Maharashtra Breaking News
08 Sep 2025 01:40 PM (IST)
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले होते. पण अवघ्या पाच दिवसांत राज्य सरकारने त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींनुसार मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा जीआर काढण्यात आला. पण या जीआरवरून ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसी नेत्यांनी या जीआरला विरोध दर्शवत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केलं आहे.
08 Sep 2025 01:35 PM (IST)
राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण केले. ओबीसी आरक्षणाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नव्या तारखेचा अल्टिमेटम दिला आहे.
08 Sep 2025 01:25 PM (IST)
पुढील वर्षी सुरू होणारी जनगणना ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार आहे. यासाठी तब्बल ३४ लाख जनगणना कर्मचारी पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून माहिती संकलनाचे काम करतील.मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी नियुक्त केलेले पर्यवेक्षक आणि कर्मचारी हे जनगणनेचे सर्व काम अँड्रॉइड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनवरून करतील. विशेष अॅपच्या मदतीने संकलित माहिती थेट केंद्रीय सर्व्हरवर हस्तांतरित केली जाणार आहे. ही प्रक्रिया पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे, जनगणना अधिक वेगवान, अचूक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
08 Sep 2025 01:15 PM (IST)
५० च्या दशकात सुरू झालेली आशा भोसले यांची गायन कारकीर्द अजूनही सुरू आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी जन्मलेल्या आशा भोसले आज संगीताच्या जगात असे नाव बनले आहेत की ज्याला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. त्यांच्या मोठ्या बहिणी लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी संगीताच्या जगात प्रवेश केला, परंतु नंतर त्यांच्या मोठ्या बहिणीशी असलेले त्यांचे संबंध बिघडले. एकीकडे आशा भोसले यांनी बॉलीवूडमध्ये उत्तम गाणी गायली, स्वतःचे नाव कमावले, तर दुसरीकडे त्यांचे वैयक्तिक जीवन चढ-उतारांनी भरलेले होते. आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
08 Sep 2025 01:05 PM (IST)
हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करा. १७ सप्टेंबरच्या आत ही प्रोसेस सुरु झाली पाहीजे. अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. अमंलबजावणी न झाल्यास दसऱ्या मेळाव्यात आम्हाला भूमिका जाहीर करावी लागेल असं जरांगे पाटील म्हणाले.
08 Sep 2025 12:55 PM (IST)
नाशिकमध्ये गंगापूर धरणातून ३ हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
08 Sep 2025 12:45 PM (IST)
सरकारकडून मराठा व ओबीसी दोन्ही समाजाला खेळवण्याचा प्रकार सुरु आहे.कारण पात्र शब्द काढल्यानंतर तो जीआर सरसकट झाला आहे. सरकार ओबीसींच्या मुळावर उठलं आहे असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
08 Sep 2025 12:35 PM (IST)
विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडेल.
08 Sep 2025 12:25 PM (IST)
ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय फडणवीसांनी घेतलेला नाही. तायवाडे काय बोलतात ते विजय वडेट्टीवारांनी समजून घ्यावं असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
08 Sep 2025 12:15 PM (IST)
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू.
08 Sep 2025 12:15 PM (IST)
पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला पत्रकारासोबत विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याविरोधात आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस आणि ढोल पथकातील कार्यकर्त्यांकडून पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा आणि गैरवर्तणुकीचा तीव्र निषेध. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हा हल्ला कदापि समर्थनीय नाही. पत्रकारांच्या बाबतीत पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी घडलेल्या तिन्ही घटनांची दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे. मा. मुख्यमंत्री महोदय या सर्व घटनांकडं गांभीर्याने लक्ष देऊन कारवाईचे आदेश देतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
08 Sep 2025 12:10 PM (IST)
कर्जतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कर्जमधील बँक ऑफ इंडिया या बॅंकेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ए बॅंकेचे मोठं नुकसान झाला आहे पण लॉकर सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
08 Sep 2025 12:00 PM (IST)
खग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्तामे भारतात लाल चंद्र दिसून आला. हे चंद्रग्रहण 1997 नंतर सप्टेंबर महिन्यातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होते. या चंद्रग्रहणाची खास छायाचित्रे समोर आली आहे.
