लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
कोणी केली हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेला मृतदेह हा एका तरुणीचा आहे. या प्रकरणातील मृतक तरुणीचे नाव प्रियंका विश्वकर्मा असे आहे. तिची हत्या करणारा लिव्ह-इन पार्टनरनेच केल्याचे समोर आले आहे. हत्या करणाऱ्याचं नाव विनोद विश्वकर्मा असे आहे.
का केली हत्या?
मृतक प्रियंका आणि आरोपी विनोद हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि याच वादातून विनोदने संतापाच्या भरात प्रियांकाचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विनोदने तिचा मृतदेह एका मोठ्या सुटकेस बॅग मध्ये भरला. त्यानंतर सुटकेस देसाई खाडीजवळ आणून फेकून दिला.
कसा केला उलगडा?
पोलिसांना जेव्हा खाडी जवळ सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत निर्घृणपणे महिलेचा मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला तातडीने सुरुवात केली. मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या पोलीस ठाण्यामधील मिसिंग तक्रारींची आणि खाडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू केली. सीसीटीव्ही तपासणी दरम्यान पोलिसांना या सुटकेसचा उलगडा झाला.
विनोद विश्वकर्मा हा सुटकेस घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी विनोदला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत आपल्या गुन्ह्याची कबुल दिली. किरकोळ वादातून त्याने प्रियंकाची गळा दाबून हत्या केल्याचे त्याने सांगितले. या जलद कारवाईमुळे, डायघर पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा 12 तासांत छडा लावून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आधी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.
आता पोलिसांनी विनोद विश्वकर्मा याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
Ans: तरुणी प्रियंकाची हत्या तिच्या लिव्ह-इन पार्टनर विनोद विश्वकर्माने केली.
Ans: किरकोळ वादातून संतापाच्या भरात विनोदने प्रियंकाचा गळा दाबून हत्या केली.
Ans: सीसीटीव्ही फुटेजमध्ये विनोद सुटकेस घेऊन जाताना दिसला; पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशीतून गुन्ह्याची कबुली मिळवली.






