नेपाळचे पंतप्रधान दुबईत जाण्याची शक्यता (फोटो- टीम नवराष्ट्र)
नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा
केपी शर्मा ओली लष्कराच्या हेलिकॉप्टरने बाहेर पडले
अनेक मंत्र्यांचा देखील राजीनामा
Dubai News: काल नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. नागरिकांनी मोठे आंदोलन केले. त्यानंतर सरकारने ही बंदी मागे घेतली. दरम्यान संसद भवनाबाहेर मोठी निदर्शनं सुरू होती. आता नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम दिल्यावर ते आता दुबईत शरण घेण्याची शक्यता आहे.
नेपाळची राजधानी काठमांडू येथे आंदोलनामुळे परिस्थिती बिघडली आहे. नेपाळच्या संसद भवनाबाहेर आंदोलकांनी मोठी निदर्शने केली आहेत. पंतप्रधान व सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. दरम्यान थोड्याच वेळापूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता आता दुबईत शरण म्हणजेच नेपाळ सोडून दुबईत आश्रय घेण्याची शक्यता आहे. तसेच सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. त्याची विमाने देखील सज्ज असून काही वेळात मंत्री आपल्या परिवारांसह नेपाळ सोडून जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली हे दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे खासगी विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. नेपाळमध्ये वाढलेल्या हिंसाचारामुळे अनेक नेते त्यात नुकताच राजीनामा दिलेले नेपाळचे पंतप्रधान देखील दुबईला जाण्याची शक्यता आहे. मात्र दुबईत शरण कशाप्रकारे मिळते हे आज आपण जाणून घेऊयात.
कसे मिळते राजकीय नेत्यांना दुबईत शरण?
नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला आहे. आंदोलकांनी मंत्र्यांच्या घरावर देखील हल्ले केले आहेत. त्यातच आता पंतप्रधान व अन्य मंत्री दुबईत जाण्याची शक्यता आहे.
मात्र कोणी राजकीय नेता दुबईत शरण घेण्यासाठी जाणार असल्यास तिथली प्रक्रिया कशी असते? ती सामान्य लोकांसारखी नसते. तिथे शरण देण्याचा मुद्दा राजकीय पातळीवर ठरवला जातो असे प्रकरण आल्यास हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी संस्था असलेल्या unhcr कडे पाठवला जातो. मात्र मोठ्या नेत्यांसाठी काही वेगळे पर्याय अवलंबवले जातात. भविष्यातील परिस्थिती, राहणीमान आणि सुरक्षिततेबाबत निर्णय घेतला जातो. कधी कधी त्यांना तात्पुरता आश्रय दिला जाती आणि नंतर दुसऱ्या देशात त्यांना पाठवले जाते.
राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर हल्ला करून तोडफोड केली आणि आग लावली. यापूर्वी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्षाचे नेते रघुवीर महासेठ आणि माओवादी पक्षाचे अध्यक्ष प्रचंड यांच्या घरांवरही हल्ला करण्यात आला होता. निदर्शकांनी सुरक्षा दलांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.