दुर्मिळ खग्रास चंद्रग्रहण! भारतात दिसला लाल चंद्र. हे चंद्रग्रहण 1997 नंतर सप्टेंबर महिन्यातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होते. पाहा या चंद्रग्रहणाची छायाचित्रे#BloodMoon #LunarEclipse #Chandragrahan pic.twitter.com/ri7emUTnrr
— Navarashtra (@navarashtra) September 8, 2025
08 Sep 2025 11:50 AM (IST)
येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. यावरुन टोला लगावताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक अत्यंत रंजक आहे. एरवी भाजप मुहूर्त काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतो, हिंदुत्वादी पक्ष म्हणून. यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. भाजप सेक्युलर झाला. मुहूर्त, पंचाग पाहत नाही हे त्यांनी दाखवून दिलं, या बद्दल त्यांचं अभिनंदन. नाहीतर मुहूर्त पाहणार, पंचाग पाहणार, तिथी पाहणार म्हणून भाजपने दहा वर्षात पहिल्यांदाच स्वत:ला सेक्युलर घोषित केल्यासारखं वाटतय, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
08 Sep 2025 11:40 AM (IST)
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आज किंवा उद्या मराठा आरक्षण संदर्भातील निर्णयाला हायकोर्टात छगन भुजबळ हे आव्हान देणार आहेत. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर भुजबळ नाराज आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याला भुजबळांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. राज्य सरकारने विश्वासात न घेता निर्णय घेतल्याची भावना छगन भुजबळांची आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात छगन भुजबळ पुन्हा मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहेत.
08 Sep 2025 11:30 AM (IST)
यंदा भरतीच्या वेळेमुळे लालबागच्या राजाला विसर्जनासाठी मोठा विलंब झाला. हा राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला असला तरी देखील मिरवणूक सोहळ्यामधील चोऱ्या देखील चिंतेचा विषय ठरला आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान 100 पेक्षा अधिक मोबाईल फोन आणि अनेक सोन्याच्या साखळ्या चोरीला गेल्या. दरम्यान मोबाईल चोरी प्रकरणात 4 तर सोनसाखळी चोरी संदर्भात 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
08 Sep 2025 11:21 AM (IST)
यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) साठी विक्रमी ठरला आहे. या काळात प्रवाशांची संख्या आणि उत्पन्न या दोन्ही बाबतीत ऐतिहासिक वाढ झाली. गणेशोत्सवात एकूण ३७ लाख १६ हजार ५१२ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा महामेट्रोच्या उत्पन्नात तब्बल २ कोटी ६१ लाख रुपयांची वाढ झाली. यंदा एकूण ५.६७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षी याच काळात केवळ ३.०५ कोटी रुपये मिळाले होते.
विशेष म्हणजे, अनंत चतुर्दशीच्या दिवशी (६ सप्टेंबर) प्रवासीसंख्या आणि उत्पन्नाचा उच्चांक नोंदवला गेला. त्या दिवशीच तब्बल ५.९० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करताना नोंदवले गेले आणि ६८.९५ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न १४ लाखांनी अधिक होते.
08 Sep 2025 11:15 AM (IST)
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच उपसमितीला सांगतो की, 17 सप्टेंबरच्या आता गॅझेटनुसार मराठवाडामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र द्या. मंगळावर किंवा बुधवारी कॅबिनेट घ्या. सरकारने कुठलाही बदल करू नये. गावागावातील समिती कामाला लावा. 17 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्यावा नसता मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा अल्टिमेट जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे..
08 Sep 2025 11:11 AM (IST)
बॉलीवुडच्या संगीत विश्वातील एक बेधडक आवाज म्हणजे आशा भोसले. दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या असलेल्या आशा भोसले यांनी आपल्या जादूयी आवाजाने सर्वांना थिरकायला भाग पाडले. त्यांची कारकीर्द सुमारे १९४३ मध्ये सुरू झाली आणि सात दशकांहून अधिक काळ ती विस्तारली. त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. त्यांचा आज वाढदिवस साजरा केला जातो आहे.
08 Sep 2025 10:45 AM (IST)
महाराष्ट्रात गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान अनेक जिल्ह्यांमधून अपघात झाल्याचे वृत्त आहे. ठाणे, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव, वाशिम, पालघर आणि अमरावती येथे नऊ जण बुडाले, तर १२ जण अजूनही बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, ६ आणि ७ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकीदरम्यान या घटना घडल्या, ज्यामुळे संपूर्ण राज्यात वातावरण उदास झाले. गणपतीच्या विसर्जनाला एकप्रकारे गालबोटच लागले आहे. बातमी सविस्तर वाचा...
