यायालयीन प्रकरणांमुळे काही ठिकाणी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. या स्थगित झालेल्या १६ जिल्ह्यांतील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान होणार आहे. तसेच याआधी झालेल्या नगर परिषद, नगर पंचायतींसह शनिवारी होणाऱ्या मतदानानंतर रविवारी (दि. २१) एकत्रितपणे मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर केले जाणार आहेत.

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकायांच्या निणयाविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद होती. अपील दाखल करण्यात आलेल्या ठिकाणी निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत येणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारास त्याचे अर्ज मागे घेण्यास तीन दिवसांचा कालावधी मिळाला असता.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news marathi news international news national news crime news marathi live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • live updates
  • Marathi Breaking
  • Navarashtra Live Updates

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.