08 Sep 2025 10:40 AM (IST)
मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. “हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात तातडीने करा. सरकारने याबाबत विलंब केला, तर येणाऱ्या दसरा मेळाव्यात आम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल, “सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केले नाही, तर दसरा मेळाव्यात आम्ही आमची भूमिका जाहीर करावी लागेल.” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
08 Sep 2025 10:38 AM (IST)
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी फायदेशीर असणारे रिडीम कोड्स घेऊन आम्ही पुन्हा आलो आहोत. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि गेममध्ये जिंकण्यासाठी फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण प्लेअर्सना गेममधील वस्तू मिळवण्यासाठी डायमंडची गरज असते. हे डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करावे लागतात. पण जर प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करायचे नसतील तर त्यांच्या रिडीम कोड्स फायद्याचे ठरतात. रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स गेममधील वस्तू मोफत मिळवू शकतात.
08 Sep 2025 10:29 AM (IST)
पुण्यात तब्बल ३३ तासांहून अधिक काळ चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. घरगुती तसेच मोठ्या मंडळातील गणपतींचे विसर्जन पार पडले. मात्र, या भक्तिरसात एक धक्कादायक घटना घडली. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केला. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन ढोल-ताशा सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
08 Sep 2025 10:20 AM (IST)
छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमधील एका अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच प्रशिक्षणार्थी विध्यार्थी अमोल डक याच अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणामुळे अकॅडमीच्या संचालकाने आपल्या प्रशिक्षणार्थीचं अपहरण केलं आहे. या प्रकरणात आरोपी संचालकाला अटक करण्यात आली असून संचालकांसह आणखी तीन जणांचा समावेश आहे. न्यायालयाने चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
08 Sep 2025 10:10 AM (IST)
जगभरात मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या टार्गेट (Target) स्टोअरमध्ये एका भारतीय महिलेची चोरी करताना रंगेहात पकडण्यात आलेली घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या घटनेचा बॉडीकॅम व्हिडिओ समोर आल्यानंतर ती महिला आणि तिच्याभोवतीचे संपूर्ण प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. १५ जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेत घडलेली ही घटना काही महिन्यांनी यूट्यूबवर अपलोड झालेल्या व्हिडिओमुळे प्रकाशात आली. विशेष म्हणजे, चौकशीदरम्यान त्या महिलेनं स्वतःची ओळख गुजराती महिला म्हणून दिली आणि चोरीच्या वस्तू पुन्हा विकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
08 Sep 2025 10:05 AM (IST)
सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस १९ सध्या चर्चेत आहे. दररोज शोमध्ये खूप नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दोन आठवड्यात एकाही सदस्याला घरातून बाहेर काढण्यात आलेले नाही. त्याच वेळी, एका वाइल्ड कार्ड स्पर्धकानेही वीकेंड वॉरमध्ये प्रवेश केला आहे. आता बिग बॉस १९ च्या घरात १६ नाही तर १७ स्पर्धक कैद आहेत. यासोबतच या आठवड्यातील नामांकित सदस्यांची नावेही समोर आली आहेत. यावेळी घरातील ४ सदस्यांवर नामांकनाची तलवार लटकत आहे. नामांकित सदस्यांमध्ये कोणाची नावे समाविष्ट आहेत ते जाणून घेऊया?
08 Sep 2025 09:59 AM (IST)
India EU FTA 2025 : भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) हा गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. २०२५ च्या अखेरीस करार पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेऊन दोन्ही पक्ष १३ व्या फेरीच्या चर्चेसाठी या आठवड्यात नवी दिल्लीमध्ये एकत्र येणार आहेत. जागतिक अर्थकारण, अमेरिकेची बदलती टॅरिफ धोरणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्पर्धा लक्षात घेता, या चर्चेला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
08 Sep 2025 09:55 AM (IST)
गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात झालेल्या गँगवॉरच्या घटनेने शहरात खळबळ उडवली. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने ५ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे आयुष कोमकर याची हत्या केली. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच त्याचा भाचा होता.
08 Sep 2025 09:50 AM (IST)
लातूर: लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह कुजल्यामुळे दूरवर दुर्गंधी पसरल्याची घटना समोर आली होती. या अज्ञात महिलेच्या खुनाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा सुगावा लावला आहे.
08 Sep 2025 09:45 AM (IST)
International Literacy Day 2025 :आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (International Literacy Day) साजरा करण्याची कल्पना १९६५ मध्ये तेहरान (इराण) येथे झालेल्या निरक्षरता निर्मूलनावरील जागतिक शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेतून जन्माला आली. UNESCO ने नंतर १९६६ साली त्यास अधिकृत मान्यता दिली आणि ८ सप्टेंबर १९६७ पासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा होऊ लागला या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे जगभरातील नागरिकांना शिक्षित करून, न्याय्य, शांत आणि शाश्वत समाजाची निर्मिती होऊ शकावी अशी प्रेरणा देणे
08 Sep 2025 09:38 AM (IST)
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज ८ सप्टेंबर रोजी, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक दिशेने उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९११ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ६३ अंकांनी जास्त होता.
08 Sep 2025 09:33 AM (IST)
पुण्यात विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करताना एका महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी संबंधित पत्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात वार्तांकनासाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला. याच वेळी पथकातील एका सदस्याने ढोल-ताशा ट्रॉलीचे चाक पत्रकाराच्या पायावरून फिरवले. याचा जाब विचारण्यासाठी त्या गेल्या असता, त्याच सदस्याने त्यांना स्पर्श करून ढकलून दिल्याचा आरोप आहे. महिला पत्रकाराच्या सहकाऱ्याने याबाबत आक्षेप घेतल्यावर त्यालाही पथकातील सदस्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
08 Sep 2025 09:30 AM (IST)
यूएस ओपन २०२५ विजेता: कार्लोस अल्काराझने दुसऱ्यांदा यूएस ओपनचे विजेतेपद जिंकले. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये कार्लोस अल्काराझने नंबर वन टेनिसपटू यानिक सिनरचा चार सेट चाललेल्या सामन्यात पराभव केला. अशा प्रकारे, कार्लोस अल्काराझने आणखी एक विजेतेपद जिंकले, जे त्याचे सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. अशा प्रकारे त्याने राफेल नदालची बरोबरी केली. तो २३ वर्षाखालील ६ विजेतेपदे जिंकणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. राफेल नदालने २३ वर्षांच्या वयाच्या आधीही तेवढीच विजेतेपदे जिंकली आहेत. ब्योर्न बोर्गने सात विजेतेपदे जिंकली आहेत.
08 Sep 2025 09:27 AM (IST)
आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात आंदेकर टोळीचे प्रमुख सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर यांचाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
08 Sep 2025 09:23 AM (IST)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना या मालिकेत करावा लागला आहे पण झालेल्या या शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये झालेल्या पराभवाचा बदला शेवटचा सामन्यात घेतला. शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 342 धावांनी पराभूत केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी शेवटच्या सामन्यांमध्ये दोन शतके तर दोन अर्धशतके झळकावली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ही मालिका २–१ ने जिंकली आहे.
08 Sep 2025 09:15 AM (IST)
भारतात आज 8 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,848 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,944 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,136 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,360 रुपये आहे.
08 Sep 2025 09:07 AM (IST)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
08 Sep 2025 08:59 AM (IST)
मुंबईत पुढील दोन दिवस ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर महत्त्वपूर्ण बैठकींचे सत्र होणार आहे. सरकारच्या अलीकडील जीआरमुळे साशंक असलेले ओबीसी नेते आज मुंबईत बैठकीसाठी एकत्र येणार आहेत.दरम्यान, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही 9 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मुंबईत विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे.
08 Sep 2025 08:49 AM (IST)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना या मालिकेत करावा लागला आहे पण झालेल्या या शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये झालेल्या पराभवाचा बदला शेवटचा सामन्यात घेतला. शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 342 धावांनी पराभूत केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी शेवटच्या सामन्यांमध्ये दोन शतके तर दोन अर्धशतके झळकावली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ही मालिका २–१ ने जिंकली आहे.
Marathi Breaking news live updates: गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात झालेल्या गँगवॉरच्या घटनेने शहरात खळबळ उडवली. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने ५ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे आयुष कोमकर याची हत्या केली. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच त्याचा भाचा होता.
या प्रकरणाचा अंदाज आधीच पोलिसांना आला होता. आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करू शकते, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी त्यांचा एक प्रयत्न हाणून पाडला होता. मात्र, अखेरीस ५ सप्टेंबरला आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून केला. या हत्येनंतर पुण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून पोलिसांनी तत्काळ आयुष कोमकर यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वतःकडे घेतली.






